Browsed by
Month: October 2016

पुस्तकांचा इतिहास सांगणारं पुस्तक

पुस्तकांचा इतिहास सांगणारं पुस्तक

Books Living History Martyn Lyons ।।  बुक्स, लिविंग हिस्टरी या पुस्तकात लेखक मार्टिन लियॉन्स म्हणतात ” छापील पुस्तकाला बॅटरी लागत नाही. त्याला व्हायरसही लागत नाही. पुस्तक बंद करताना ते सेव्ह करावं लागत नाही, कारण त्यातल्या मजकूर कायम सेव्ह्ड असतो.” ।। वाचक हल्ली टॅब, रीडर,सेलफोन अशा उपकरणावर पुस्तकं वाचतात. त्या उपकरणावर पुस्तकं ऐकताही येतात. इकॉनॉमिक्स या साप्ताहिकाचा सगळा अंक ऐकता येतो. यू ट्यूबवर लेखकांची त्यांच्या पुस्तकांवरची भाषणं ऐकता येतात. दीड दोन तासाच्या भाषणात किंवा वाचकांच्या चर्चेत लेखक आपल्या पुस्तकाबद्दल बोलतात. वरील…

Read More Read More

बॉब डिलनना नोबेल, चाकोरीला वळसा

बॉब डिलनना नोबेल, चाकोरीला वळसा

बॉब डिलनना नोबेल, चाकोरीला वळसा  बॉल डिलनना साहित्याचं नोबेल पारितोषिक मिळालं. नोबेल बक्षिसाचा गौरवोल्लेख असा  ” Having created new poetic expression within the great American song tradition.”   यावेळी पारितोषिकासाठी अनेक नावं होती. अनेक वर्षं रांगेत असलेले फिलिप रॉथ होते. हारुकी मुराकामी तर होतेच. डिलनचं नाव कोणाच्याही डोक्यात नव्हतं. कुणकुण लागली तेव्हां न्यू रिपब्लिक या नियतकालिकानं एक लेख लिहिला. शीर्षक होतं – यंदा साहित्याचं नोबेल कोणाला मिळणार? बॉब डिलनला नक्कीच नाही. स्विडीश कमिटीचे अॅकॅडमिक संचालक बॉबला गाठायचा प्रयत्न करत होते.बॉब…

Read More Read More

गाभा हरवलेलं अमेरिकन शिक्षण

गाभा हरवलेलं अमेरिकन शिक्षण

नागरीक  विवेकी असतील, सहनशील असतील, सज्जन असतील, माणुसकी असलेली असतील तर समाजाचं भलं होतं, समाज विकसित होतो. वरील गुणवैशिष्ट्यं माणसात जन्मतः नसतात, ती त्याच्यामधे विकसित होत असतात. घरातलं वातावरण, समाजातलं वातावरण, वरील गुणांना प्रोत्साहन देणाऱ्या संस्था आणि माणसं घडवणारं शिक्षण-साहित्य-पत्रकारी हे घटक समाजात सुस्थित असतील तर माणसांमधे वरील गुणवैशिष्ट्यं निर्माण व्हायला मदत होते. हे भान अमेरिकन समाजात (कुठल्याही समाजात) कधी कधी असतं, कधी कधी ते सुटतं. ते भान सुटल्याची अवस्था गेली काही वर्षं अमेरिकेत आहे. अमेरिकन शिक्षण व्यवस्थेत तसं दिसतय….

Read More Read More

दारुबंदी. एक देशी वैश्विक घोळ

दारुबंदी. एक देशी वैश्विक घोळ

 दारूबंदीचा घोळ बिहार सरकारनं नोव्हेंबर २०१५ मधे दारुबंदी केली. दारू उत्पादन, व्यापार, बाळगणं आणि पिणं यावर सरकारनं बंदी घातली. सप्टेंबर २०१६ मधे पाटणा ऊच्च न्यायालयानं बंदी बेकायदेशीर ठरवली. बिहार सरकार आता  या बंदीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. बंदीचा सुधारीत आदेश बिहार सरकारनं लगोलग जाहीर केला आहे. पुरुष दारू पितात, उत्पन्नाचा बराच भाग दारूवर खर्च करतात, कौटुंबिक आर्थिक जबाबदाऱ्या पार पाडत नाहीत, नशेमधे कुटुंबियांना (विशेषतः बायकांना) मारहाण करतात अशा फार तक्रारी बिहारी स्त्रियांनी केल्या आणि दारुबंदीची मागणी केली. दारूमुळं भ्रष्टाचारही…

Read More Read More