राजवाड्यातून बाजारपेठेत
राजवाड्यातून बाजारात. ब्रीटनचा राजपुत्र हॅरी, राजा होऊ शकणाऱ्या व्यक्तींच्या रांगेतला सहावा माणूस, त्याची पत्नी मेगन, राजवाड्याच्या बाहेर पडलेत. त्यांची आजी, राणी एलिझाबेथनं, राजघराण्याच्या जबाबदारीतून त्यांना मोकळं केलंय. त्याना यापुढं हीज रॉयल हायनेस आणि हर रॉयल हायनेस हे शब्द त्यांच्या नावामागं जोडता येणार नाहीत. तसंच त्यांचा खर्च इथून पुढं राजवाड्यातून होणार नाही. १९३८ साली आठव्या एडवर्डनं एका घटस्फोटित महिलेशी लग्न करायचा निर्णय घेतल्यावर त्याला राजेपद सोडावं लागलं होतं. त्याच घटनेची एक वेगळी आवृत्ती निघतेय. फक्त यात वाद नाहीये, राजपुत्रानं स्वखुषीनं राजवाड्याच्या…