Browsed by
Month: January 2015

शार्ले हेबडो

शार्ले हेबडो

 ७ जानेवारी २०१५ रोजी तीन जण एके सत्तेचाळीस घेऊन पॅरिसच्या शार्ली हेबडो या व्यंगचित्र साप्ताहिकाच्या कार्यालयात घुसले. आतमधे संपादकीय बैठक चालली होती. बैठकीतल्या माणसांना ओळखून, त्यांची नावं घेऊन बंदुकधाऱ्यांनी गोळीबार केला. १२ पत्रकारांना ठार मारलं. मारेकरी होते शेरीफ आणि सईद क्वाची, भाऊ भाऊ. एकानं कारवाईच्या आधी एक व्हिडियो क्लिप पाठवली होती. आपण इराकमधल्या आयसिस या दहशतवादी संघटनेचे आहोत असं तो त्या क्लिपमधे म्हणाला. दुसऱ्यानं पोलिसांच्या गोळ्यांना बळी जाण्याआधी गर्वानं सांगितलं की त्याला येमेनमधल्या अल कायदाच्या शाखेनं या कारवाईसाठी धाडलं होतं. अल…

Read More Read More

भाजप भगवी काँग्रेस होणं ही राजकीय अपरिहार्यता?

भाजप भगवी काँग्रेस होणं ही राजकीय अपरिहार्यता?

दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांमधे भाजपनं किरण बेदी यांना दिल्लीच्या भविष्यातील मुख्यमंत्री घोषित केलं आहे. दोनच दिवस आधी त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आणि लगोलग मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार जाहीर झाल्या. पक्षात प्रवेश देणं आणि मुख्यमंत्रीपदाचा इरादा जाहीर करणं या दोन्ही घटनांना भाजपच्या दिल्लीतल्या कार्यकर्त्यांचा आक्षेप होता. पक्षाच्या दिल्ली संघटनेला न विचारता हा निर्णय झाला या बद्दल कार्यकर्त्यांची नाराजी होती. त्यांना पक्षात घेणं आणि मुख्यमंत्री घोषित करणं हे निर्णय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी घेतले, पक्षातली इतर माणसं या निर्णयात सहभागी नव्हती. अमीत…

Read More Read More