दोन हजारांची वस्ती चाळीस हजार पुस्तकं
सू हेलपर्न न्यू यॉर्क राज्यातल्या एका डोंगरी खेड्यात रहायला गेल्या. गाव आकारानं मोठं होतं पण माणसं होती फक्त २ हजार. २ हजार माणसं २ हजार चौरस मैलाच्या परिसरात पसरलेली. डोंगराळ वस्त्या अशाच असतात. एक डोंगर, खूप अंतरावर दुसरा डोंगर, मधे घळ. डोंगरावर किवा घळीत एकादं घर. दुसरं घर दिसतही नाही इतक्या अंतरावर. एकोणिसाव्या शतकात या गावात चामडी कमावण्याचे उद्योग होते, लाकूड कारखाने होते. गावात रोजगार मिळालाच तर मोसमी स्वरुपाचा असे. औद्योगीक अमेरिका श्रीमंत झाली पण दूरवर असलेल्या खेड्यांची स्थिती…