नीरव मोदी प्रकरण, सार्वजनिक बँका बुडण्याकडं वाटचाल?
नीरव मोदी प्रकरणातून लक्षात येतंय की सार्वजनिक बँकांची स्थिती खराब आहे. बँका बुडण्याची शक्यता आज तरी नाही. परंतू आर्थिक स्थिती बिघडली तर बँका बुडण्याचा दिवस जवळ येईल. १ जानेवारी २०१८ रोजी नीरव मोदी परदेशात गेले. अमेरिका, बेल्जियम इत्यादी देशांत त्यांची घरं आहे, व्यवसाय आहे. १६ जानेवारी २०१८ रोजी नीरव मोदींतर्फे एका माणसानं आयात मालाच्या तारणावर कर्ज मंजूर करण्याची हमी मुंबईतल्या पंजाब नॅशनल बँकेकडं मागितली. बँकेतला अधिकारी म्हणाला की तसं हमीपत्र देण्यासाठी आयात मालाच्या किमतीयेवढी रोख रक्कम बँकेत भरा किंवा त्या…