सिनेमा शैलीच्या पत्रकारीची जन्मदाती पत्रकार. लिलियन रॉस,
लिलियन रॉस या बातमीदार महिलेचं रिपोर्टिंग ऑलवेज हे पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालंय. रॉसनी १९४५ च्या २१ जुलैच्या न्यू यॉर्कर या साप्ताहिकाच्या अंकात टॉक ऑफ टाऊन या सदरासाठी पहिला मजकूर लिहिला. न्यू यॉर्करमधे येणाऱ्या माणसांना भेटून छोटी टिपणं, वृत्तांत, फीचर्स त्या लिहीत. २०११ साली त्यांनी त्याच सदरात इराक या विषयावर बंगाल टायगर अट द बगदाद झू या शीर्षकाचा शेवटला मजकूर लिहिला. १९२६ साली जन्मलेल्या लिलियन रॉस आता सक्रीय पत्रकार नाहीत. मुलाखती देतात, गप्पा मारतात, त्यांच्या मागल्या लेखांचे संग्रह प्रसिद्ध करतात. केस…