Browsed by
Month: December 2017

बलात्कार, एक मामुली गोष्ट

बलात्कार, एक मामुली गोष्ट

अरे तू बलात्कार केलायस. उंह: त्यात काय मोठंसं. अरे ती जखमी झालीय. औषधोपचार करा. हवं तर मी पैसे देतो. अरे ती मेलीय. जा, तिच्या नातेवाईकांना भरपाई द्या. अरे पण तिला त्रास देण्याचा अधिकार तुला कोणी दिला. अधिकाराचा काय प्रश्न. माझी गरज होती, मी भागवली. १४ डिसेंबर २०१७.गाव, बोको. जिल्हा कामरुप, आसाम. आई वडील गावाजवळच्या वीट भट्टीवर कामाला गेले होते. १४ वर्षाची मुलगी घरी होती. काही जण (नेमके किती?) घरी पोचले. मुलीला पकडून गावात अन्यत्र नेलं. सर्वांनी मिळून तिच्यावर बलात्कार केला.इतका…

Read More Read More

पास्ता आणि रसगुल्ला

पास्ता आणि रसगुल्ला

इटालीतल्या पार्मा या शहरात पास्ता तयार करण्याची स्पर्धा भरली होती. स्पर्धेचं शीर्षक होतं ‘ पास्ताचं भविष्य ‘. भविष्यात पास्ता कसा असेल.बरिला या पास्ता तयार करणाऱ्या कंपनीनं स्पर्धा स्पॉन्सर केली होती. पास्ता हा इटालियन लोकांच्या अभिमानाचा आणि अस्मितेचा विषय. खरा पास्ता फक्त आम्हीच तयार करू शकतो असं इटालियन लोकांना वाटतं. इटालियन पदार्थ वैश्विक करण्याची खटपट बरिला करत असते. जास्तीत जास्त आपला पास्ता जगभरात खपवणं हा कंपनीचा फंडा. जगभरातले फार म्हणजे फार लोकप्रीय आचारी (शेफ) स्पर्धेसाठी पार्मात गोळा झाले होते. टोकियो, लंडन,…

Read More Read More

‘ फादर ‘ बाप, नसीरुद्दीन शहा

‘ फादर ‘ बाप, नसीरुद्दीन शहा

  पृथ्वी थेटर पावणे नऊ झाले होते. माणसं दरवाजाबाहेर रांग करून उभी होती. शांतपणे. हातात फादर या नाटकाचं ब्रोशर. दहाएक मिनिटांनी दरवाजा उघडणार होता. गोंगाट नव्हता, माणसं आपसात किंवा सेलफोनशी कुजबुजत होती, ओठ हालत होते, ध्वनी उमटत नव्हता. दरवाजा उघडला. माणसं अलगतपणे थेटरात पोचली. रंगमचाच्या जमिनीवर रूंद पांढऱ्या  चिकटपट्ट्यांनी खोल्यांच्या भिंतींची जागा आखली होती. तीन खोल्या. एक किचन. एक लिविंग रूम आणि एक अशीच खोली. पाच ते सहाच फर्निचर वस्तू मंचावर. मंद प्रकाश. मंचाच्या तीन बाजूंनी बसायची सोय. ट्रेनमधे पूर्वी…

Read More Read More

सोशल मीडियानं लोकशाहीचा ताबा घेतलाय?

सोशल मीडियानं लोकशाहीचा ताबा घेतलाय?

लोकशाहीचा ताबा  सोशल मिडियानं घेतल्यासारखं दिसतय. अमेरिका,जर्मनी, फ्रान्स, युके, स्पेन  हे देश त्यांच्या सार्वजनिक जीवनात  सोशल मिडियानं घातलेल्या गोधळानं चिंतीत झालेत. २०१६ ची अमेरिकेची  अध्यक्षीय निवडणुक. प्रचार मोहिमेत भाषणं करकरून, तर कधी सर्दीमुळं हिलरी क्लिंटनचा घसा बसला होता. त्या खोकत होत्या. कधी काळी कुठल्या तरी कारणासाठी क्लिंटन तपासणीसाठी डॉक्टरांकडं गेल्या होत्या. डॉक्टरकडं जाणं आणि खोकल्याची दृश्यं या दोन एकमेकांशी संबंध नसलेल्या घटना एकत्र जोडून क्लिंटन  गंभीर आजारी आहेत, त्यांना मत देणं धोक्याचं आहे असा संदेश सोशल मिडियात ट्रंप मोहिमेनं पसरवला….

Read More Read More

एका राजपुत्राचं लग्न

एका राजपुत्राचं लग्न

राजपुत्र हॅरीचा क्रमांक आहे पाच. जेव्हां केव्हां सिंहासन मोकळं होईल तेव्हां आधी राजपुत्र चार्ल्सचा (हॅरीचा पिता) क्रमांक पहिला. कारण ते राणीचे सर्वात मोठे पुत्र. त्यांच्यानंतर त्यांचे मोठे पुत्र विल्यम्स (हॅरीचा मोठा भाऊ) यांचा नंबर. त्यानंतर विल्यम्स यांच्या मुलाचा (हॅरीचा पुतण्या) नंबर. विल्यम्सना एक मुलगीही (हॅरीची पुतणी) आहे. तिचाही राणी म्हणून नंबर लागू शकतो, पण आधी क्रमांक तिच्या भावाचा कारण ब्रिटीश परंपरेनुसार आधी अधिकार पुरुषाचा व नंतर स्त्रीचा.त्यानंतर पाचवा क्रमांक आहे राजपुत्र हॅरी याचा. विल्यम्स यांची पत्नी सध्या गरोदर आहे, बाळंत…

Read More Read More