नागरीक कायदा सुधारणा. निर्रथक, घातक, राजकीय खेळी.
नागरीकत्व कायदा सुधारणा, राजकीय खेळी. भारत सरकारचं नागरीकत्व कायद्यातल्या सुधारणांचं विधेयक उत्तर पूर्व भारतात खळबळ माजवून राहिलं आहे. नागरीकांनी या विधेयकाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विधेयक मांडणाऱ्या सत्ताधारी भाजपतल्या लोकांनी, आमदारांनीही हे विधेयक नाकारलं आहे. हे विधेयक १९५५ च्या नागरीकत्व कायद्यात सुधारणा सुचवतंय. १९५५ च्या कायद्यानुसार बाहेरून भारतात आलेल्या माणसांकडं योग्य प्रवासी कागदपत्रं नसतील किंवा भारतात आल्यानंतर परवानगी दिलेला काळ ओलांडून अधिक काळ माणूस भारतात राहिला असेल तर त्याला बेकायदेशीर स्थलांतरीत मानलं जातं, हाकललं जातं. बाहेरून येणारी काही माणसं …