अजूनही जगात परक्यांना शत्रू न मानणारी माणसं आहेत
साजिद जाविद ब्रीटनचे गृहमंत्री झाले आहेत. त्यांच्यामुळं गोरा नसलेला पहिला आशियाई माणूस ब्रीटनमधे गृहमंत्री झाला आहे. जाविद यांचे आई वडील मुळचे भारतीय. नंतर ते पाकिस्तानात गेले. तिथून ते साठच्या दशकात ब्रीटनमधे स्थलांतरीत झाले. त्यांचे वडील बस ड्रायव्हर होते, आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते इनवेस्टमेंट बँकर होते. जाविद तेरेसा मे यांचे समर्थक आहेत, उजवे सनातनी आहेत. गृहमंत्री होण्याआधी त्यांनी घरबांधणी, सांस्कृतीक या खात्यांच्या मंत्रीपदी काम केलं आहे. गृहमंत्रीपद त्यांना सहजासहजी मिळालेलं नाही. आधीच्या गृहमंत्री अँबर रड यांना स्थलांतरीतांच्या प्रश्नाकडं दुर्लक्ष करणं या…