अल बगदादी मेला?
अमेरिकन सैन्यानं कोंडी केल्यानंतर अबु बकर अल बगदादीनं स्वतःच्या अंगावर बाळगलेल्या स्फोटक बंडीचा स्फोट करून स्वतःला संपवलं. सीरियात इडलिब या प्रांतात ही घटना घडली. सहाएक महिने अल बगदादीच्या हालचालीवर पाळत ठेवल्यानंतर बगदादीचा ठावठिकाणा सापडला. बगदादीचे डीएनए सँपल अमेरिकन सैनिकानी जवळ ठेवले होते. बगदादी जिवंत सापडणार नाही हे माहित असल्यानं मेलेला माणूस बगदादीच आहे हे सिद्ध करण्यासाठी हे नमुने उपयोगी पडले. ओसामा बिन लादेनप्रमाणंच बगदादीच्या शरीराचे तुकडे दफन करण्यात आले किंवा जाळण्यात आले, पण कुठे ते अमेरिकनं गुप्त ठेवलं, कारण त्याचं…