Browsed by
Month: June 2015

मॅगी… मॅगी

मॅगी… मॅगी

गंधर्व चौकातली  साई निवास इमारत. तीन मजली. इमारतीच्या तळाशी   फूटपाथवर नूडल्सवाली गाडी. गाडीपाशी वर्दळ. ‘ दो प्लेट मॅगी ‘… ‘ एक प्लेट मॅगी ‘ … ‘ एक प्लेट मॅगी ‘… गाडीला तीनही बाजूनी लोकांनी घेरलं होतं. गाडीवाला मोठ्या कढईत नूडल्स ढवळत होता. मधे मधे चिरलेला कांदा, गाजर आणि ढोबळी मिरची कढईत सोडत होता, ढवळत होता. ‘ दो मिनिट रुको. अभी तय्यार होगा.’ गाडीवाला गिऱ्हाइकांना थोपवून धरत होता. फूटपाथवर वाटसरूंची वर्दळ होती. गाडीच्या भोवती नूडल्स खाणाऱ्यांचा गोतावळा वाटसरूना अडथळा करत…

Read More Read More

फूटबॉलवाले ब्लाटर क्रिकेटवाल्या श्रीनिवासन यांच्याशी बोलतात तेव्हां

फूटबॉलवाले ब्लाटर क्रिकेटवाल्या श्रीनिवासन यांच्याशी बोलतात तेव्हां

शृंगेरी मठ.  मंत्रोच्चारण चाललंय. श्रीनिवासन यांच्या जानव्याच्या टोकाला बांधलेला फोन थरथरतो. सायलेंटवर असल्यानं आवाज येत नाही. सभोवतालच्या घनगंभीर मंत्रवातावरणात श्रीनिवासन मग्न. श्रीनिवासन यांच्या अंगरक्षकाच्या ते लक्षात येतं. अंगरक्षकही धोतर नेसून त्यांच्या शेजारी बसलेला असतो. साहेबांना डिस्टर्ब करायचा धीर त्याला होत नाही. थरथर थांबत नाही. नाईलाजानं अंगरक्षक श्रीनिवास यांच्या मांडीवर टकटक करतो. एकदा. दोनदा. तिसऱ्या वेळी श्रीनिवासन त्रासिक नजरेनं रक्षकाकडं पहातात. रक्षक हावभाव करून फोन घ्या असं सांगतो. श्रीनिवासन फोनकडं पहातात. क्षणभर फोन घ्यावा की नाही या गोंधळात. उठतात. हॉलच्या बाहेर…

Read More Read More