माणसाचा देव करण्याचा खटाटोप
देवासारखा माणूस तयार होईल काय? युवाल हरारी यांचं होमो डियस (Homo Deus) हे पुस्तक सध्या गाजतय. होमो डियस म्हणजे जवळ जवळ देव झालेला माणूस. देव म्हणजे पूर्ण व्यक्ती, पुर्ण निर्दोष व्यक्ती. एकेकाळी माकड असलेला माणूस विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून जवळजवळ देव बनवला जातोय या विषयाभोवती हे पुस्तक फिरतं. लेखक पृथ्वीचा ४ अब्ज वर्षांचा जीवनप्रवास धुंडाळतो. आजचा माणूस घडण्याचा पहिला टप्पा ७० हजार वर्षांपूर्वी सुरु झाला. त्यावेळी माणसाला बोधनाची, ज्ञान आणि समज घडवण्याची सोय मेंदूत झाली. ११ हजार वर्षांपूर्वी माणसानं…