Browsed by
Month: December 2014

शेतकरी. शेतमाल. सबसिडी. दागिने.आत्महत्या.

शेतकरी. शेतमाल. सबसिडी. दागिने.आत्महत्या.

शेतकरी. शेतमाल. सबसिडी. दागिने.आत्महत्या.
गेलं वर्षंच नव्हे तर दशक शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी चिंतित आहे. हज्जारो शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे काही सुखासुखी घडत नाहीये. शेती करणं, त्यासाठी घेतलेली कर्जं न फिटणं,  फायदा न निघणं यातूनच आत्महत्या होताहेत. शेती तोट्यात आहे या एका वाक्यात आत्महत्येचं कारण सांगता येईल.
सरकार खतांवर सबसिडी देतेय. वीज आणि पाणी कमी किमतीत देतंय. शेतीतली काही उत्पादनं हमी भाव देऊन खरेदी करतंय. येवढं सारं करूनही शेतकऱ्याला त्याचा खर्च भागवून चार पैसे उरतील अशा रीतीनं शेती करता येत नाहीये. अगदी थोडे शेतकरी आणि अगदी थोडा शेतमाल शेतकऱ्यांना फायदेशीर ठरतोय. 
साधी गोष्ट आहे. शेतकरी जे काही पिकवतो ते विकल्यानंतर त्याला पुरेसे पैसे मिळत नाहीत. अगदी सबसिडी देऊनही. याचं कारण शेतकऱ्याला जगण्यासाठी लागणारा   पैसा  शेतमाल विकून मिळत नाही. गांधीबिंधी होते त्या काळात टीव्ही नव्हता, सेल फोन नव्हता, कंप्यूटर नव्हता, मोटार सायकल नव्हती, इंजिनियरिंग कॉलेजेस नव्हती, आधुनिक औषधं नव्हती, उद्योगात तयार झालेल्या अनेक वस्तू त्या वेळी त्याच्या वापरात नव्हत्या. आज भारतातल्या कोणाही नागरिकाला ज्या गोष्टी दैनंदिन वापरासाठी लागतात त्या सर्व शेतकऱ्यानाही हव्या असतात. या सर्व अगदी आवश्यक गोष्टींची किमत त्यानं उत्पादन केलेल्या   वस्तूत मिसळली तर काय होईल? तांदूळ  दोनशे रुपये होईल आणि भाजी तीनशे रुपये किलो होईल वगैरे.
कामगार कामावर जातो तेव्हां त्याचे सर्व खर्च भरून निघतील असा पगार तो मागतो, न दिल्यास कामावर जात नाही, संप करतो. तीच गोष्ट मंत्रालय, कोर्टं, कॉलेजेस, शाळा इत्यादी ठिकाणची. कोणतंही उत्पादन करताना कोणीही व्यक्ती जेव्हां वस्तूत व्हॅल्यू वाढवते, मोल वाढवते तेव्हां मोल वाढवण्याची किमत ती व्यक्ती त्या वस्तूत मिसळते. जेव्हां केवळ शेतीवर आधारलेला समाज होता, जेव्हां माणसाच्या जगण्यात जास्तीत जास्त वाटा शेतीतून निर्माण होणाऱ्या गोष्टींचा होता, जेव्हां उद्योगातून निर्माण झालेल्या वस्तू उपयोगात नव्हत्या, जेव्हां सेवाही पायी फिरून दिल्या जात होत्या आणि त्या सेवांचं मोलही कमी होतं, तेव्हां शेतमालाच्या व्यवहारावर जगाचं आणि शेतकऱ्याचं भागत होतं.
उद्योग सुरु झाले आणि जग बदललं. मानवी-प्राणी उर्जेच्यापेक्षा वेगळी ऊर्जा वापरात आली तेव्हां जग बदलल. उत्पादनाचं प्रमाण बदललं. उत्पादनाचं माप बदललं. तिथपासून शेतकरी आणि शेतकरी नसलेले असे जगाचे दोन भाग झाले. शेतकरी या भागाला शेतमालात आपला खर्च मिसळण्याची सोय नसल्यानं शेतकरी मागं पडू लागला. आज सबसिडी इत्यादी उपाय योजले जातात. परंतू ते फसवे आहेत. शेतमालाचे भाव ठरवणाऱ्या यंत्रणाही अंतिमतः शेतकऱ्याच्या पदरात कमी पडते,इतर लोकंच त्यातून फायदे घेतात.
काहीच हाताशी उरत नसल्यानं शेतीत गुंतवणूक होत नाही, त्यामुळं कार्यक्षमता आणि एकूण उत्पादनातही फार वाढ होत नाही. मुळात उत्पादनाची गोची, नंतर भाव मिळण्याची गोची, नंतर बाजाराची गोची अशा तीन गोच्यांमुळं शेतकरी खलास झाला आहे. काही कारणानं काही शेतकरी सुखवस्तू आहेत. ज्यांना गुंतवणूक करणं जमलं, ज्यांना बाजार सापडला आणि ज्यांना काही कारणानं बरा भाव सापडला ते शेतकरी सुखात आहेत. संख्येनं आणि प्रमाणात अगदीच कमी. काही शेतकरी दागिने वगैरे वापरतात. एक तर दागिन्याकडं   भविष्यात संकटकाळी वापरता येणारी गुंतवणूक अशाच रीतीनं पाहिलं जातं. म्हणूनच अगदी गरीब घरातही चार दागिने स्त्री जपून ठेवते. दागिने आणि समृद्धी याचा सबंध असेलच असं नाही.  
म्हणूनच शेतीतली माणसं शेतीबाहेर पडत आहेत, शेतमजुरांची संख्या वाढत आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत.
 त्यातून तर्कदृष्ट्या कोणत्या वाटा आहेत? 
एक म्हणजे शेतकऱ्याला सुखानं जगता येईल असे भाव त्याला देणं आणि त्या भावात इतरांनी जगणं अशी व्यवस्था करावी. म्हणजे आजच्या चौपट वगैरे भाव देण्याची क्षमता समाजात यायला हवी. प्रत्येक माणसाचं उत्पन्न तेवढं वाढवलं की ते जमेल. म्हणजे अर्थव्यवस्था आज आहे त्याच्या तिप्पट चौपट सुधारायला हवी.औद्योगीक व इतर उत्पादनांमधूनच ते साधेल.
दुसरी वाट अशी की समाजाची आर्थिक स्थिती सुधारून शेतीतली माणसं त्या व्यवस्थेत सामिल करून घेणं. म्हणजे असं की  समाजाला आवश्यक असलेली शेती उत्पादनं काढण्यासाठी आज जितकी माणसं वापरली जातात त्यात घट करुन आजच्या माणसांच्या दशांश माणसांकडूनच शेती होईल अशी व्यवस्था करणं. तंत्रज्ञान आणि शेतीचा आकार  यात बदल करून ते साधता येणं शक्य आहे. शहरं मोठी करणं, त्यांची संख्या वाढवणं, ती अधिक कार्यक्षम करणं या वाटेनं जावं लागेल. तेही शक्य आहे.
अर्थव्यवस्था गतीमान करणं, नवीन उत्पादनं शोधणं, ती उत्पादनं करून विकण्याची क्षमता समाजात निर्माण करणं ही गोष्ट व्हायला वेळ लागेल. तेवढा काळ शेतकऱ्याला सोसायला लावणं योग्य नाही.  मधल्या काळात उपाय योजना करत असताना त्या उपाययोजना मोठ्या धोरणाचा भाग असतील अशी व्यवस्था असायला हवी. म्हणजे असं की आता जी हज्जारो करोडोंची पॅकेजेस होत आहेत त्यांची व्यवस्था सुधारणं. आज या पॅकेजेसमधून शेतकऱ्यांचा नव्हे तर इतरांचा फायदा जास्त होतो. त्या ऐवजी या पॅकेजेसचा वापर करून  गावाबाहेर काढून शहरात वसवावं, कायमचं.
मोदी मेक  इन इंडिया म्हणत आहेत. हे मेक इन इंडिया म्हणजे मेक इन लातूर, नांदेड, सेलू, परभणी, उदगीर, बीड अशा ठिकाणी करा. ही शहरं नियोजित करा. तिथलं इन्फ्ऱा स्ट्रक्चर वाढवा, तिथं शेतकऱ्यांना सामावून घ्या. शहरात आलेले शेतकरी आपल्या शेतापासून काही किलोमीटर  अंतरावर असतील,फावल्या वेळात मोटार सायकलनं शेताकडं जाऊन येतील. शेताकडं लक्ष राहील आणि पैसे मात्र शहरातल्या रोजगारातून मिळतील. एक वेळ अशी यायला हवी की गावाकडली सगळी जमीन एकत्र करून तिथं हज्जारो एकरांची यांत्रिक आणि अत्याधुनिक शेती कोणीतरी करेल.  त्या हज्जारो एकराच्या शेतीत त्या शेतकऱ्याचं शेत भाडेपट्टीवर दिलेलं असेल जेणेकरून त्याची मालकी राहील आणि काही प्रमाणात त्यातून उत्पन्नही मिळेल. काही हजार कोटी या  दिशेनं लावले तर शहरंही चांगली होतील, शेतकऱ्याचं दैन्य कमी व्हायला सुरवात होईल.
शेतकरी शेतीत भावनेनं गुंतलेला आहे कारण त्यात त्याचं पोटपाणी गुंतलेलं आहे. तेव्हां शेतापासून त्याला दूर करा, त्याला स्वतंत्रपणे जगू द्या. जगण्याचं साधन शेती एके शेती असायचं कारण नाही. इतरही साधनं आहेत. ती आजवर विकसित झाली नव्हती. ती विकसित करायला हवी.

धर्माचा दरवाजा

धर्माचा दरवाजा

इराकमधे आयसिस या इस्लामी दहशतवादी संघटनेनं गावंच्या गावं ताब्यात घेतली,त्यातल्या माणसांना ” आपल्या ” इस्लामचे बंदे व्हा असा आदेश दिलाय. जे हा आदेश पाळणार नाहीत त्यांचा छळ होतो, त्याना ठार मारलं जातं.
 आयसिसचा इस्लाम हा जगातल्या इतर रूढ इस्लामांपेक्षा वेगळा आहे. म्हणजे तो नेमका कसा आहे आणि वेगळा कां आहे हे नीट समजलेलं नाही. सामान्यतः अल बगदादी हा त्यांचा पुढारी जे म्हणेल ते मान्य करणं असा त्या इस्लामचा अर्थ आहे. 
इराकमधले मुस्लीम असोत की ख्रिस्ती की आणखी कोणी. त्या सर्वांना जीव वाचला तर परागंदा व्हावं लागतं. ती माणसं शेजारच्या देशात पोचतात.
अशा रीतीनं अनेक लोक जॉर्डनमधे पोचले. ते मुसलमान होते. त्याना चर्चमधे आश्रय मिळाला. तिथंच ते सध्या रहात आहेत. ही माणसं पुन्हा इराकमधे परतणं शक्य नाही. त्यांची घरं, किडुकमिडूक, जगण्याची साधनं इत्यादी सारं नष्ट झालंय. जॉर्डनमधेच ती वाढतील. कशीबशी जगत रहातील. 
 यातले काही लोक ख्रिस्ती होत आहेत.
धर्मांतर.
00
फ्रान्समधे एका माणसानं  ‘ अल्ला हो अकबर ‘ अशा घोषणा देत कार बेदरकारपणे चालवली, लोकांमधे घुसवली, 15 माणसांना जबर जखमी केलं. जखमी झालेली माणसं कोणत्या धर्माची होती हे पाहून त्यानं ‘ कारवाई ‘ केलेली नाही. त्यात ख्रिस्ती असतील, मुसलमानही असतील, एकादा हिंदूही असेल किंवा ज्यू असेल.
पोलिसांनी त्याला पकडलं. पोलिसांनी केलेल्या नोंदीत म्हटलंय की त्याला ‘ मेंटल इलनेस ‘,  मानसीक आजारपणाचा  इतिहास होता.
धर्माच्या नावाखाली इतरांचं स्वातंत्र्य हिरावून घेणं म्हणजे मानसिक आजार.
00
जॉर्डनमधे पोचलेले मुसलमान ख्रिस्ती झाले. त्यांना काय मिळालं? चर्चनं आश्रय दिला, कदाचित जगण्याचं साधन दिलं. इस्लामनं जगणं अशक्य केलं, चर्चनं ते शक्य केलं. म्हणून ते ख्रिस्ती झाले असतील.  जगण्यासाठी, पोटापाण्यासाठी.
इस्लामी लोकांनी दिलेल्या वागणुकीनं त्यांचं माणूसपण, स्वातंत्र्य, मानवी प्रतिष्ठा हिरावून घेतली. चर्चनं त्यांना ज्या रीतीनं वागवलं त्यावरून त्याना त्यांचं हरवलेलं माणूसपण मिळालं. म्हणून ते ख्रिस्ती झाले. म्हणजे हे  मनानं धर्मांतर झालं.
00
भारतात दलितांना माणुसकीची वागणूक मिळत नव्हती. आज परिस्थिती  काहीशी सुधारलेली असली तरी त्याना कमी प्रतीचं माणूस समजलं जातं. त्यांचा पोटापाण्याचा प्रश्न सुटु घातलाय पण माणूस म्हणून प्रतिष्ठेचा प्रश्न अजूनही शिल्लक आहे. म्हणूनच ते मुस्लीम किंवा ख्रिस्ती होऊ शकतात.  बौद्ध तर ते झालेच. मुस्लिम वा बौद्ध होण्यात ते सामाजिक कमीपणातून मुक्त होतात.
00
एकेकाळी आयसिस प्रमाणंच भारतात  इस्लामी लोकांनी हिंदूवर जबरदस्ती करून त्यांना मुसलमान बनवलं. तलवारीच्या जोरावर. हे धर्मांतर  जगण्याचं,पोटापाण्याचं धर्मांतर होतं. मुसलमान नाही झालात तर मराल, तेव्हां डोकं वाचवण्यासाठी मुसलमान होणं. पोटापाण्याचं धर्मांतर.
00
भारतात गेल्या वीसेक वर्षांत किती धर्मांतरं झाली ते कळत नाही. त्यातली किती पोटापाण्याची होती, किती जबरदस्तीची होती, किती मनानं ( मुसलमान मुलाशी लग्न करण्यासाठी मुसलमान होणं ) याची आकडेवारी सापडत नाही. पूर्वोत्तर भारतात ख्रिस्ती धर्माचं प्राबल्य आहे. चर्चकडं असलेली आर्थिक शक्ती माणसांना काही प्रमाणात तरी काम, जगणं देऊ शकते. त्यामुळं तिथं पोटापाण्यासाठी राजीखुषीनं धर्मांतरं झाली असणं शक्य आहे. बळजोरीनं किती धर्मांतरं झालीत त्याचा आकडा सापडत नाही.
00
खुषीनं किंवा जबरदस्तीनं धर्मांतर झालं तरी सामान्यतः कोणी माणूस लेखी,जाहीरपणे, कोर्टासमोर काहीही कबूल करत नाही. त्यामुळं धर्मांतरं जबरदस्तीनं झाली की खुषीनं ते ठरवणं फारच कठीण आहे. भारतात कायद्यानं वागायची  रीतसर लेखी नोंद ठेवायची सवय नसल्यानं माहितीचं खरं खोटेपण ठरवणं कठीण होतं.
00
धर्म माणसाला जन्मानं मिळतो. आई बाप एका धर्माचे असतात, बालपणात माणसं आईबाप व  नातेवाईकांवर अवलंबून असल्यानं त्या वातावरणात वाढतात आणि धर्म मान्य करतात. आईबापाकडून मिळालेल्या धर्माच्या उणे अधिकचा विचार सुरु होतो जगाचा अऩुभव घेतल्यानंतर. प्रत्येक माणसाला त्या त्या समाजातल्या वातारणानुसार आपल्या धर्माबद्दल काही शंका, आक्षेप, हरकती निर्माण होतात. धर्म ही गोष्ट फार म्हणजे फार जुनी असल्यानं धर्मावलंब काळ ठरवतो. त्यामुळंच बदलत्या काळात माणसाला आपापल्या वा इतर धर्मांबद्दल शंका, आक्षेप निर्माण होतच असतात.  आक्षेप आणि आवडणाऱ्या-सवयीच्या गोष्टी यांत एक संतुलन तयार होऊन माणूस धर्माला काही टक्के मंजुरी देऊन धर्मात टिकतो. संतुलन बिघडलं, आक्षेप वाढले तर माणूस धर्म सोडतो, एकादेवेळेस दुसऱ्या धर्मात जातो. ख्रिस्तीआणि हिंदू धर्मात ते शक्य होतं.
   ख्रिस्ती माणूस धर्म सोडून गेला तर त्याला धर्म आडकाठी करत नाही, मारीत नाही. हिंदू माणूस धर्म,देव, उपासना, रुढी इत्यादी गोष्टी मानेनासा झाला तरी हिंदू माणसं ते सहन करतात. तो दुसऱ्या धर्मात गेला तरी त्याला मारत नाहीत. एकेकाळी कदाचित बहिष्कार टाकून त्याचं जगणं अशक्य करत असतील. पण अलिकडं तसं घडत नाही. 
इस्लाममधे माणसानं  धर्म  सोडला, धर्मबाह्य वर्तन केलं तर त्याला मृत्यू दंड असतो. म्हणून इस्लामी माणसं इतर धर्मात गेल्याची उदाहरणं कमी सापडतात. हिंदू, ख्रिस्ती माणसं इस्लाममधे जाऊ शकतात, पण ती नंतर पुन्हा आपल्या धर्मात जाऊ शकत नाहीत. इस्लाममधे आत जाता येतं बाहेर येता येत नाही. जेथे इस्लामी  सत्ता आहे तिथं  असं घडतं.
 भारत देश इस्लामी देश नाही. मुसलमान माणूस हिंदू झाला तर तिथं मुसलमान त्याला मारत नाहीत, मारू शकत नाहीत कारण या देशात एक सेक्युलर कायदा चालतो. 
00
माणसानंच देव आणि धर्माची निर्मिती आपल्या सुखासाठी केलेली आहे. धर्मात मुळातच काही सोयी आहेत, काही निहित, मुळातलेच दोष आहेत. काळाच्या ओघात धर्म बदलावा अशी अपेक्षा आहे. ख्रिस्ती आणि हिंदू धर्मानं काही प्रमाणात काळानुसार बदल स्वीकारले आणि इतर धर्मांचं अस्तित्व मान्य करून त्यांच्यासह जगणं मान्य केलं. तसंच धर्मामधल्या फटी, धर्मातले दोष, काळाबरोबर निर्माण झालेल्या त्रुटी या गोष्टी काढून टाकण्याचे प्रयत्न ख्रिस्ती आणि हिंदू धर्मात झाले. स्वतःच्या धर्माची परखड चिकित्सा या धर्मांत होते. इतरांनीही तशी चिकित्सा केली तर ती ख्रिस्ती-हिंदू विचारात घेतात. त्या मानानं इस्लाम काळासोबत बदलला नाही. इस्लामेतर जग शुद्ध जग नाही यावर इस्लामचा विचार आधारलेला आहे. तो विचार  इस्लाममधे प्रभवी राहिला आहे. धर्माची मूलगामी चिकित्सा इस्लाममधे इतरांच्या तुलनेत खूपच कमी झाली. धर्मबाह्यता, धर्मनिंदा, जिहाद या गोष्टीच्या वाट्टेल तशा व्याख्या करून माणसांना तिथं मारून टाकलं जातं,जाऊ शकतं, तसं अनेक ठिकाणी घडलेलं आहे.इतरांनी इस्लामची केलेली चिकित्सा त्याना मान्य नसते.
भारतात  मुसलमानांचं वागणं वेगळं आहे. पाकिस्तान हा मुसलमानांचा देश आहे असं ठरल्यानंतरही फार फार मुसलमान भारतात राहिले. राजीखुषीनं. मुसलमान म्हणून ते भारतात जगतात आणि भारतीय म्हणूनही जगतात. त्यांनी मुसलमान म्हणून जगण्याला भारतातल्या ख्रिस्ती आणि हिंदूंचा आक्षेप नाही. भारताची राज्यघटना इस्लामी असावी असा त्यांचा आग्रह किवा विचार नाही. त्यामुळं इतर धर्मियांबरोबर सहजीवन व्यतित करण्याची त्यांची इच्छा दिसते.
 माणसं विचारांसाठी,  पोटापाण्यासाठी त्यांना योग्य तो धर्म स्विकारू शकतात. आधुनिक काळात माणसाला वयाची अठरा वर्षं  ओलांडल्यानंतर कुठल्याही धर्मात जायची सोय असायला हवी. धर्माच्या बाहेर पडायची सोय असावी. दुसऱ्या धर्मात जायची आणि तिथूनही बाहेर पडून आणखी कुठल्याही धर्मात जायची सोय असावी. 
00
आज जे ख्रिस्ती आहेत, बौद्ध आहेत, मुसलमान आहेत त्यांना कोणत्याही कारणानं हिंदू व्हावंसं वाटलं तर ती वाट सुलभ असली पाहिजे. त्यात कायदेशीर अडथळा असता कामा नये.  हिंदू झाल्यावर तो त्याची नोंद हिंदू म्हणून करेल. पण त्याला जात काही स्वीकारता येणार नाही. कारण जात फक्त म्हणजे फक्त जन्मानंच मिळते. तेव्हां जे कोणी नव्यानं हिंदू होतील त्यांचा एक वेगळा वर्ग व्हायला हवा,जात नसलेल्या हिंदूंचा वर्ग.
00
एक वांधा इथंही आहे. 
कोण हिंदू आहे हे  कोणी ठरवायचं. 
हिंदू समाजात अनंत पंथ, उपपंथ, उपासना पद्धती, देव, अवतार, संत इत्यादी आहेत. हिंदू समाजात नास्तिकही आहेत. तेव्हां यातल्या कोणाला हिंदू मानायचं आणि कुणी? परवा तर साईबाबाना मानणारे हिंदू नाहीत असं कुणी तरी भगवा  युनिफॉर्म घातलेल्या माणसानं ठरवून टाकलं. मोहन भागवत यांनी मार्क्सवाद्यांना धर्मबाह्य ठरवलं. भगव्या युनिफॉर्ममधे असोत की खाकी चड्डीतले असोत, ते ठरवतील तो हिंदू असं कसं चालेल? बरं त्यातूनही आणखी एक गोची. हे युनिफॉर्म आणि चड्डीवाले आता धार्मिक राहिलेले नाहीत. ते राजकीय झालेले आहेत. गेली दहाएक वर्षं ते उघडपणानं, जाहीरपणानं,विचारपूर्वक भारतीय जनता पक्षाचा भाग झाले आहेत. त्या पक्षात ते कार्यकर्ते पाठवतात, त्या पक्षाच्या बाजूनं भाषणं करतात, त्या पक्षाच्या विधीमंडळ पक्षाचे सदस्य आणि मंत्री यांच्याशी विचार आणि आदेशांचं आदान प्रदान करतात. त्यामुळं त्यांचे विचार हे धार्मिक नसून राजकीय ठरतात. 
00
90 टक्के माणसं आपापल्या परीनं हिंदू म्हणून जगत असतात. ती जिथं कुठं असतात तिथं आपापल्या परीनं कसं जगायचं ते ठरवत असतात. मालेगावमधे, वाराणशीत, लखनऊमधे, कारवारमधे. संघ परिवारातली माणसं तिथं उतरली की घोटाळे सुरू होतात. त्यांच्या हिंदुत्वविषयक विचारात भारतातल्या हिंदूंतही अनेक मतभेद आहेत. हिंदू असणाऱ्या लोकांचे त्यांच्या हिदुत्व विचारावर आक्षेप आहेत. एका वाक्यात बोलायचं तर ते भारतातल्या हिंदूंचे एकमेव प्रतिनिधी नाहीत. भाजप सत्तेवर  आल्याकारणानं त्या सत्तेचा वापर ते करू पहात आहेत, त्यांचा हिंदुत्व विचार लोकांवर लादण्याचा. 
00
 रामजादे कोण आणि हरामजादे कोण हे ठरवण्याचा खटाटोप हा राजकीय खटाटोप आहे. त्याचा निवडणून येण्याशी दाट संबंध आहे.
धर्मांतर, घर वापसी हा वाद संघ परिवाराचा-भाजपचा राजकीय खेळ आहे.
00
हिंदूच नव्हे तर सारेच धर्म कालसुसंगत करणं, सुखावह आणि माणसाला आनंद व स्वातंत्र्य देणारे करणं याकडं लक्ष द्यावं. हिंदू होण्यात सुख आहे, मानसीक आणि पोटापाण्याचं स्वातंत्र्य आणि सुख आहे अशी व्यवस्था व्हावी. लोक  आपणहून हिंदू धर्मात येतील. ती वाट शिल्लक असावी.
00
भारतीय राज्यघटनेत कुठल्याही जबरदस्तीला स्थान नाही. कामावर जबरदस्तीनं ठेवलं तर वेठबिगार होतो. कामावरून जबरदस्तीनं काढलं तर तेही कोर्ट बेकायदा ठरवून त्याला कामावर घेण्याचा आदेश देतं.
जबरदस्ती सिद्ध करण्याचे उपाय भारतीय कायद्यात दिलेले आहेत.  धर्मामधे प्रवेश करताना  किंवा धर्म सोडताना जबरदस्ती झाली तर कायद्यानं कारवाई करता यायला हवी. 
परवानगी असावी, जबरदस्ती नसावी.

00
पेशावरची शाळा

पेशावरची शाळा

पेशावरच्या शाळेत सात जिहादींनी 132 मुलं मारली. दोन चोरलेल्या गाड्यांतून जिहादी शाळेत पोचले. पंधरवडाभर आधी पाक-अफगाण सरहद्दीवर त्यांचं प्रशिक्षण झालं होतं, हल्ल्याचं नियोजन झालं होतं. एका अभ्यासवर्गासाठी हॉलमधे जमलेल्या विद्यार्थ्यांवर बेछूट गोळीबार झाला. पळणाऱ्याना पाठून गोळ्या घातल्या. घाबरून थिजून बसलेल्या मुलांवर गोळ्या झाडल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली मुलं मेली आहेत की नाहीत ते तपासून त्यात जिवंत आढळलेल्यावर गोळ्या झाडल्या. 
रक्ताची थारोळी आणि प्रेतांचा खच एकदा पाहून झाल्यावर जिहादीनं आपल्या नेत्याला फोनवरून विचारलं ” मुलं मारून झालीत, आता काय करू.” पलिकडून उत्तर आलं ” आता सैन्याचे कमांडो येतील. त्यांच्यावर हल्ला करा आणि नंतर अंगावरचं बाँबजॅकेट फोडून आत्महत्या करा.”
सातही जिहादींनी नंतर जॅकेट फोडून आत्महत्या केली.
तहरीके तालिबान पाकिस्तान या संघटनेच्या पुढाऱ्यानी माध्यमांना हल्ल्याची आपली जबाबदारी कळवली.  ” विद्यार्थी सैन्यातल्या अधिकाऱ्यांची मुलं होती.सैन्यातले अधिकारी उत्तर वझिरीस्तानात आमच्या लोकांना, मुलांना मारत होते. त्यांना आमची दुःख कळावीत यासाठी हा उद्योग आम्ही केला आहे.”
वझिरीस्तान हा अफगाण-पाक हद्दीवरचा चिंचोळा प्रदेश. त्यात वझीर, मेहसूद जमातींची वसती आहे. या जमातीनी 2008 मधे तहरीके तालिबान पाकिस्तान नावाची संघटना बनवली. त्यात अनेक पोट जिहादी संघटनाही सामिल आहेत. शरीयाचं राज्य स्थापन करणं आणि पाकिस्तानी-गैर इस्लामी सरकारं नष्ट करणं असं तालिबानचं उद्दिष्ट आहे. पेशावरच्या आसपास, वझिरीस्तानात काही गावांत या संघटेनं आपलं शरीया राज्य प्रस्थापित केलं आहे. तिथं पाकिस्तानची कोर्टं चालत नाहीत, मुल्ला-तालिबान पुढारी यानी केलेला शरीया कायदा चालतो. म्हणजे शिक्षा म्हणून हातपाय तोडले जातात, शिरच्छेद केला जातो वगैरे. या व इतर विभागात गेल्या चार वर्षात सुमारे 1000 शाळा बंद करण्यात  आल्या आहेत, पाडण्यात आल्या आहेत. कारण त्या शाळांमधे दिलं जाणारं शिक्षण ” पश्चिमी ” होतं, इस्लामी नव्हतं. त्यांच्या लेखी शिक्षण म्हणजे केवळ इस्लामचं शिक्षण. 
मलालावर गोळीबार झाला तो याच भागात. याच विभागात सध्या पाकिस्तानी लष्कर झर्बे अजब या मोहिमे अंतर्गत तहरीके तालिबानच्या जिहादींना मारत आहे. आतापर्यंत सुमारे 1500 जिहादी लष्करानं मारले आहेत. त्याचा बदला म्हणूनच विद्यार्थी मारले गेले.
पाकिस्तानी सरकारनं, लष्करानं, आयएसआय या संघटनेनं 1980 च्या दशकात जिहादी निर्माण केले.  हज्जारो मदरशातून जिहादी प्रशिक्षित करून अफगाणिस्तानातल्या रशियाविरोधी लढाईत पाठवले. त्यासाठी सौदी-अमेरिकी पैसा आणि अमेरिकेची शस्त्रं वापरली. जिहादी शाळामधली इस्लामी शिक्षणाची पाठ्यपुस्तकं अमेरिकेतल्या छापखान्यात छापलेली होती. लाखो जिहादी पाकिस्ताननं अफगाणिस्तानात पेरले. अफगाणिस्तानवर आपला कबजा रहावा या हेतूनं.
अफगाणिस्तानात हे जिहादी 1980च्या दशकापासून तर थेट 2001 पर्यंत अफगाण तालिबान आणि अल कायदाच्या संपर्कात होते. अफगाण तालिबान केवळ अफगाणिस्तानापुरती क्रांती करत होतं. अल कायदानं त्याना वैश्विक क्रांती शिकवली. साऱ्या जगात शरीयाचं राज्य आणायचं, त्यासाठी तिथं असलेली गैरइस्लामी राज्यं नष्ट करायची ही कल्पना अल कायदानं तालिबानमधे रुजवली. यथावकाश ही कल्पना पाकिस्तानातून तिथं गेलेल्या पाकिस्तानी जिहादीमधेही रुजली. सुरवातीला अमेरिका अफगाण तालिबानच्या बाजूनं होती, रशियाचा पराभव करण्यासाठी. पण 2001 मधे न्यु यॉर्कमधे ट्विन टॉवर्स पडल्यानंतर अमेरिका अल कायदाबरोबरच तालिबानच्याही मागं लागली.
तिथं घोटाळा झाला. अफगाण तालिबानांबरोबरच पाकिस्तानी जिहादींवरही कारवाई करा असा घोषा अमेरिकेनं पाकिस्तानपाठी लावला. तिथं पाक सरकार आणि पाक जिहादी यांच्यात संघर्ष सुरु झाला.
यात आणखी एक उपघोटाळा आहे. पाकिस्तान सरकारनं मदरसे, मुल्ला, अमेरिकेचे पैसे आणि जिहादी अशी साखळी तयार केली होती. तयार होणारे जिहादी अफगाणिस्तान आणि भारतात वापरायचे असा पाकिस्तानचा डाव होता. त्यानुसार लष्करे तय्यबा, जैशे महंमद इत्यादी संघटना अमेरिकन पैसा आणि आयएसायचं प्रशिक्षण यांचा वापर करून काश्मिरात  धुमाकूळ घालत होते. पाकिस्तानच्या दृष्टीनं सारं ठीक चाललं होतं. परंतू जिहादी व्हायरस वैश्विक इस्लामी होता. शरीया आणि जिहादची तत्व यांच्या विरोधात असणाऱ्या प्रत्येक समाजाला नष्ट करणं हे जिहादी संघटनांचं कर्तव्य ठरल. त्यामुळंच पाकिस्तानातील शिया, अहमदी, ख्रिस्ती, मुहाजीर या माणसांनाही जिहादी संघटना मारू लागल्या. शेवटी एक तार्कीक टोक या संघटनानी गाठलं. पाकिस्तान सरकार अमेरिकेचा पैसा आणि आदेश यावर चालत असल्यानं तेही इस्लामी नाही असं ठरवून जिहादींनी पाकिस्तान सरकार, पाक लष्कर, पाक नौदल, पाक पोलिस यांच्यावर हल्ले करायला सुरवात केली.
आता मात्र मुशर्ऱफ-पाकिस्तानी लष्कराचे वांधे झाले. आता लष्करावरच डाव उलटला होता. लष्करानं या जिहादींना एकत्र करून त्यांचं लक्ष पुन्हा एकदा भारत आणि अफगाणिस्तानकडं वळवायचा प्रयत्न केला. परंतू ते जमेना.अमेरिकेकडून जिहादीवर कारवाईचा दबाव होता. पाकिस्तान डबल गेम करू लागलं. चार दोन जिहादी मारून अमेरिकेला खुष ठेवायचं पण प्रत्यक्षात जिहादींना संरक्षण द्यायचं असा डाव मुशर्रफ खेळले. स्वार्थी, काहीसे मुद्दाम झालेले बावळट आणि मूर्ख अमेरिकन हा डाव माहित असूनही मुशर्रफना पाठिंबा देत राहिले. 
 परंतू मोकला सुटलेला जिहादी वारू थांबायला तयार नव्हता.
2007 मधे त्यांनी इस्लामाबादवर शरीया लागू करायला सुरवात केली. लाल मशिदीचा ताबा घेऊन ते शरीयाचं केंद्र केलं. तिथले जिहादी शहरभर पसरून माणसांना, पोलिसांना मारू लागले. गळ्याशी आल्यावर पाक सरकारनं लाल मशिदीवर कारवाई केली, मशीदीतले जिहादी मारले. तिथून तहरीके तालिबान ही संघटना जिहादीनी स्थापन केली. जी आजवर सरकारचा दम काढत आहे.
थेट 1970 पासून सिद्ध झालं आहे की अतिरेकी इस्लामी विचारांपुढं पाकिस्तानातले राजकीय पक्ष आणि लष्कर नांगी टाकतं. 1960 पर्यंत सँडहर्स्ट मधे तयार झालेलं व्यावसायिक लष्कर झिया  उल हक यांनी इस्लामी केलं. भुत्तोंनी पीपल्स पार्टी काढली, समाजवाद हे त्या पक्षाचं ध्येय केलं. त्यात पहिलं वाक्य समाजवादाचं आणि दुसरं वाक्य इस्लामचं. नवाज शरीफनी 1991 साली कायदा करून शरीया हा पाकिस्तानातल्या कायद्याचा आधार असेल असं पक्कं केलं. 2013 च्या निवडणुकीत नवाज शरीफ यांनी तहरीके तालिबानचा पाठिंबा आणि पैसे घेतले. त्या निवडणुकीत शरीफ आणि इमरान खान या दोघांच्याच पक्षांना जाहीर सभा घ्यायची, प्रचार करायची परवानगी होती. इतरांच्या सभांमधे तालिबाननं स्फोट केले. पीपल्स पार्टीचे बिलावल भुत्तो तर जिवाच्या भीतीनं दुबाईत पळून गेले.
जिहादी इस्लामचा पगडा आणि भीती पाकिस्तानी समाजावर आहे. लष्कर, पोलीस, न्यायव्यवस्था आणि राजकीय पक्ष त्या दबावाखालीच वावरतात. सामान्य जनतेवरही शरीयाचा प्रभाव आहे. शरीया आणि जिहाद या इस्लाममधल्या तत्वांचा फेर विचार करावा असं पाकमधल्या बहुसंख्य जनतेला वाटत नाही. फेर विचार करण्याची क्षमता, स्वातंत्र्य, परिपक्वता, हिंमत पाकिस्तानी जनतेत नाही. शाळा उडवण्याची परवानगी इस्लाम देतं किंवा अशी परवानगी कोणी घेऊ शकतो यातच घोळ आहे ही  गोष्ट सामान्य इस्लामी जनता विचारात घेऊ शकत नाहीये. अय्यान हिरसी अली ही बंडखोर मुसलमान बाई इस्लाममधे बंड करून उभी रहाते याचा अर्थ इस्लामी जनतेला समजत नाही. आधुनिक जग आणि इस्लामची सांगड घालण्याची कुवत असणारे दोन चार टक्केही पाकिस्तानात नाहीत. भारताचा द्वेष, भारत आपल्याला नष्ट करू पहात आहे हा भयगंड या एकाच गोष्टीवर पाकिस्तानचं राजकारण चाललंय. शेजारी देश हे राजकीय-आर्थिक वास्तव समजून न घेता त्याला धार्मिक रूप देण्याचा मूर्खपणा जिन्नांनी केला. तीच परंपरा पाकिस्तानात अजूनही चालू  आहे. ना जनता ना राजकीय पक्ष ना लष्कर त्याच्या बाहेर यायला तयार  आहे. भारताची भीती दाखवून जगाकडून पैसे व मदत उकळण्याचा उद्योग पाकिस्तानी पुढारी आणि जनरल करत आले. त्यामुळं त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेकडंही दुर्लक्ष केलं. अमेरिका-सौदी इत्यादी देशांनी आपापले स्वार्थ पाहिले आणि पाकिस्तानात पैसे ओतले. भारतभीतीगंड आणि अमेरिकेनं ओतलेला पैसा यामुळं पाकिस्तानात दलदल झाली आहे. जिन्नांनी ही दलदल सुरु केली.

यातून पाकिस्तानला बाहेर कोण काढणार? जिहादीची निर्मिती पाकिस्ताननंच केली आहे, ती त्यानाच निस्तरावी लागणार आहे. ना अमेरिका, ना सौदी ना भारत या बाबत त्याना मदत करू शकतो. त्यांनीच पुढाकार घ्यायला हवा. समाजाची पुनर्रचना आधुनिक शिक्षणाच्या आधारे करायला हवी. त्यांनी हालचाली केल्या तर कदाचित जगभरचे इतर लोक मदतीला येतील.
ताराबाई मेढेकर

ताराबाई मेढेकर

औरंगाबादच्या ताराबाई मेढेकर गेल्या. मेढेकर गाडीचं एक चाक, अप्पा मेढेकर, काही दिवसांपाठीच निखळलं. ताराबाईंच्या निधनानं दुसरंही निखळलं.
जगात कोणाचंही काहीही बाकी न ठेवता ताराबाई गेल्या. सारं बेबाक करून गेल्या.
ताराबाईंचा संसार मोठा होता. दीर, नणंदा, मुलं सर्वांचे संसार उभे करण्यासाठी त्या कंबर कसून उभ्या होत्या. लग्नं, डोहाळे जेवणं, बारशी, शिक्षण, सणसोहळे, आजार पाजार, संकटं. प्रत्येक गोष्टीत त्या न बोलता, आनंदानं उभ्या असत. ही झाली त्यांच्या नात्यातली, सख्खी माणसं. अप्पासाहेबांमुळं, हैदराबाद स्वातंत्र्य  चळवळीमुळं तयार झालेली नाती वेगळीच. किती तरी माणसं. त्यांच्या त्यांच्या घरातले प्रश्न. जमेल तशी ताराबाई मदत करत असत.  
 कधी कशाचा गवगवा नाही. देवासमोर पूजा करतांना किंवा कसल्याशा पोथ्या वाचत असताना केवळ ओठ हलतांना दिसत, आवाज म्हणून नाही. एकीकडं कसलंसं स्त्रोत्र किंवा काही तरी पुटपुटणं आणि त्याच बरोबर घरातली कामं. केरवारा. कपडे वाळत घालणं. चहा टाकणं. भाजी चिरणं. मधेच कोणी काही विचारलं तर हातानं फक्त खुणावत, येवढं स्तोत्र संपलं, पोथी संपली की बोलेन, तोवर जरा थांबा. सारं आयुष्य त्यांनी अशा तऱ्हेनं कमीत कमी बोलत, कामं पार पाडत पार पाडलं.
हैदराबादच्या चळवळीत अप्पासाहेब मेढेकर कार्यकर्ते होते. अनंतराव भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे, गांजवे, चारठाणकर, कौसडीकर, अशा कार्यकर्ते-नेते मंडळीच्या आसपास अप्पा मेढेकर होते. दिवस कठीण होते. भूमिगत कामं करावी लागत होती. उत्पन्न तर नव्हतं, घरची परिस्थिती कधीच चांगली नव्हती. अशा स्थितीत संसार नीट चालवणं म्हणजे दिव्यच होतं. रक्ताची नाती होतीच पण त्या बरोबर दररोज कार्यकर्त्यांचा, िमत्रांचा राबता असे. वेळी अवेळी कोणीही घरी टपकत असे. कधी एकटं, कधी सकुटुंबं. दररोजच हे घडत असे. आलेला कोणीही माणूस घरात उपाशी राहिला नाही. चारठाणकर, कहाळेकर महाराज, अनंतराव भालेराव अशी मोठी माणसं असोत की एकादा समवयस्क कौसडीकर असो, घरात पाऊल पडलं की गप्पा-कामांचा राडा सुरु होई. चहा, न्याहरी, जेवण आणि एकाद्या गरजूला चार पैसे किंवा एकादी वस्तू. हे सारं ताराबाई सांभाळत असत.
आता बसेस, रेलवेच्या सोयी झाल्या आहेत. पन्नास वर्षापूर्वी सोयी नव्हत्या. दूरवरून माणसं अवेळी पोचत. रात्री दरवाजा वाजे. ताराबाई उठत.  माणसं दूरवरून आलेली असत, कित्येत तासाच्या प्रवासानंतर. हॉटेलं नव्हती, घरून आणलेल्या दशम्याही संपलेल्या असत. ताराबाई प्रथम भाकरी आणि पिठलं टाकत असत. आलेलं माणूस जायला निघे तेव्हांही भाकरी नाही तर धपाटे बांधून देत असत.
महिन्याचं बजेट कसं सांभाळलं जाई? शिवाय मुलं, नणंदा, दीर यांचेही संसार. श्रीमंती नव्हती, पण कधी काही कमीही पडू दिलं नाही.
अप्पा मेढेकर कार्यकर्ते होते, अनुयायी होते. गोविंदभाई, अनंतराव, स्वामीजी, वैशंपायन, चारठाणकर अशा कोणाही ज्येष्ठ नेत्यानं सांगितलेलं काम पार पाडत असत. पूर्ण निष्ठा. आणि ताराबाईंची अप्पासाहेबांवर पूर्ण निष्ठा. हैदराबाद चळवळीचं राजकीय व इतर महत्व त्यांना एकादेवेळेस कळलं नसेल. त्या पुढारी नव्हत्या, इंटलेक्चुअल नव्हत्या. पण वर उल्लेख केलेले नेते आणि पती मेढेकर आणि सभोवतालचा कार्यकर्त्यांचा गोतावळा सुखात ठेवणं ही त्यांची निष्ठा होती. त्यांनी कधी हे बोलून दाखवलं नाही की लिहिलं नाही. पण ते दिसत होतं.
चळवळी उभ्या रहातात, यशस्वी होतात. स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारखे नेते आणि अप्पासाहेब मेढेकर यांच्यासारखे कार्यकर्ते यांच्यामुळे. ते खरंच. पण ही माणसंही उभी असतात, टिकतात  ती ताराबाईंसारख्या व्यक्तीमुळं. 
जशा ताराबाई तशाच अनंतराव भालेराव यांच्या पत्नी, सुशीलाबाई. सुशीलाबाई ताराबांइंपेक्षा वयानं मोठ्या. सेलूच्या माई चारठाणकर. त्या साधारणपणे सुशीलाबाईंयेवढ्याच. स्वभावात फरक होता, बोलण्यात फरक होता, व्यक्तीमत्वांना वेगवेगळे कंगोरे होते. पण कर्तृत्व सर्वांचंच सारखं. अत्यंत अभावाच्या परिस्थितीत, कष्टानं त्यांनी आपापले आणि आसपासच्या लोकांचे संसार उभे केले. चळवळींचे खांब झाल्या. ताराबाईंचे व्याही, पन्नालाल सुराणा. त्यांच्या पत्नी वीणाताई सुराणा. त्याही तशाच. पन्नालालजी आयुष्यभर सामाजिक कार्य करत राहिले आणि समाजवादी चळवळीतल्या अनेक कार्यकर्त्यांच्या सुखदुःखाची काळजी वीणाताई घेत राहिल्या.
सभोवताली जीवनाची रहाटी चालली असते आणि हिकडं या स्त्रिया खस्ता खात, कष्ट करत आणि तरीही आनंदानं आपले आणि समाजाचे संसार चालवत असतात.  त्यांच्या संपर्कात आलेल्या माणसांनाच या स्त्रिया माहित असतात. साहित्य, पत्रकारी, चित्रपट, माहिती पट, व्हिडियोपट या साधनांमधून अशी माणसं दिसायला हवीत. कधी कधी दिसतातही. पण अमळ कमीच. अनंतराव भालेराव यांनी लिहिलेल्या अग्रलेखातून, पुस्तकांतून त्यातली कित्येक व्यक्तीमत्व अजरामर झाली आहेत. 

ताराबाई गेल्या, त्यांच्यावर अग्रलेख लिहायला अनंतराव नाहीत. अनंतराव नाहीत, त्यांचा मराठवाडाही नाही.
आर्टिफिशल इंटेलिजन्स

आर्टिफिशल इंटेलिजन्स

आर्टिफिशल इंटेलिजन्स मानवी समाजाचा नाश घडवून आणेल असं पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग म्हणाले आहेत.  कॉन्वर्सेशन नावाच्या एका नियतकालिकात त्यांचा लेख प्रसिद्ध झाला आहे. माणसानं यंत्राला बुद्दीमत्ता दिल्याचा हा परिणाम आहे असं त्यांचं म्हणणं आहे. 
यंत्रं म्हणजे काय होतं? एकमेकांत गुंतवलेली दातेरी चक्रं. आसाभोवती फिरणारी चाकं. पुढं मागं किंवा गोलाकार फिरणारे दट्ट्ये. हातानं नाही तर विजेवर चालवलेली यंत्रं. एकादं यंत्रं सूत कातत असे.एकादं यंत्रं कापड विणत.एकादं यंत्रं चाक फिरवत असे. एकादं यंत्रं भोकं पाडत असे. एकादं यंत्रं वस्तू जुळवत असे किंवा कापत असे. आपण ठरवून दिलेली कामं यंत्रं पार पाडत असे. हातानं चालवलं जाणारं, हाताला दूर न सारणारं ते उपकरण असे. विजेवर चालणारी यंत्रं सुरू झाली, गिरण्या सुरू झाल्या. थोरो इत्यादी मंडळी जोरात म्हणू लागली की  यंत्रं माणसाला गुलाम करणार आहेत, माणसाचे हात निकामी करणार आहेत, मानवी संस्कृतीचा नाश करणार आहेत. 
तसं झालं नाही. यंत्रं मानवी जीवनाचा घटक झाली, यंत्रांनी माणसाच्या जगण्यात सुख आणलं.
अलन टुरिंग या माणसानं शून्य आणि एक या दोन चित्रांचा वापर करून कंप्यूटर ( 1950) तयार केला. यंत्राकडून कामं करून घेण्याला एक वेगळी दिशा दिली. त्यातूनच पुढं कंप्यूटरला देणारी आज्ञावली, सॉफ्टवेअर तयार झालं. एकाद्या प्रश्नाचं उत्तर पावलापावलानं देण्याचं अलगोरिदम तयार झालं. या दोन्हीचा उपयोग करून कंप्यूटर वेगानं माहितीचं विश्लेषण करू लागला. विश्लेषण करून उत्तरं सांगू लागला.  विश्लेषण आणि उत्तरं, निष्कर्ष ही कामं माणसाचा मेंदू करत असे. मेंदूचं हे काम कंप्यूटर करू लागला म्हणजेच कंप्यूटरला बुद्धीमत्ता आली मानलं जाऊ लागलं. 
डीप ब्ल्यू या नावाच्या कंप्युटरनं कास्पारोव या बुद्दीबळ पटूला खेळात हरवलं.झालं.   माणसाच्या मेंदूला डीप ब्ल्यू हरवू शकत असेल तर तोच डीप ब्ल्यू  माणूस नष्ट करणारी शस्त्रास्त्रं निर्माण करून अख्खी मानव जातच नष्ट करेल असं  लोकं म्हणू लागले. 
 आज ड्रोन  विमानं इराक, पाकिस्तान, इराणमधे शत्रू हुडकतात, नष्ट करतात. गुगलची ड्रायव्हरविना चालणारी कार अमेरिकेत फिरू लागली आहे. माणूस  जे जे काम करतो ते ते काम करणारे रोबो तयार झाले आहेत. याचा अर्थ असा घेतला जातो की ते रोबो, ती गूगल कार, तो ड्रोन स्वतः स्वतंत्रपणे विचार करता, एक स्वतंत्र विचार करणारे प्राणी होतात. उद्या माणसाच्या मेंदुला पर्याय, मेंदूसारखाच मेंदू यंत्राच्या रुपात माणूस तयार करेल आणि हा मेंदु पुढं घात करेल अशी भीती लोकांना वाटतेय.
ही भीती कितपत खरी आहे?
स्टीफन हॉकिंग याना मोटर न्युरॉन रोग झाला आहे.  त्यांच्या शरीराची हालचाल करण्याची क्षमता  नष्ट झाली आहे. त्यांचा मेंदू शाबूत आहे. ते विचार करू शकतात,हालचाल  करू शकत नाहीत, यंत्रं  आणि उपकरणं त्यांना चालवतात, हलवतात. ते विचार व्यक्त करू शकतात कारण त्यांच्यासाठी एक भाषक व्यवहार करणारा कंप्यूटर तयार करण्यात आला आहे. कंप्यूटरच्या पडद्यावर शब्द उमटतात. हॉकिंगना ते दिसतात. त्यातला योग्य शब्द ते निवडतात. निवडलेल्या शब्दांतून त्यांच्या विचारांची दिशा कंप्यूटरच्या लक्षात आलेली आहे. भाषेत उपलब्घ असलेल्या लाखो शब्दांतून कंप्यूटरनं हॉकिंग यांच्या विचाराना उपयुक्त ठरेल असे शब्द बाजूला काढले आहेत. त्यांच्यापासून कंप्यूटरमधला सॉफ्टवेअर  वाक्य तयार करतो.     वर उल्लेख केलेला लेख त्यांनी अशाच पद्धतीनं लिहिलेला आहे.
एक प्रश्न असा निर्माण होतो की हॉकिंग यांचं मन लिहिणारा कंप्यूटर त्यांना नष्ट करून टाका असा आदेश एकाद्या नाशक यंत्राला देऊ शकेल काय?
सोलोमोनॉफ या ब्रिटीश वैज्ञानिकानं 1967 मधे एक संशोधनपर निबंध लिहिला. त्यात त्यानी कल्पना केली की एकादा कंप्यूटर आज्ञा  ऐकताना चूक करेल, त्यानं दिलेल्या आज्ञा करप्ट होऊन भलतंच काही तरी करून बसतील. त्यातून मानवसमाजाचा विनाश होईल. जी गोष्ट चुकीनं, नकळत, अहेतुक होऊ शकते तीच गोष्ट ठरवूनही होऊ शकते अशी शक्यता सोलोमोनॉफ यांनी व्यक्त केल्यानंतर कृत्रीम बुद्धीमत्तेबद्दल भीतीचं वातावरण तयार व्हायला सुरवात झाली.
हॉकिंग यांची भीती निराधार आहे असं अभ्यासपूर्वक सांगणारा विचारवंतांचा एक मोठा वर्ग आहे. कुर्झवेल, सर्ल इत्यादी अनेक मंडळी कंप्युटिंग, कृत्रीम बुद्धीमत्ता, माणूस, माणसाचा मेंदू इत्यादी गोष्टींचा अभ्यास करून मांडत आहेत. कंप्यूटरवर कृत्रीम पोट, कृत्रीम हृदय, कृत्रीम मेंदू  तयार करणं आणि प्रत्यक्षातल्या त्या व्यवस्था  यात जमीन अस्मानाचा फरक आहे असं वैज्ञानिक सांगतात. चेतना आणि मन या गोष्टी कृत्रीमरीत्या तयार करता येत नाहीत असं या लोकांचं म्हणणं आहे. यंत्रं आणि माणुस यातला फरक त्यातूनच दिसतो.
कंप्यूटरवर शब्दांची जोडणी करता येते, वाक्यं तयार करता येतात. ही भाषेची यांत्रिक अंगं झाली. भाषेत त्यापलिकडचं काही तरी असतं. भाषेत एक अर्थ असतो, एक तर्क असतो. तो अर्थ कंप्यूटर तयार करू शकत नाही, तो माणसाचा मेंदू, माणसाचं मन तयार करत असतं. हॉकिंग यांच्या डोक्यातले शब्द आणि वाक्यं कंप्यूटर जुळवतो, त्या पलिकडं जगाची मांडणी करणं, विश्वनिर्मितीचा सिद्धांत कंप्यूटरला मांडता येत नाही, तो हॉकिंग यांनाच मांडावा लागतो.
ज्ञान, चेतना हे दोन गुणधर्म मानवी मेंदूत, माणसामधे असतात. कंप्यूटरमधे ते नसतात. असणारही नाहीत. कंप्यूटर नावाच्या एका यंत्रामधे माणूस काही आज्ञा भरवतो, त्या आज्ञांनुसार कंप्यूटर कामं करतो. कंप्यूटरमधे स्वतंत्रपणे प्रज्ञा नसते. कंप्यूटरमधे अनेक प्रक्रिया घडतात, त्या कशा घडाव्यात ते माणसानं सांगितलेलं असतं.माणसाच्या मेंदूत असंख्य गुणिले असंख्य रासायनिक प्रक्रिया घडत असतात. परंतू माणसामधलं चैतन्य, चेतना, ज्ञान निर्मितीची क्षमता या गोष्टी असतात, त्या प्रत्येक माणसाच्या स्वतंत्र प्रेरणा आणि घटना असतात. कंप्यूटरमधे असंख्य प्रक्रियांची साखळी जुळवणारा वा नियंत्रित करणारा मेंदू, चेतना, ज्ञान निर्मिती नसते.
 यंत्रं निर्माण झाल्यावर थोरो, गांधी इत्यादी लोकांना जगाचा अंत दिसला होता, आता हॉकिंग इत्यादींना जगाचा अंत दिसतो आहे.
माणूस स्वतःचा नाश करू शकतो की नाही? होय आणि नाही अशी दोन्ही उत्तरं आहेत. माणूस किती शहाणा होणार त्यावर त्याचा नाश अवलंबून आहे. मानवी समाजाच्या उत्क्रांतीची दिशा शहाणपणाकडं आणि सुखाकडं आहे. यंत्रं नव्हती, शेतीही होत नव्हती तेव्हां माणूस भरपूरच क्रूर होता. काही हजार वर्षांपूर्वीचे अवशेष  सांगतात की अगदी लहान मुलांनाही बाणानं मारून टाकण्यात आलं आहे. दर शतकामधे माणसांनी मारलेल्या माणसांची संख्या कमी होत चाललीय. माणसाचं आयुष्मान वाढत चाललं आहे, माणसाचं शारीरीक जीवन किती तरी सुखी होत चाललंय. मानसिक जीवनात गडबडी जरूर होताहेत. अल कायदा आणि आयसिस निर्माण होताहेत पण त्यांना आटोक्यात आणणाऱ्या यंत्रणाही तयार होताहेत.
कंप्यूटर हे एक तंत्रज्ञान आहे. माणसानंच तयार केलेलं. सुरी तयार झाली. कोणी तिचा वापर फळं कापायला करू लागला कोणी माणसाचा गळा चिरायला. कृत्रीम बुद्धीमत्ता ही संकल्पनाच मुळात घोटाळ्याची आहे. कंप्यूटरला बुद्धीमत्ता आलेली नाही. कंप्यूटरची गणनाची क्षमता वाढली आहे येवढंच. माहितीचं माणसानं सांगितलेलं विश्लेषण कंप्यूटर अती वेगानं करू लागला आहे येवढंच. त्यावरून त्याला बुद्धीमत्ता प्राप्त झाली आहे असं म्हणता येत नाही.

हॉकिंग हा काही कच्चा माणूस नाही.  विचारी माणूस आहे, अत्यंत बुद्दीमान आहे. परंतू ते कृत्रीम बुद्धीमत्ता या विषयाचा एका मर्यादित अंगानं विचार करत आहेत.  कृत्रीम बुद्धीमत्ता या संकल्पनेला ज्ञान आणि चेतना हेही घटक आहेत. त्यांचा  विचार पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ करत नाहीत. पदार्थविज्ञान आणि चेतना-ज्ञाननिर्मिती-तत्वज्ञान हे दोन वेगवेगळे प्रांत आहेत. मानवी संहाराची शक्यता ही त्या मंडळींची  बौद्दिक  लठ्ठालठ्ठी आहे येवढंच. मानव समाज टिकून रहावा ही कळकळीची इच्छा त्यातून व्यक्त होतेय.
आता गीता

आता गीता

गीता हे एक राष्ट्रीय पुस्तक आहे असं सांगण्याची आवश्यकता होती काय?
देशासमोर आर्थिक प्रश्न आहेत. दुष्काळ होताहेत. दिल्लीत बलात्कार होताहेत. खूप महत्वाचे प्रश्न लोंबकळत असताना या लोकांना हे असले उद्योग कसे करावेसे वाटतात.
एक गीता प्रेस नावाचा छापखाना आहे. दर वर्षी तो गीतेच्या हज्जारो प्रती छापतो. गीता प्रेसला दुसरं काहीही छापायला वेळ सापडत नाही इतक्या गीतेच्या प्रती छापल्या जातात. गीतेच्या लाखो प्रती खपत असतात. 
महाराष्ट्रात गीताईच्या हज्जारो प्रती खपत असतात. ज्ञानेश्वरी ही मराठीतली गीता आहे. ज्ञानेश्वरांनी त्यांना उमगलेली गीता लोकांसमोर, त्या काळात लोकांना समजलेल्या भाषेत ठेवली. विनोबांनी त्यांना समजलेली गीता आधुनिक मराठी भाषेत मांडली. त्या आधी टिळकांनी गीता रहस्य लिहून गीतेचे त्यांच्या काळाशी सुसंगत अर्थ सांगितले, गीतेत कर्मयोग आहे असं  सांगितलं. कित्येक शतकं भारतातली माणसं आपापल्या परीनं गीता वाचत आली आहेत. सामान्य कीर्तनकार-प्रवचनकारापासून प्रकांड विद्वान गीतेचे विविध कालसुसंगत अर्थ लावत आले आहेत. विवेकानंद, चिन्मयानंद हे गीतेचे राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय प्रचारक.
महात्मागांधीनी त्यांना समजलेली गीता आयुष्याचं तत्वज्ञान मानलं. नथुराम गोडसेनंही स्वतःचं वागणं गीतेला मान्य आहे असं मानलं. 
पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या वडिलांनी, वैजनाथशास्त्री आठवले यांनी मुंबईत गीता पाठशाळा स्थापन केली. पांडुरंगशास्त्रींनी ती पाठशाळा विस्तारली. तत्वज्ञान विद्यापीठ स्थापलं, स्वाध्याय चळवळ उभी केली. पांडुरंगशास्त्रींच्या विचारांचा आणि आचाराचा गीता हा पाया होता. शास्त्रीजींनी उभ्या केलेल्या संस्थांमधे विद्यार्थ्यांच्या हाताशी कायम एक गीतेची प्रत असे.
अजूनही महाराष्ट्रातल्या शाळात गीतेच्या चौदाव्या अध्यायाच्या पाठांतराच्या स्पर्धा भरवल्या जातात. महाराष्ट्रात आणि देशात वर्षभर शेकडो गीता ज्ञान यज्ञ घडत असतात.
भारत देशानं गीता कायम आणि केव्हांच स्वीकारली आहे. भारतात निर्माण झालेल्या,  हिंदूविचारांपासून वेगळ्या विचारांच्या  पंथ आणि माणसांनी गीता नाकारलेली नाही. बुद्ध, जैन तत्वज्ञानं असोत, देवाधारित धर्म नाकारणाऱ्या, भौतिकतावादी विचारसरणी असोत. त्यांनी गीतेवर हल्ला बोल केलेलं नाही. हिंदू धर्मावर राग असणाऱ्या मार्क्सवादी आणि आंबेडकरवादी विचारांनी मनुस्मृती, जातींचं समर्थन करणाऱ्या ब्राह्मणवादी विचारांवर कडाडून हल्ले केले. गीतेवर नाही.
गीता मुळात महाभारतात होती की ती नंतर मिसळण्यात आली? यावर वाद आहेत, विविध विचार आहेत. गीता ज्या महाभारताचा भाग मानला जातो ते महाभारत हा धर्मग्रंथही आहे आणि एक सांस्कृतीक ठेवाही आहे आणि एक महाकाव्यही आहे. हीच तर गीतेची गंमत आहे. बायबल, कुराण यांच्याशी गीतेची तुलना करता येत नाही कारण गीता हे एक मानवी जीवनाचं जवळपास सम्यक दर्शन आहे. गीतेचे अर्थ अमूकच माणसानं, अमुकच धार्मिकानं लावले पाहिजेत असा दंडक नाही. सामान्य माणूसही गीतेचे त्याला हवे ते अर्थ लावू शकतो, त्यावरून मारामाऱ्या होत नाहीत. गीता काळमानानुसार बदलू शकते ही गीतेची गंमत आहे आणि हेच गीतेचं वेगळेपण आहे. देशातल्या, परदेशातल्या कोणीही,  हिंदूनं किंवा हिंदू नसलेल्या माणसानंही गीता वाचावी, अभ्यासावी. परवानगी आहे. 
तर अशी ही गीता. सुषमा स्वराज या सध्या कमी काम असलेल्या मंत्रीणबाईंना  आज एकदम तो राष्ट्रीय ग्रंथ करावा असं वाटलं. उद्या स्मृती इराणी शाळेत आणि कॉलेजात गीता हा एक अनिवार्य किंवा ऐच्छिक विषय करतील, शंभर मार्कांचा पेपर ठेवतील. त्या पेपरचं रुपही कदाचित ऑबजेक्टिव प्रश्नासारखं असेल. गीता थोर आहे की नाही. गीता कितव्या शतकापासून प्रचलित. गीतेचा लेखक कोण आणि प्रमुख पात्र कोण. गीता कोणत्या देशात प्रचलित आहे. गीतेत कर्मयोग सिद्धांत सांगितला आहे की नाही. नरेंद्र मोदी आणि नवाज शरीफ या पैकी गीतेचे उपासक कोण आहेत. वगैरे. अशी होय किंवा नाही अशी उत्तरं दिली की शंभरात सहज अठ्ठ्य़ाणव मार्क. विद्यार्थी खुष, विद्यापीठ खुष. 
धर्मही एक नाजूक आणि व्यक्तिगत गोष्ट आहे. लोक ती आपापल्यापरीनं ठरवत आले आहेत. राज्यसत्ता हा एकूण समाजाचा भाग असल्यानं काही अंशी धर्माशी तिचा संबंध येतो. परंतू राज्यसंस्था जेव्हां धर्माचा वापर स्वतःच्या सत्तेसाठी करू लागते तेव्हां धर्माचं आणि समाजाचं काय होतं याचा अनुभव जगानं घेतला आहे. ख्रिश्चॅनिटी, इस्लामच्या इतिहासात डोकावून पहावं. भारतात मोगल आणि ख्रिस्ती राज्यकर्ते होऊन गेले. त्यांनी जेव्हां धर्मात ढवळाढवळ केली तेव्हां लोकांनी ती स्वीकारली नाही, धर्म लादू पहाणाऱ्या राज्यकर्त्यांना भारतीय माणसांनी जवळ केलेलं नाही.  
 राज्यकर्ते, राजकीय पक्ष यांनी धर्म वगैरे बाबतीत ढवळाढवळ न करणं बरं.  त्याला कारणंही आहेत. राजकारण हा एक स्वतंत्र व्यवसाय, कामाची पद्धत, व्यवस्था आहे.   लोकशाही आल्यानंतर जास्तीत जास्त मतं मिळवून राज्यसंस्था काबीज करणं ही लोकशाहीनं ठरवून दिलेली प्रणाली आहे. लोकांची मतं मिळवणं ही एकच कसोटी. त्यासाठी अक्कल, चरित्र, अभ्यास, इंटेग्रिटी असण्याची आवश्यकता असतेच असं नाही.  सवंग लोकानुनय केला की मतं मिळण्याची शक्यता जास्त. जात, धर्म, शस्त्रं, लाच, मती गुंग करून टाकणारा प्रचार यांचा वापर करून निवडून येता येतं. निवडून आलेल्या माणसांकडून समाजाचं भलं झालं तर ती एक अनपेक्षित घटना, चांगला साईड इफेक्ट मानला जातो अशी आजची स्थिती आहे.अशा माणसांनी धर्मात ढवळाढवळ करणं अगदीच घातक आहे. एका पक्षानं सुरु केलं की इतर पक्ष त्यापेक्षा अधिक वाईट आणि भडक उचापत्या सुरु करतात. 
भाजप हा एक राजकीय पक्ष आहे. भाजपची माणसं इतर राजकीय पक्षांसारखीच निवडून येत असतात. इतर पक्षांप्रमाणंच जात, धर्म, भाषा, सवंग घोषणा यांचा वापर भाजप वेळोवेळी करत आला आहे. इतर पक्षांप्रमाणंच भाजपमधेही गुण आणि अवगुणांचं मिश्रण आहे. भाजप आणि इतर पक्षांत गुणात्मक फरक नाही, प्रमाणाचा फरक असू शकेल. आचरट, उठवळ, उतावीळ, कमी लायक लोकप्रतिनिधींबाबतही इतर पक्षांच्या तुलनेत प्रमाणाचा फरक असेल तेवढाच. 
रास्व संघ ही भाजपची मातृसंघटना आहे. एकेकाळी संघ ही बऱ्याच प्रमाणात धार्मिक आणि  सांस्कृतीक संघटना होती. हिंदू माणसं एकत्र येत नाहीत, इतर धार्मिकांच्या तुलनेत ती अशक्त ठरतात,हरतात ही खंत संघाच्या निर्मितीचं कारण होतं. धर्मव्यवहारात, सांस्कृतीक व्यवहारात सुधारणा करून हिंदुना संघटित करणं हे संघाचं धोरण होतं. संघ विकसित झाल्यावर साधारणपणे हिंदू राजकारण करणाऱ्या राजकीय संघटनेला सहानुभूती असं संघाचं धोरण होतं, बहुतांश लक्ष राजकारण विरहित कामांवर होतं. त्यामुळंच जनसंघाबरोबरच काँग्रेसशीही  संघाचे संबंध असत. देवरसांची कारकीर्द सुरु झाल्यानंतर संघ-जनसंघ-भाजप घट्ट संबंध तयार झाले.  गेल्या काही निवडणुका संघ भाजपला निवडून आणण्याची खटपट करत असतो, तेच आता संघाचं जीवनकार्य झालं आहे की काय असं वाटावं अशी स्थिती आहे. काळमानानुसार संघाकडं तळातून माणसं येणं अगदीच कमी झालंय, भाजपच्या बाजूनं, सत्तेच्या बाजूनंच माणसं संघाकडं येतात. अलीकडल्या वीसेक वर्षात संघाच्या आसपास वावरणारी फार माणसं संघाच्या मुशीबाहेरची आहेत. संघाचं चरित्र आता बदललं आहे. ती एक अर्धराजकीय संघटना झालेली आहे. त्यामुळं आता संघ जे काही करतो त्याकडं सामाजिक-सांस्कृतीक दृष्टीकोनातून पहाता येत नाही. 
तर अशा या राजकीय संघटनांना धर्माचा विषय कां उचकवावासा वाटतो? 
चांगला कारभार आणि आर्थिक सुख व न्याय देणं जमत नाही तेव्हां राजकीय पक्ष जात आणि धर्माचा वापर करतात असा स्वतंत्र भारताचा इतिहास आहे. माणसांच्या गरीबीचा कळवळा म्हणून नव्हे तर मतं मिळवण्यासाठी मंडल आयोगाचा वापर झाला. त्यावर प्रतिडाव म्हणून राममंदीर प्रकरण विशिष्ट रीतीनं उचकवण्याचा उद्योग झाला.
 जनसंघाला आर्थिक प्रश्नावर बहुमत मिळत नसे, बाबरी प्रकरण काढल्यावर त्यांची मतांची टक्केवारी वाढली, हिंदू मत संघटित केल्यामुळं. आज मोदी यांना मिळालेलं बहुमत हे धर्मासाठी मिळालेलं मत नाही. स्वच्छ कारभार आणि अच्छे दिनसाठी मिळालेलं मत आहे. जनसंघ, हिंदुत्व परिवाराच्या आजवरच्या वर्तणुकीपेक्षा यावेळचं त्यांचं यश वेगळं आहे आणि आश्वासक  आहे. मोदींनी म्हणूनच आर्थिक सुधारणा आणि आर्थिक विकास यावर लक्ष द्यायला हवं. गीता राष्ट्रीय ग्रंथ करा, आयआयटीत मांसाहार नको, नवं वर्षाचं स्वागत चॉकलेट, केक, मेणबत्त्यांनी करू नये, सांता क्लॉजला मज्जाव- सरस्वतीची पूजा, असला आचरटपणा करणाऱ्यांना मज्जाव करावा, लोकमंचावरून त्यांना दूर ठेवावं. कसं वागायचं, कोणता धर्म कसा पाळायचा हे लोकांवर सोडावं. लोक पाहून घेतील. बरेच  अपरिपक्व आणि भामट्यांची भरती असलेल्या राजकीय पक्षांनी धर्म, संस्कृती, भाषा इत्यादी विषयात  न जाणं बरं.
राम आणि कृष्ण ही राजकीय पक्षाची मालमत्ता नाही. रामायण आणि महाभारत ही निवडणुकीच्या जाहीरनाम्यातली कलमं नाहीत. आजचे राजकीय पक्ष आणि पुढारी जन्मण्याच्या आधी शतकानुशतकं राम-कृष्ण-रामायण-महाभारत भारतात रुजलेलं आहे. 

  राजकीय पक्षांनी रामकृष्ण आणि रामायण – महाभारताचा वापर न करणं बरं.
स्थानिक पक्षांशी युती

स्थानिक पक्षांशी युती

भाजप आणि सेनेचं सरकार स्थापन झालं आहे.
मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हां कुरबूर करत दोन्ही पक्ष एकत्र होते. नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जागावाटपात मतैक्य न झाल्यानं दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. मोदी यांनी प्रचाराचा झंझावात केल्यानंतर, मोदींना विरोध करत करत सेनेनं ६३ माणसं निवडून आणली. विधानसभेत भाजपला बहुमत मिळालं नाही.  राष्ट्रवादीचा बेभरवशाचा पाठिंबा भाजपनं घेतला. मंत्रीपदांवरून भाजप-सेनेत संघर्ष झाला. विधानसभेत अल्पसंख्य रहाण्याचा अर्थ सरकार कधीही कोसळू शकलं असतं. म्हणजे पुन्हा निवडणुका आणि पुन्हा जुनीच कोंडी.  सेनेची अस्मिता-अस्तित्व आणि भाजपची एकमेव राष्ट्रीय पक्ष म्हणून वाढण्याची इच्छा या दोन गोष्टींत संघर्ष होता. बराच काळ सेनेला संपवण्याचा विचार भाजपमधे घोंघावत होता. शेवटी सेनेला संपवण्याऐवजी सांभाळण्याचा शहाणपणा भाजपला सुचला. तसंच आपल्या अस्मितेकडं वास्तववादी दृष्टीकोनातून पहाण्याचं शहाणपण सेनेला सुचलं. भाजप-सेनेनं जुळवून घेतलं आणि आता सरकार स्थापन झालं आहे.
ही एक चांगली गोष्ट झाली. महाराष्ट्र आणि भारताच्या राजकारणातली ही एक स्वागतार्ह घटना आहे.
प्रादेशिक पक्ष, प्रादेशिक अस्मिता, प्रादेशिक नेते हे भारतातलं एक वास्तव आहे. भारतात अनेक भाषा आहेत. प्रत्येक भाषा स्वतःचा स्वतंत्र इतिहास, संस्कृती विकसित करत असते.   माणसं जगात कुठंही गेली, कोणत्याही विचारांना चिकटली तरी मुळात आणि तळात एक भाषिक संस्कृती टिकटिक करत असते. तिला चिरडून चालत नाही, फार डोक्यावर घेऊनही भागत नाही. राजकारणात आर्थिक आणि राजकीय विचारधारा येतात, आवश्यक असतात. मार्क्सवाद, समाजवाद, भांडवलवाद, बाजारवाद इत्यादी गोष्टी येतात. त्या विचारधारांत पडूनही  माणसं आपलं सांस्कृतीक अस्तित्व टिकवत असतात. हे अस्तित्व त्या त्या राज्यातली करोडो माणसं आपले राज्यभाषी पुढारी आणि त्यांच्या भोवती तयार होणाऱ्या संघटनात गुंफतात. बाळ ठाकरे, बीजू पटनाईक, ममता बानर्जी, चंद्राबाबू नायडू , तेलंगणी नेते राव, ही उदाहरणं.
स्वातंत्र्याच्या आंदोलनात भारत नावाचा एक देश तयार करण्याची खटपट महात्मा गांधींनी केली. त्यांच्या प्रयत्नातून काँग्रेस ही चळवळ आणि नंतर पक्ष तयार झाला. काँग्रेस ही  राष्ट्रीय चळवळ आकार घेत होती तेव्हांच भाषा या कसोटीवर संघटना, राज्यं, यांचा विचार काँग्रेसला करावा लागला. जात, धर्म या बरोबरच भाषा या कसोटीवर चळवळीत विविध समाजगट संघटीत होत होते.  स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेच भाषावार प्रांत रचना करावी लागली. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षानं राज्याराज्यातल्या भाषिक अस्मितांना, भाषक नेते आणि समाजगटांना काँग्रेसनं सामावून घेतलं. जोवर हे काँग्रेसनं सांभाळलं, चरण सिंग, यशवंतराव चव्हाण, पटनायक, कामराज, टी अंजय्या, इत्यादी स्थानिक लोकांना सत्तेत वाटा दिला, तोवर काँग्रेस शक्तीमान होती, इतर पक्षाना वावच नव्हता.
इंदिरा गांधीनी राज्याराज्यातल्या नेत्यांना संपवण्याचं, नमवण्याचं राजकारण सुरु केलं. राज्यातले स्थानिक बलवान नेते एकामागोमाग एक संपवण्याचा खटाटोप केला. त्यातून राज्य पातळीवरचे पक्ष तयार व्हायला सुरवात झाली.  काँग्रेसनं चव्हाण, पवार इत्यादीना कमकुवत केलं आणि सेनेला बी टीम म्हणून वापरलं. धड सत्तेत वाटा नाही आणि धड स्वतंत्र पक्ष म्हणून स्थान नाही अशा अवस्थेत सेनेनं एक स्वतंत्र रूप घेतलं, ताकद गोळा केली.
सेना ही एक स्वतंत्र ताकद तयार होत असतानाच जनता पक्ष नावाची एक शक्ती महाराष्ट्रात आकार घेत होती. पण ती टिकली नाही. जनता पक्षातले समाजवादी संपले, जनसंघ टिकला आणि भाजपत रूपांतरित झाला. भाजप आणि सेना दोघं एकत्र आले. १९९५ पर्यंत, थेट २०१४ पर्यंत भाजप ही देशात फार मोठी ताकद नव्हती, काँग्रेसपेक्षा भाजप लहान होता. सेना आणि भाजप यांना एकत्र नांदणं शक्य झालं. काँग्रेसच्या विरोधात तो दोघं मिळून विकसित झाले.  महाराष्ट्राच्या राजकारणातली पैस सेनेनं व्यापली आणि भाजपला सांभाळून घेतलं. २०१४ मधे मोदी लाटेनं भाजप देशात पहिल्या क्रमांकावर गेला. मुळातली ताकद फार तर पंधरा ते वीस टक्के असताना   काँग्रेस विरोध आणि मोदींच्या नेतृत्वाबद्दल आकर्षण या दोन गोष्टींसाठी भाजप ताकदीच्या व्यस्त प्रमाणात सत्तेत पोचला. महाराष्ट्रातलं समीकरण बदललं. आधी सेना नंबर एक आणि भाजप नंबर दोन होता. आता भाजप नंबर एक झाला (देशात). भाजपनं काँग्रेसकडून धडा न घेता आपलं एकहाती वर्चस्व स्थापण्याचा विचार केला. परंतू त्यांना शहाणपण आलं. बहुदा सत्तेनं शिकवलं असावं.
सेना आणि भाजप या दोन स्वतंत्र राजकीय संस्कृती, घटना आहेत.
सेना ही बाळ ठाकरे या व्यक्तीनं उभी केलेली संस्था आहे. ठाकरे यांचं व्यक्तिमत्व सेना या संघटनेत रूपांकित झालं आहे. ठाकरे कोणत्याही विचारधारेत वाढलेले नव्हते. ते एक व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्रकार मार्मिक असतो, स्वतंत्र असतो. समाजात घडणाऱ्या घटना अचूक हेरून व्यंगचित्रकार त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत असतो. घटनांचं विश्लेषण करून त्यावर संपूर्ण एकात्म पर्याय व्यंगचित्रकार सुचवत नाही. एकादा पुढारी त्याला डुकरासारखा दिसतो, त्या पुढाऱ्याला डुकराचं रूप देऊन त्याच्या शेपटीच्या टोकाला एक गाठ व्यंगचित्रकार मारतो. पर्यायी विचार, कार्यक्रम इत्यादी दीर्घ आणि गुंत्याच्या गोष्टी व्यंगचित्रकार मांडत नाही. व्यंगचित्रकार हा सामान्य माणसासारखा असतो. घडणाऱ्या घटनांना एक तडक, तीव्र, तात्कालीक प्रतिक्रिया तो देतो.ती खरी असते, प्रामाणिक असते. महाराष्ट्रात आणि भारतातल्या घटना आणि प्रवाहांना ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘ देशात समाजावादाची भाषा बोलली गेली, पण विकास झाला नाही. सरकार सेक्युलरिझमची भाषा करे पण मुसलमानांना चोंबाळत असे. महाराष्ट्रात मराठी माणसांचा विकास होत नाही, इतर भाषिकांची मात्र चलती होते. लोकशाही आणि शांततेच्या मार्गाचा उदोउदो होत असे पण दंगल केल्याशिवाय कोणतीही गोष्ट धसाला लागत नसे. आंबेडकर, फुले, शाहू महाराज यांच्या गोष्टी केल्या जात आणि सर्व पक्ष जातीचं राजकारण करत.’  या गोष्टी सामान्य माणसाला आवडत नसत. परंतू आपली नाराजी व्यक्त करणं त्याला शक्य नव्हतं. सेनेनं नेमकं यावर बोट ठेवलं.या व्यथा राजकीय पक्षांनीच निर्माण केल्या होत्या, पोसल्या होत्या. त्यामुळं सामान्य माणसं सामान्यतः राजकीय पक्षांपासून दूर होती. समाजात एक राजकीय पोकळी तयार झाली होती. बाळ ठाकरे यांनी ती भरून काढली. सामान्य माणसाची ही व्यथा ठाकरे यांनी मांडली. ठोकशाही, राडे, मुसलमान असोत की गुजराती कोणावरही धाडकन टीका, निवडणुकीत जातीचा विचार न करता माणसं उभी करणं, लोकशाही नाही आदेश. लोकांना हे आवडलं. सेना लोकप्रीय झाली.
भाजपचं चरित्र या पेक्षा वेगळं. भाजप हा एक राष्ट्रीय पक्ष. दीर्घ इतिहास. रास्व संघ, जनसंघ, जनता पार्टी, भाजप अशी या पक्षाची वाटचाल. सत्तर ऐंशी वर्षाची पार्श्वभूमी. भारत देश ही पक्षाची कर्मभूमी, मतदार संघ. देशातली सगळी माणसं, त्यांच्या जाती, त्यांचे धर्म, त्यांच्या भाषा आणि संस्कृती, त्यांच्या खऱ्या खोट्या अस्मिता, त्यांचे विविध आर्थिक वर्ग, त्यांचं शहाणपण आणि वेडेपण इत्यादी सगळ्या गोष्टींचा तोल सावरत भाजपला राजकारण करावं लागतं. त्यासाठी एक सम्यक एकात्मिक विचारधारा असावी लागते. ती करण्यासाठी खूप खटपट करावी लागते. मग कार्यकर्ते प्रशिक्षित करून तयार करावे लागतात. संघटना बांधावी लागते. म्हणजे केडर तयार करावं लागतं.
 हा  खटाटोप सुखासुखी नसतो. नाना परस्परांना छेद देणाऱ्या गोष्टी कराव्या लागतात कारण समाजातल्या सर्व स्तरांना सांभाळून घ्यावं लागतं. गरीबांची भाषा केली की धनवान नाराज होतात. एका जातीचं भलं की दुसरी जात वैतागते. एका राज्यात कारखाना उभारला की दुसरं राज्य वैतागतं. एका धर्माचं कौतुक केलं की दुसरा धर्म वैतागतो. भाजप हा हिंदू धार्जिणा पक्ष आहे. तसं असायलाही हरकत नाही. परंतू एका हद्दीपर्यंतच. त्यामुळं मुसलमानांनाही वरवर किंवा एका हद्दीपर्यंत खुष ठेवावंच लागतं. सर्वांना सांभाळणं, कोणालाही न वगळणं. मध्यम मार्ग. निदान पक्षी सर्वांचं भाजप आणि सेनेचं सरकार स्थापन झालं आहे.

मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हां कुरबूर करत दोन्ही पक्ष एकत्र होते. नंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी जागावाटपात मतैक्य न झाल्यानं दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. मोदी यांनी प्रचाराचा झंझावात केल्यानंतर, मोदींना विरोध करत करत सेनेनं ६३ माणसं निवडून आणली. विधानसभेत भाजपला बहुमत मिळालं नाही.  राष्ट्रवादीचा बेभरवशाचा पाठिंबा भाजपनं घेतला. मंत्रीपदांवरून भाजप-सेनेत संघर्ष झाला. विधानसभेत अल्पसंख्य रहाण्याचा अर्थ सरकार कधीही कोसळू शकलं असतं. म्हणजे पुन्हा निवडणुका आणि पुन्हा जुनीच कोंडी.  सेनेची अस्मिता-अस्तित्व आणि भाजपची एकमेव राष्ट्रीय पक्ष म्हणून वाढण्याची इच्छा या दोन गोष्टींत संघर्ष होता. बराच काळ सेनेला संपवण्याचा विचार भाजपमधे घोंघावत होता. शेवटी सेनेला संपवण्याऐवजी सांभाळण्याचा शहाणपणा भाजपला सुचला. तसंच आपल्या अस्मितेकडं वास्तववादी दृष्टीकोनातून पहाण्याचं शहाणपण सेनेला सुचलं. भाजप-सेनेनं जुळवून घेतलं आणि आता सरकार स्थापन झालं आहे.
ही एक चांगली गोष्ट झाली. महाराष्ट्र आणि भारताच्या राजकारणातली ही एक स्वागतार्ह घटना आहे.
प्रादेशिक पक्ष, प्रादेशिक अस्मिता, प्रादेशिक नेते हे भारतातलं एक वास्तव आहे. भारतात अनेक भाषा आहेत. प्रत्येक भाषा स्वतःचा स्वतंत्र इतिहास, संस्कृती विकसित करत असते.   माणसं जगात कुठंही गेली, कोणत्याही विचारांना चिकटली तरी मुळात आणि तळात एक भाषिक संस्कृती टिकटिक करत असते. तिला चिरडून चालत नाही, फार डोक्यावर घेऊनही भागत नाही. राजकारणात आर्थिक आणि राजकीय विचारधारा येतात, आवश्यक असतात. मार्क्सवाद, समाजवाद, भांडवलवाद, बाजारवाद इत्यादी गोष्टी येतात. त्या विचारधारांत पडूनही  माणसं आपलं सांस्कृतीक अस्तित्व टिकवत असतात. हे अस्तित्व त्या त्या राज्यातली करोडो माणसं आपले राज्यभाषी पुढारी आणि त्यांच्या भोवती तयार होणाऱ्या संघटनात गुंफतात. बाळ ठाकरे, बीजू पटनाईक, ममता बानर्जी, चंद्राबाबू नायडू , तेलंगणी नेते राव, ही उदाहरणं.
स्वातंत्र्याच्या आंदोलनात भारत नावाचा एक देश तयार करण्याची खटपट महात्मा गांधींनी केली. त्यांच्या प्रयत्नातून काँग्रेस ही चळवळ आणि नंतर पक्ष तयार झाला. काँग्रेस ही  राष्ट्रीय चळवळ आकार घेत होती तेव्हांच भाषा या कसोटीवर संघटना, राज्यं, यांचा विचार काँग्रेसला करावा लागला. जात, धर्म या बरोबरच भाषा या कसोटीवर चळवळीत विविध समाजगट संघटीत होत होते.  स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेच भाषावार प्रांत रचना करावी लागली. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पक्षानं राज्याराज्यातल्या भाषिक अस्मितांना, भाषक नेते आणि समाजगटांना काँग्रेसनं सामावून घेतलं. जोवर हे काँग्रेसनं सांभाळलं, चरण सिंग, यशवंतराव चव्हाण, पटनायक, कामराज, टी अंजय्या, इत्यादी स्थानिक लोकांना सत्तेत वाटा दिला, तोवर काँग्रेस शक्तीमान होती, इतर पक्षाना वावच नव्हता.
इंदिरा गांधीनी राज्याराज्यातल्या नेत्यांना संपवण्याचं, नमवण्याचं राजकारण सुरु केलं. राज्यातले स्थानिक बलवान नेते एकामागोमाग एक संपवण्याचा खटाटोप केला. त्यातून राज्य पातळीवरचे पक्ष तयार व्हायला सुरवात झाली.  काँग्रेसनं चव्हाण, पवार इत्यादीना कमकुवत केलं आणि सेनेला बी टीम म्हणून वापरलं. धड सत्तेत वाटा नाही आणि धड स्वतंत्र पक्ष म्हणून स्थान नाही अशा अवस्थेत सेनेनं एक स्वतंत्र रूप घेतलं, ताकद गोळा केली.
सेना ही एक स्वतंत्र ताकद तयार होत असतानाच जनता पक्ष नावाची एक शक्ती महाराष्ट्रात आकार घेत होती. पण ती टिकली नाही. जनता पक्षातले समाजवादी संपले, जनसंघ टिकला आणि भाजपत रूपांतरित झाला. भाजप आणि सेना दोघं एकत्र आले. १९९५ पर्यंत, थेट २०१४ पर्यंत भाजप ही देशात फार मोठी ताकद नव्हती, काँग्रेसपेक्षा भाजप लहान होता. सेना आणि भाजप यांना एकत्र नांदणं शक्य झालं. काँग्रेसच्या विरोधात तो दोघं मिळून विकसित झाले.  महाराष्ट्राच्या राजकारणातली पैस सेनेनं व्यापली आणि भाजपला सांभाळून घेतलं. २०१४ मधे मोदी लाटेनं भाजप देशात पहिल्या क्रमांकावर गेला. मुळातली ताकद फार तर पंधरा ते वीस टक्के असताना   काँग्रेस विरोध आणि मोदींच्या नेतृत्वाबद्दल आकर्षण या दोन गोष्टींसाठी भाजप ताकदीच्या व्यस्त प्रमाणात सत्तेत पोचला. महाराष्ट्रातलं समीकरण बदललं. आधी सेना नंबर एक आणि भाजप नंबर दोन होता. आता भाजप नंबर एक झाला (देशात). भाजपनं काँग्रेसकडून धडा न घेता आपलं एकहाती वर्चस्व स्थापण्याचा विचार केला. परंतू त्यांना शहाणपण आलं. बहुदा सत्तेनं शिकवलं असावं.
सेना आणि भाजप या दोन स्वतंत्र राजकीय संस्कृती, घटना आहेत.
सेना ही बाळ ठाकरे या व्यक्तीनं उभी केलेली संस्था आहे. ठाकरे यांचं व्यक्तिमत्व सेना या संघटनेत रूपांकित झालं आहे. ठाकरे कोणत्याही विचारधारेत वाढलेले नव्हते. ते एक व्यंगचित्रकार होते. व्यंगचित्रकार मार्मिक असतो, स्वतंत्र असतो. समाजात घडणाऱ्या घटना अचूक हेरून व्यंगचित्रकार त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत असतो. घटनांचं विश्लेषण करून त्यावर संपूर्ण एकात्म पर्याय व्यंगचित्रकार सुचवत नाही. एकादा पुढारी त्याला डुकरासारखा दिसतो, त्या पुढाऱ्याला डुकराचं रूप देऊन त्याच्या शेपटीच्या टोकाला एक गाठ व्यंगचित्रकार मारतो. पर्यायी विचार, कार्यक्रम इत्यादी दीर्घ आणि गुंत्याच्या गोष्टी व्यंगचित्रकार मांडत नाही. व्यंगचित्रकार हा सामान्य माणसासारखा असतो. घडणाऱ्या घटनांना एक तडक, तीव्र, तात्कालीक प्रतिक्रिया तो देतो.ती खरी असते, प्रामाणिक असते. महाराष्ट्रात आणि भारतातल्या घटना आणि प्रवाहांना ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.
‘ देशात समाजावादाची भाषा बोलली गेली, पण विकास झाला नाही. सरकार सेक्युलरिझमची भाषा करे पण मुसलमानांना चोंबाळत असे. महाराष्ट्रात मराठी माणसांचा विकास होत नाही, इतर भाषिकांची मात्र चलती होते. लोकशाही आणि शांततेच्या मार्गाचा उदोउदो होत असे पण दंगल केल्याशिवाय कोणतीही गोष्ट धसाला लागत नसे. आंबेडकर, फुले, शाहू महाराज यांच्या गोष्टी केल्या जात आणि सर्व पक्ष जातीचं राजकारण करत.’  या गोष्टी सामान्य माणसाला आवडत नसत. परंतू आपली नाराजी व्यक्त करणं त्याला शक्य नव्हतं. सेनेनं नेमकं यावर बोट ठेवलं.या व्यथा राजकीय पक्षांनीच निर्माण केल्या होत्या, पोसल्या होत्या. त्यामुळं सामान्य माणसं सामान्यतः राजकीय पक्षांपासून दूर होती. समाजात एक राजकीय पोकळी तयार झाली होती. बाळ ठाकरे यांनी ती भरून काढली. सामान्य माणसाची ही व्यथा ठाकरे यांनी मांडली. ठोकशाही, राडे, मुसलमान असोत की गुजराती कोणावरही धाडकन टीका, निवडणुकीत जातीचा विचार न करता माणसं उभी करणं, लोकशाही नाही आदेश. लोकांना हे आवडलं. सेना लोकप्रीय झाली.
भाजपचं चरित्र या पेक्षा वेगळं. भाजप हा एक राष्ट्रीय पक्ष. दीर्घ इतिहास. रास्व संघ, जनसंघ, जनता पार्टी, भाजप अशी या पक्षाची वाटचाल. सत्तर ऐंशी वर्षाची पार्श्वभूमी. भारत देश ही पक्षाची कर्मभूमी, मतदार संघ. देशातली सगळी माणसं, त्यांच्या जाती, त्यांचे धर्म, त्यांच्या भाषा आणि संस्कृती, त्यांच्या खऱ्या खोट्या अस्मिता, त्यांचे विविध आर्थिक वर्ग, त्यांचं शहाणपण आणि वेडेपण इत्यादी सगळ्या गोष्टींचा तोल सावरत भाजपला राजकारण करावं लागतं. त्यासाठी एक सम्यक एकात्मिक विचारधारा असावी लागते. ती करण्यासाठी खूप खटपट करावी लागते. मग कार्यकर्ते प्रशिक्षित करून तयार करावे लागतात. संघटना बांधावी लागते. म्हणजे केडर तयार करावं लागतं.
 हा  खटाटोप सुखासुखी नसतो. नाना परस्परांना छेद देणाऱ्या गोष्टी कराव्या लागतात कारण समाजातल्या सर्व स्तरांना सांभाळून घ्यावं लागतं. गरीबांची भाषा केली की धनवान नाराज होतात. एका जातीचं भलं की दुसरी जात वैतागते. एका राज्यात कारखाना उभारला की दुसरं राज्य वैतागतं. एका धर्माचं कौतुक केलं की दुसरा धर्म वैतागतो. भाजप हा हिंदू धार्जिणा पक्ष आहे. तसं असायलाही हरकत नाही. परंतू एका हद्दीपर्यंतच. त्यामुळं मुसलमानांनाही वरवर किंवा एका हद्दीपर्यंत खुष ठेवावंच लागतं. सर्वांना सांभाळणं, कोणालाही न वगळणं. मध्यम मार्ग. निदान पक्षी सर्वांचं हित आपण विचारात घेतो असं सर्व लोकांना वाटायला तरी हवं. यातून फार गुंते होतात. फायदे होतात आणि तोटेही होतात. एक फायदा झाला की लगेच दुसरा तोटा. भारतात जात, धर्म, भाषा, वर्ग, संस्कृती, घराणी, जिल्हे, इतिहास असे अनेक कप्पे आहेत. प्रत्येक कप्पा भावनाचिंब असतो. हे सर्व कप्पे सांभाळणं अशक्यच असतं. ते जास्तीत जास्त शक्य करण्याची खटपट करावी लागते. भाजप या राष्ट्रीय पक्षाचं हे चरित्र.
भाजपचं चरित्र आणि सेनेचं चरित्र यातला फरक आता लक्षात यावा. एकात्मिक सम्यक विचारधारा आणि केडर या मुख्य कसोट्यांवर दोन्ही पक्ष दोन टोकांवर आहेत, असणार, ते स्वाभाविक आहे. भारत या देशाचा इतिहास, गुंते, वैविध्य पाहिल्यावर भाजपसारखा देशपातळीवरचा पक्ष असणं आणि सेनेसारखा प्रादेशिक पक्ष असणं या गोष्टी अटळ दिसतात. जात, धर्म, संस्कृती, भाषा, इत्यादी कप्पे संख्येनं कमी कमी होऊन  आर्थिक आणि परदेश धोरण या दोन  मुद्यांवर येऊन जनता ठेपत नाही तोवर ही रचना अटळ दिसते. तो टप्पा अजून तरी बराच दूर आहे, दृष्टीपथात नाही. 
मार्क्सवादी असोत की काँग्रेस, सामान्यतः आपल्या ढोबळ चरित्राशी जुळणाऱ्या प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन त्यांनाही वाटचाल करावी लागेल.
म्हणूनच भाजप आणि सेनेनं एकत्र येणं, नांदणं आवश्यक आणि अटळ आहे. सेनेला नखं आहेत, दात आहेत, सेना गुरगुरते. वाघाची ती व्यवच्छेदक लक्षणं आहेत. ती नसतील तर वाघ वाघ रहाणार नाही, शेळी होईल. तेव्हां भाजपला या वाघाला वाघच ठेवून त्या सोबत एकत्र नांदायची सवय लावावी लागेल. एकेकाळी काँग्रेसला ही सवय होती. काँग्रेसनं ती गमावली, त्याचा परिणाम काँग्रेस भोगते आहे.
बिहारमधे नितीश कुमार यांच्याबरोबर भाजपनं दहा बारा वर्षांचा घरोबा केला. नितीश कुमार यांचा पक्ष भाजपच्या सांस्कृतीक चरित्राशी जुळणारा नसूनही जॉर्ज फर्नांडिस यांच्या कर्तृत्वामुळं जोडी जमली आणि टिकली. नेमकं का बिनसलं ते कळलेलं नाही. खरं म्हणजे बिहारमधे जोडी टिकायला हवी होती. बिहारमधे जे घडलं ते भाजप महाराष्ट्रात कितपत टाळतं ते पहायचं.
सेना भाजप सरकार घडणं यातून काँग्रेसनंही शिकायला हवं.  ष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातले संबंध दुरावले. आघाडी तुटण्याला आपण नव्हे ते कारणीभूत आहेत असं दोन्ही काँग्रेस म्हणतात. असेलही. दोन्ही पक्षांनी जातीचा हिशोब इतक्या टोकाला नेला की दलित, अल्पसंख्य, मध्यम जाती यांनाही पक्ष दुरावला. मध्यम मार्ग, सर्वांना सांभाळून घेणं ही काँग्रेसची जुनी परंपरा दोन्ही काँग्रेस विसरले.  दोन्ही काँग्रेसमधे शरद पवार सीनियर, जास्तीत जास्त अनुभवी.  हा माणूस खरं म्हणजे सर्वांना सांभाळून घेणारा आणि खऱ्या काँग्रेस संस्कृतीचा प्रतिनिधी.   आपल्या भोवती गणंग गोळा करण्याच्या नादात त्यानीही पृथ्वीराज चव्हाणांसारखा एक चांगला काँग्रेसी माणूस आणि जनाधार गमावला. पैसे जमवणारे पुढारी जोपासल्यामुळं खुद्द मराठा जातीतलीही माणसं त्यांच्यापासून दुरावली. पैसा खावा पण त्यात इतर चार माणसांनाही थोडा तरी वाटावा  हे शहाणपण पुढारी विसरले. भुजबळ, तटकरे, नाईक, पवार इत्यादी.  शरद पवार हा तोल सांभाळणारा आणि शहाणा माणूस.  त्यांचा काय घोटाळा झाला कळत नाही. राज्यातल्या सर्व लोकांना बरोबर घेणं सोडाच, काँग्रेस पक्षालाही सोबत ठेवणं त्यांना जमलं नाही.  
भाजपनं, भाजप-सेनेनं एक राजकीय वाट निर्माण केली आहे. स्थैर्य आल्यानं युती सरकारला आता कार्यक्रमांची अमलबजावणी करण्याची शक्ती आणि शांतता लाभेल. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. दुष्काळ आहे. पाण्याची टंचाई आणि गैरवाटप आहे. भ्रष्टाचार आणि दिरंगाईमुळं औद्योगीक वाढ मंदावली आहे. ही आव्हानं युती सरकारला पेलायची आहेत. दोन पक्ष म्हटल्यावर सत्तेची आणि सत्तेमुळं मावा खायची स्पर्धा काही प्रमाणात निर्माण होईल. दोन्ही पक्ष काँग्रेसइतके भ्रष्टाचारी नसले तरी तो दोष दोन्ही पक्षात शिरलेला आहे. तो आटोक्यात आणावा लागेल. धर्म आणि जातीची तेढ वापरून घेण्याचा मोहही कदाचित सत्ताधारी पक्षांना होईल. पण तो टाळला तर बरं. 
फडणवीस शहाणे आहेत, विवेकी आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत.त्यांना विधीमंडळ आणि सरकार या दोहोंचा चांगला परिचय आहे. ते निर्णय घेतील आणि अमलातही आणतील अशी आशा बाळगायला जागा आहे. फक्त फार बोलतात येवढंच.  
पाहूया
हित आपण विचारात घेतो असं सर्व लोकांना वाटायला तरी हवं. यातून फार गुंते होतात. फायदे होतात आणि तोटेही होतात. एक फायदा झाला की लगेच दुसरा तोटा. भारतात जात, धर्म, भाषा, वर्ग, संस्कृती, घराणी, जिल्हे, इतिहास असे अनेक कप्पे आहेत. प्रत्येक कप्पा भावनाचिंब असतो. हे सर्व कप्पे सांभाळणं अशक्यच असतं. ते जास्तीत जास्त शक्य करण्याची खटपट करावी लागते. भाजप या राष्ट्रीय पक्षाचं हे चरित्र.
भाजपचं चरित्र आणि सेनेचं चरित्र यातला फरक आता लक्षात यावा. एकात्मिक सम्यक विचारधारा आणि केडर या मुख्य कसोट्यांवर दोन्ही पक्ष दोन टोकांवर आहेत, असणार, ते स्वाभाविक आहे. भारत या देशाचा इतिहास, गुंते, वैविध्य पाहिल्यावर भाजपसारखा देशपातळीवरचा पक्ष असणं आणि सेनेसारखा प्रादेशिक पक्ष असणं या गोष्टी अटळ दिसतात. जात, धर्म, संस्कृती, भाषा, इत्यादी कप्पे संख्येनं कमी कमी होऊन  आर्थिक आणि परदेश धोरण या दोन  मुद्यांवर येऊन जनता ठेपत नाही तोवर ही रचना अटळ दिसते. तो टप्पा अजून तरी बराच दूर आहे, दृष्टीपथात नाही. 
मार्क्सवादी असोत की काँग्रेस, सामान्यतः आपल्या ढोबळ चरित्राशी जुळणाऱ्या प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन त्यांनाही वाटचाल करावी लागेल.
म्हणूनच भाजप आणि सेनेनं एकत्र येणं, नांदणं आवश्यक आणि अटळ आहे. सेनेला नखं आहेत, दात आहेत, सेना गुरगुरते. वाघाची ती व्यवच्छेदक लक्षणं आहेत. ती नसतील तर वाघ वाघ रहाणार नाही, शेळी होईल. तेव्हां भाजपला या वाघाला वाघच ठेवून त्या सोबत एकत्र नांदायची सवय लावावी लागेल. एकेकाळी काँग्रेसला ही सवय होती. काँग्रेसनं ती गमावली, त्याचा परिणाम काँग्रेस भोगते आहे.
बिहारमधे नितीश कुमार यांच्याबरोबर भाजपनं दहा बारा वर्षांचा घरोबा केला. नितीश कुमार यांचा पक्ष भाजपच्या सांस्कृतीक चरित्राशी जुळणारा नसूनही जॉर्ज फर्नांडिस यांच्या कर्तृत्वामुळं जोडी जमली आणि टिकली. नेमकं का बिनसलं ते कळलेलं नाही. खरं म्हणजे बिहारमधे जोडी टिकायला हवी होती. बिहारमधे जे घडलं ते भाजप महाराष्ट्रात कितपत टाळतं ते पहायचं.
सेना भाजप सरकार घडणं यातून काँग्रेसनंही शिकायला हवं.  ष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातले संबंध दुरावले. आघाडी तुटण्याला आपण नव्हे ते कारणीभूत आहेत असं दोन्ही काँग्रेस म्हणतात. असेलही. दोन्ही पक्षांनी जातीचा हिशोब इतक्या टोकाला नेला की दलित, अल्पसंख्य, मध्यम जाती यांनाही पक्ष दुरावला. मध्यम मार्ग, सर्वांना सांभाळून घेणं ही काँग्रेसची जुनी परंपरा दोन्ही काँग्रेस विसरले.  दोन्ही काँग्रेसमधे शरद पवार सीनियर, जास्तीत जास्त अनुभवी.  हा माणूस खरं म्हणजे सर्वांना सांभाळून घेणारा आणि खऱ्या काँग्रेस संस्कृतीचा प्रतिनिधी.   आपल्या भोवती गणंग गोळा करण्याच्या नादात त्यानीही पृथ्वीराज चव्हाणांसारखा एक चांगला काँग्रेसी माणूस आणि जनाधार गमावला. पैसे जमवणारे पुढारी जोपासल्यामुळं खुद्द मराठा जातीतलीही माणसं त्यांच्यापासून दुरावली. पैसा खावा पण त्यात इतर चार माणसांनाही थोडा तरी वाटावा  हे शहाणपण पुढारी विसरले. भुजबळ, तटकरे, नाईक, पवार इत्यादी.  शरद पवार हा तोल सांभाळणारा आणि शहाणा माणूस.  त्यांचा काय घोटाळा झाला कळत नाही. राज्यातल्या सर्व लोकांना बरोबर घेणं सोडाच, काँग्रेस पक्षालाही सोबत ठेवणं त्यांना जमलं नाही.  
भाजपनं, भाजप-सेनेनं एक राजकीय वाट निर्माण केली आहे. स्थैर्य आल्यानं युती सरकारला आता कार्यक्रमांची अमलबजावणी करण्याची शक्ती आणि शांतता लाभेल. महाराष्ट्राची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. दुष्काळ आहे. पाण्याची टंचाई आणि गैरवाटप आहे. भ्रष्टाचार आणि दिरंगाईमुळं औद्योगीक वाढ मंदावली आहे. ही आव्हानं युती सरकारला पेलायची आहेत. दोन पक्ष म्हटल्यावर सत्तेची आणि सत्तेमुळं मावा खायची स्पर्धा काही प्रमाणात निर्माण होईल. दोन्ही पक्ष काँग्रेसइतके भ्रष्टाचारी नसले तरी तो दोष दोन्ही पक्षात शिरलेला आहे. तो आटोक्यात आणावा लागेल. धर्म आणि जातीची तेढ वापरून घेण्याचा मोहही कदाचित सत्ताधारी पक्षांना होईल. पण तो टाळला तर बरं. 
फडणवीस शहाणे आहेत, विवेकी आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत.त्यांना विधीमंडळ आणि सरकार या दोहोंचा चांगला परिचय आहे. ते निर्णय घेतील आणि अमलातही आणतील अशी आशा बाळगायला जागा आहे. फक्त फार बोलतात येवढंच.  
पाहूया

मद्य मधे मधे

मद्य मधे मधे

व्हिस्की
व्हिस्की बायबल नावाच्या एका नियतकालिकानं स्कॉटलंडमधे तयार होणाऱ्या स्कॉच व्हिस्कीला दर्जेदार व्हिस्कीच्या क्रमवारीत खाली ढकललं आहे.
व्हिस्की बायबल नावाचं एक गाईड निघतं. बायबल या धर्मग्रंथाच्या नावाचा वापर ब्रँडसाठी करणं, आपल्या गाईडच्या प्रचार-प्रसारासाठी  करणं हा प्रकार पश्चिमेतलेच लोक करू जाणोत. भारतात असं काही करून पहावं आणि त्याची काय प्रतिक्रिया येईल याची कल्पना करावी. असो.
तर २००३ पासून हे गाईड प्रसिद्ध होतं. जगभरच्या व्हिस्क्यांचा अभ्यास या गाईडमधले जाणकार करतात. नंतर त्यांच्या ज्या काही कसोट्या असतात त्यानुसार ते व्हिस्कीला क्रमांक देतात. पहिला  जपानमधल्या यामाझाकी सिंगल माल्ट या व्हिस्कीला मिळाला. ( जपान ओळखलं जातं ते साके या मद्यासाठी ) यामाझाकी तयार करणारी जपानी डिस्टिलरी १९२३ पासून वरील व्हिस्की तयार करतेय. स्कॉचच्या तुलनेत या व्हिस्कीच्या बाटल्या जगभर खपत नाहीत. भारतातल्या मद्यप्रेमी माणसांनी यामाझाकी हे नावही ऐकलेलं नाही. याचं कारण स्कॉचचं मार्केटिंग झालं, यामाझाकी व्हिस्कीचं मार्केटिंग झालं नाही. बोलणाऱ्याची माती खपते न बोलणाऱ्याचं सोनंही खपत नाही. असो.
नंतरचा क्रमांक अमेरिकन व्हिस्कीचा लागला. ती तर एक गंमतच आहे. अमेरिकेत जॅक डॅनियल्स ही व्हिस्की राष्ट्रीय पेय असल्यासारखी प्रसिद्ध आहे. अमेरिकेतल्या बारमधे गेल्यावर टेंडर कोणती व्हिस्की हवी असं विचारतो. भारतीय माणूस स्कॉचचं नाव घेतो. बार टेंडर तोंड आंबट करतो. कसली आलीय  स्कॉच, जॅक डॅनियल्सची चव कोणत्याही व्हिस्कीला नाही असं तो म्हणतो. ते अमेरिकन लोकमत असतं.
मार्केटिंग. अगदी परवा परवापर्यंत वाईन म्हटलं की फ्रेंच वाईनचं नाव घेतलं जात असे. जगभर. लोक आता ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका इथल्या वाईन चाखू लागले आहेत. खुद्द फ्रान्समधल्या वाईन सेलरमधेही शेकडो आफ्रिकन वाईन्स डौलानं उभ्या दिसतात. आफ्रिकन वाईन उत्पादकांनी आपापलं मार्केटिंग जोरात केल्याचा हा परिणाम. भारतात नाशिकच्या वाईन्स आता लोकप्रिय झाल्या आहेत, दर्दी आणि दिखाऊ असे दोन्ही पार्टीबाज नाशीकच्या वाईन्स चवीनं घेतात. अमेरिकेतल्या कित्येक वाईन शॉपमधे नाशिकच्या वाईन असतात, भारतीय लोक त्या घेतात, हळू हळू अमेरिकन लोकही नाशीकच्या वाईन घेऊ लागले आहेत.
मार्केटिंग हे प्रकरण तसं गुंत्याचं. आमची व्हिस्की कशी दाट, स्मूथ, ड्राय आहे, ती कशी सिंगल माल्ट आहे, माल्ट कुठला आहे इत्यादी गोष्टी मार्केटिंग करणारे ठासून सांगतात. व्हिस्की परिषदा, व्हिस्की सोहळे, व्हिस्की मेळावे त्यासाठी भरवले जातात. लंडनमधे एक  पुस्तकांचं  दुकानं एक खास आठवडा साजरा करतं.  चांगली पुस्तकं, नामांकित लेखक हजर असतात.  त्या प्रसंगी ब्रीटनमधल्या नामांकित व्हिस्क्या रसिकांना दिल्या जातात ( फुकट ). वाचक, विद्वान मंडळी व्हिस्कीची लज्जत चाखत संध्याकाळी व्यतित करतात. फुकट मिळतेय म्हणून तिथं कोणी झिंगत नाही की ओकत नाही की ग्लासं ओरबाडत नाही.
सहा महिन्यांपूर्वी युरोपीय व्हिस्की उत्पादकांनी एक परिषद भरवली. या परिषदेत भारतीय व्हिस्क्यांवर बंदी घालावी अशी मागणी झाली. परिषदेचं म्हणणं होतं ” भारतातल्या व्हिस्क्या दर्जेदार, अस्सल व्हिस्क्या नसतात. त्या माल्टपासून तयार करत नाहीत. साखर कारखान्यातून निघणाऱ्या मळीपासून, मोलासिसपासून त्या तयार केल्या जातात. मोलासिसमधून अल्कोहोल निघतो. व्हिस्की उत्पादक त्यात रंग आणि स्वाद मिसळतात आणि व्हिस्की या नावानं खपवतात. खरी व्हिस्की माल्टपासून तयार होते, हा माल्ट ज्या धान्यापासून तयार होतो ते धान्य नैसर्गिक रीतीन विशिष्ट वाणापासून तयार केलं जातं. नंतर या व्हिस्क्या विशिष्ट प्रकारच्या लाकडापासून तयार झालेल्या पिंपात ठेवल्या जातात. ही लाकडं व्हिस्कीतली घातक द्रव्यं शोषून घेतात आणि लाकडांमधे असलेला नैसर्गिक स्वाद त्या व्हिस्कीत मिसळतात. हे सारं फार सावकाशीनं घडत असल्यानं १२ वर्षं, २५ वर्षं, १०० वर्षं जुनी व्हिस्की अशा ‘ चढत्या ‘ क्रमानं  व्हिस्कीचा दर्जा ठरतो.  भारतात यातलं काहीच घडत नाही.”
असो.

चियर्
अस्पृश्यता अजूनही शिल्लक

अस्पृश्यता अजूनही शिल्लक

भारतात २७ टक्के माणसं अस्पृश्यता पाळतात असं एका देशी-परदेशी अभ्यास संस्थेनं (IHDS) शोधलं आहे.  जैन, हिंदू, मुस्लीम, शिख,ख्रिस्ती अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास, ब्राह्मण, इत्यादी वर्गातल्या ४७ हजार लोकांच्या मुलाखती झाल्या. मुलाखतीत पहिला प्रश्न विचारला होता ‘ तुम्ही अस्पृश्यता पाळता?’ त्याला ७५ टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं. नंतरचा  प्रश्न होता ‘ तुम्ही अनुसुचित जाती, शेड्यूल्ड कास्टच्या लोकांना स्वयंपाकघरात प्रवेश द्याल ? आपली भांडी त्याना वापरायला द्याल? ‘  त्यावर सत्तावीस टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं.
ब्राह्मण ( ५२ ), पुढारलेले ( २४), ओबीसी (३३), अनुजाती (१५), अनुजमाती (२२) इतर (१५) अशी टक्के फोड अभ्यासकांनी दिली आहे. धर्माच्या हिशोबात जैन ( ३५), हिंदू (३०), शिख (२३), मुस्लीम (१८), ख्रिस्ती (५), बौद्ध (१) अशी टक्केफोड आहे.
 कित्येक शतकांची अस्पृश्यता अजूनही एका रुपात  दर चारात एक माणूस पाळतो. 
ही माणसं पुर्वास्पृश्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दूर रहात नाहीत. बसमधे, ट्रेनमधे, रेस्त्रांमधे, सिनेमात कुठंही आता कोणालाही स्पर्श टाळता येणं शक्य नाही. काळाच्या ओघात ते अशक्य झालंय. काही लोकांनी वाट काढलीशी दिसतेय, पूर्वास्पृश्यांना स्वयंपाकघरात प्रवेश न देण्याची.
काळाच्या ओघात भारतात जाती तयार झाल्या. दीर्घ काळाच्या प्रक्रियेतून जातीनं आकार घेतला. जात ही एक सामाजिक व्यवस्था तयार करण्यात आली. या व्यवस्थेनं समाजाला स्थैर्य दिलं. भारतातल्या िवशिष्ट राजकीय, सामाजिक, प्रशासकीय, आर्थिक स्थितीत वारंवार संकटं येत असत. जातीनं माणसांना तगवलं. परंतू तगण्या पलिकडं, तरंगण्या पलिकडं माणसांना जाऊ दिलं नाही. व्यक्ती म्हणून या व्यवस्थेनं माणसाला स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा दिली नाही. जात हा म्हटलं तर एक पिंजरा होता. त्या पिंजऱ्यात मालक पदार्थ  टाकत होता, आतला पक्षी-प्राणी (मालकाच्या मेहेरबानीवर) जगत होता. जगण्यासाठी खटपट न करून भागत  असे.  तो पिंजरा असल्यानं आतल्या प्राण्याला ना प्रतिष्ठा, ना विकास साधण्याची मुभा. माणसं जगली पण त्यांची कार्यक्षमता, त्यांची अनेकांगी वाढ खुरटली.
ब्रिटीशांच्या आगमनानंतर आधुनिकतेचा विचार भारतात घोंगावला. जातीची चौकट मोडून माणसं स्वतंत्र होण्याचा विचार सुरु झाला. विशेष प्रोत्साहन, राखीव जागा या वाटा शोधण्यात आल्या. विसाव्या शतकाच्या सुरवातीपासूनच ही प्रोत्साहनं सक्रीय झाली. स्वातंत्र्यानंतर ती अधिक गतीनं  अमलात आली. आधुनिकता, शहरीकरण, औद्योगीक संस्कृती आणि आता जागतिकीकरण यामुळं विकासाच्या वाटा अधिक मोकळ्या झाल्या. त्याचा चांगला परिणामही अर्थातच झाला. नाकारलेल्या समाजातली कित्येक माणसं समाजाच्या व्यापक प्रवाहात सामिल झाली. 
परंतू वंचितांची संख्या फार मोठी आणि वंचितांना सामावून घेण्याची अनिच्छा याचा परिणाम म्हणून बरीच वंचित माणसं विकासापासून वंचित राहिली. वंचितांची समस्या शिल्लक राहिली, आरक्षणाची मागणी होत राहिली, आरक्षण व्यवस्था शिल्लक राहिली.
याच काळात वंचित नसलेल्या, आरक्षणाच्या बाहेर असलेल्या समाजातही स्वतंत्रपणे प्रश्ण निर्माण झाले. आर्थिक विकासाची गती आणि दोष यामुळं वंचित नसलेल्या समाजातही अविकसित माणसं तयार झाली, लक्षात यावी इतक्या संख्येनं. मराठा या एका मोठ्या विस्कळित वर्गातल्या काही लोकांकडं महाराष्ट्रातली सत्ता असूनही त्या वर्गात कित्येक माणसं वंचित राहिली, गरीबीत अडकली. प्रमाणानं लहान असलेल्या ब्राह्मण समाजात गरीबी नसली, शैक्षणिक मागासलेपण नसलं तरी शिक्षणातल्या आणि नोकऱ्यातल्या संधी त्यांच्याकडं गुणवत्ता असून नाकारल्या गेल्या. आरक्षणाचं धोरण अमलात आणलं जात असतांना, त्या धोरणाचा अपेक्षित परिणाम होत नसतांना ही एक नवी समस्या निर्माण झाली. 
या समस्यांचा गैरअर्थ घेऊन, त्याचा गैरवापर करण्याचं ठरवून राजकीय पक्ष, राजकीय गट आणि पुढारी मतांचं राजकारण करू लागले. गतीमान आर्थिक विकास हा मुख्य उपाय दूर सारून ही मंडळी आधीच कमी झालेल्या संधींमधे जास्तीत जास्त माणसांचा शिरकाव करण्याचे डाव खेळू लागली. आर्थिक विकास आणि आपली कार्यक्षमता न वाढवता केवळ आरक्षणाच्या वाटेनं नोकऱ्या आणि शिक्षणाकडं ही माणसं लोकांना लोटू लागली. कमी असलेल्या भाकऱ्या वाढवण्याऐवजी असलेल्या भाकऱ्यांमधे अधिकाधीक वाटेकरी वाढवण्याची चढाओढ राजकीय पक्ष आणि राजकीय गटांमधे लागली. मतांच्या हिशोबात ते उपयोगी पडू लागलं. 
यातून एक नवी गोष्ट उभी राहिली. गुणवत्ता, दर्जा, कार्यक्षमता या गोष्टींचं महत्व कमी झालं. या तीनही गोष्टी आपापल्या समाजात वाढवण्याचे विधायक प्रयत्न समाज गटांनी सोडून दिले, किवा त्याकडं दुर्लक्ष केलं. नोकरी, बढत्या, शैक्षणिक संस्थात प्रवेश यावर सारं लक्ष दिलं. परिणामी वंचित समाज गटांमधे आपसात तणाव निर्माण झाले, वंचित आणि वंचित नसलेले यांच्यातही तणाव निर्माण झाले.
आज सरकारी खाती आणि कार्यालयं, शिक्षण संस्था यांच्यात जातीय तणाव धुमसतो आहे. 
जवखेड्यातील दलित कुटुंबातल्या व्यक्तींचा क्रूर आणि अमानुष खुन हे त्या धुमसत्या तणावाचं एक उदाहरण असू शकेल. कदाचित स्वयंपाकघरातली अस्पृश्यता हेही त्या तणावाचंच एक रूप असू शकेल.
वेगवान आर्थिक विकास हे एक उत्तर आहे. त्या विकासाच  गाडं पुरातन-निष्प्रभ आर्थिक-राजकीय विचारधारांमधे अडकलेलं आहे. बदलता काळ विचारात घ्यायला राजकीय-आर्थिक विचारधारा तयार नाहीत. अस्पृश्यतेचा विचार सांस्कृतीक-सामाजिक-धार्मिकही आहे.  त्या बाबतही  सामाजिक-सांस्कृतीक-धार्मिक विचारधाराही फार पुरातन काळात अडकलेल्या आहेत. काही अंशी जुनाट आणि बुरसटलेले विचार पुन्हा डोकं वर काढतांना दिसतात. सक्रीय सुधारक विचार कमी होताना दिसतात.बदललेल्या काळात समाजाची नव्यानं मांडणी करायला  सामाजिक-धार्मिक-सांस्कृतीक विचारधारा तयार नाहीत. विसाव्या शतकाच्या सुरवातीला सामाजिक-धार्मिक-सांस्कृतीक सुधारणांचा समाजाला हलवणारा विचार सुधारकांनी मांडला होता. शाहू महाराज, फुले, आंबेडकर, सावरकर, रानडे, आगरकर अशी कित्येक माणसं होऊन गेली. स्वातंत्र्य मिळण्याच्या सुमारास तो विचार क्षीण होत गेला. बाबा आढाव, हमीद दलवाई यांच्यासारखे अगदीच अपवादात्मक सक्रीय विचारवंत गेल्या पन्नास वर्षात टिकले.
प्रस्तुत अभ्यासामुळं या स्थितीचा काही एक अंदाज येतो आहे.

वेळीच जागं व्हायला हवं.