सेक्रेड गेम्स. दाहक वास्तवाचं प्रत्यकारक चित्रण
सेक्रेड गेम्स ही मुंबईतील गुन्हे जगावर आधारलेली मालिका नेटफ्लिक्सवर रुजू झालीय. विक्रम चंद्र यांच्या २००६ साली प्रसिद्ध झालेल्या कादंबरीवर ती बेतलेली आहे. पहिल्या मालिकेचे आठ भाग प्रसारीत झाले आहेत. भारतात आणि परदेशात ही मालिका खूप पाहिली जातेय, चर्चेत आहे. जगभरच्या पेपरांनी या मालिकेची दखल घेतलीय. मुंबईत सेक्रेड गेम्सच्या महाकाय जाहिरातीत सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दिकी या प्रमुख नटांची चित्रं दिसतात. माध्यमं या मालिकेनं भयचकित झाली आहेत. क्वचित ठिकाणी मालिकेवर टीका झालीय. कथानकात आहे मुंबईतलं गुन्हे जगत आणि राजकारण. गुन्हेगार…