अफझल. हे आहे आपलं देशप्रेम.

अफझल. हे आहे आपलं देशप्रेम.

१३ डिसेंबर २००१ रोजी ५ जैशे महंमदच्या दहशतवाद्यांनी भारताच्या संसदेवर  हल्ला केला. संसदेत भारत सरकारचे सर्व मंत्री असतात. तीसेक मिनिटं भारतीय सुरक्षा जवान आणि दहशतवादी यांच्यात संघर्ष झाला. त्यात पाच दहशतवादी, आठ भारतीय सुरक्षा जवान आणि एक माळी अशी माणसं मारली गेली.  त्याच दिवशी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आणि १५ डिसेंबर २००१ रोजी अफझल गुरु व इतरांना हल्ल्याला मदत करणं या आरोपावरून अटक केली. अटक झाल्यावर दिल्लीच्या डीसीपींनी एका खास खोलीत अफझल गुरुचा कबुली जबाब घेतला. हा जबाब घेताना इतर कोणाही व्यक्तीला (पोलिस किंवा न्यायालयीन) हजर ठेवण्यात आलं नाही. अफझल गुरुची जबाबदारी आज तक या वाहिनीवर दाखवण्याची व्यवस्था पोलिसांनी केली.
१५ मे २००२ रोजी अफझलवर आरोपपत्र (चार्ज शीट) दाखल करण्यात आलं.  अफझलनं जैशे महंमदकडून पैसे घेतले, संसदेच्या ठावठिकाण्याबद्दल माहिती पुरवली, दहशतवाद्यांना थारा देऊन हल्ला आयोजित करायला मदत केली, पूर्ण जाणीव ठेवून, असे आरोप अफझलवर ठेवण्यात आले. १८ डिसेंबर २००२ रोजी पोटा न्यायालयानं अफझल गुरुला फाशीची शिक्षा दिला. २९ डिसेंबर २००३ रोजी हाय कोर्टानं अफझलची फाशी पक्की केली. ४ ऑगस्ट २००५ रोजी सुप्रीम कोर्टानं फाशी पक्की केली. २२ सप्टेंबरला २००५ रोजी रिव्ह्यू पेटिशन ऐकून सुप्रीम कोर्टानं पुन्हा एकदा अफझलची फाशी पक्की केली. २००६ च्या ऑक्टोबर महिन्यात अफझलच्या बाजूनं दया याचना अर्ज राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याकडं गेला. पुन्हा २००७ च्या जून महिन्यात सुप्रीम कोर्टानं दया याचना फेटाळली. २३ जून २०१० रोजी भारत सरकारच्या गृह खात्यानं अफझलचा दया अर्ज नाकारावा अशी विनंती राष्ट्रपतींना केली. १० ऑगस्ट २०११ रोजी गृह खात्यानं दया अर्ज फेटाळून राष्ट्रपतींना विनंती केली की त्यांनी फाशीवर शिक्का मोर्तब करावं. १६ नव्हेंबर २०१२ रोजी राष्ट्रपतींनी दया अर्ज पुन्हा गृहमंत्र्यांकडं पाठवला आणि पुनर्विचार करावा अशी विनंती केली. २३ जानेवारी २०१३ रोजी गृहमंत्र्यांनी फाशी द्यावी असा निर्णय देऊन फाईल राष्ट्रपतींकडं पाठवली. ३ फेब्रुवारी २०१३ रोजी राष्ट्रपतीनी अफझलचा दया अर्ज फेटाळला. ९ फेब्रुवारी २०१३ रोजी अफझलला फाशी देण्यात आलं.
।।
अफझल गुरु काश्मिरमधील सोपोरचा रहिवासी. अफझल गुरु फुटीर होता.काश्मिर स्वतंत्र करू मागणाऱ्या गटाचा. १९८९ मधे तो पलिकडल्या आझाद काश्मिरमधे दहशतवादी प्रशिक्षण घेण्यासाठी गेला. पाकिस्तानी लष्कर आणि सरकारचं वागणं आणि विचार पाहून त्याचा भ्रम निरास झाला आणि तो भारतात परतला. त्यानं फुटीरता, दहशतवाद सोडला, बंदूक खाली ठेवली. अशा अनेक लोकांशी भारत सरकार संपर्क ठेवत असे. (दुलाट यांचं kashmir the vajpayee years हे पुस्तक वाचावे). १९९३ साली तो आपणहून भारतीय सुरक्षा दलाच्या स्वाधीन झाला.  तो सुरक्षा दलाच्या कार्यालयात दररोज हजेरी लावत असे, त्यांना काश्मिरमधल्या घटनांबद्दल माहिती पुरवत असे. संसदेवरील हल्ल्यात मारला गेलेला दहशतवादी महंमद याला अफझलनं दिल्लीत नेलं होतं.
।।।
संसदेवरील हल्ल्यात मारले गेलेल्या दहशतवाद्यांचा ठाव ठिकाणा, त्यांचं चरित्र, त्यांना कोणी पाठवलं, त्यांचा आणि पाकिस्तानी लष्कराचा संबंध इत्यादी गोष्टींवर भारत सरकारनं कोर्टाला माहिती पुरवलेली नाही. दहशतवादी लष्करे तय्यबाचे होते की जैशे महंमदचे हेही कोर्टाला स्पष्ट करण्यात आलेलं नाही. पाच माणसं दिल्लीत कशी येतात, कुठं रहातात, त्यांना संसदेचे पासेस कसे मिळतात, इतकी शस्त्रं घेऊन ते भारतात-दिल्लीत कसे सुखानं वावरू शकतात याचं स्पष्टीकरण सरकारनं कोर्टाला किंवा संसदेला दिलेलं नाही. पठाणकोट हल्ल्यानंतर अजूनही हल्लेखोर, त्यांना पाकिस्तानात कोण हाताळत होते याचे तपशील सरकारनं संसदेला किंवा माध्यमांना दिलेले नाहीत.
मुंबई हल्ल्याचे तपशील भारत सरकार हेडलीमार्फत जाहीर करतंय, स्वतः कोणतेही प्रयत्न करून नव्हे.
पाकिस्तानी दहशतवादाबद्दल भारतीय नसलेल्या अनेक पत्रकारांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत, त्यात खूप तपशील सापडतात. न्यू यॉर्करचे स्टीव कोल, डेविड फिलकिन्स आणि इतर अनेक पत्रकार पाकिस्तानात गेले आणि त्यांनी न्यू यॉर्करमधे पाकिस्तानी दहशतवादाबद्दल भरपूर तपशील देणारे वृत्तांत प्रसिद्ध केले आहेत. अशी कोणतीही माहिती भारत सरकारनं  जमा केलेली दिसत नाही.संसदेच्या पटलावर किंवा मुंबई हल्ल्याच्या प्रकरणात अशी कोणतीही माहिती भारत सरकारनं न्यायालयाला दिलेली नाही.
दुलाट यांनी दिलेल्या पुस्तकात काश्मिरी लोकांबद्दल लिहिलय पण पाकिस्तानी लष्कर, आयएसाय या बद्दलची माहिती दिलेली नाही.
 अफझल फाशी निकालात सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे की सर्व पुरावा परिस्थिती जन्य आहे, तपासात “lapses” and
“violations of procedural safeguards.” आहेत. सर्वोच्च न्यायालयानं असंही म्हटलं आहे —The incident, which
resulted in heavy casualties, had shaken the entire nation, and the collective
conscience of the society will only be satisfied if capital punishment is
awarded to the offender. The challenge to the unity, integrity and sovereignty
of India by these acts of terrorists and conspirators can only be compensated
by giving maximum punishment to the person —
म्हणजे न्यायालयानं ठोस खडखडीत पुरावे हाती नसतांना लोकभावनेचा विचार करून अफझल गुरुला फाशी दिली आहे.
अफझल गुरुचा एकेकाळी दहशतवादी संघटनांशी संबंध होता. असे संबंध कधी संपत नसतात. अशा संबंधाचा उपयोग दहशतवादी आणि पोलिस असे दोघेही आपापल्या कामासाठी करून घेत असतात. एका परीनं अशी माणसं डबल एजंट झालेली असतात. दोन्ही डगरींवर त्यांचा पाय असतो. त्यामुळं पुरावे नसले तरीही दहशतवादी महंमदला अफझलनं दिल्लीत नेलं ही घटना दृष्टी आड करता येत नाही.
पोलिस आळशी आणि भ्रष्ट असतात. सरकार, राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली ते वागतात.
संसदेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला हे तर वास्तवच आहे. पण दहशतवाद्यांची मुळं शोधणं, त्यांच्यापर्यंत त्यांच्या पाकिस्तानातल्या अड्ड्यात पोचणं, त्यांचा बंदोबस्त करणं हे भारतीय सुरक्षा दलांना, पोलिसांना जमत नाही. आवश्यक पैसा, राजकीय पाठबळ त्यांना मिळत नाही. कदाचित ती कुवतही त्यांच्यात नाही. त्यात भ्रष्टाचार आणि आळसाची भर. त्यामुळं गेली तीसेक वर्षं पाकिस्तानातून भारतावर हल्ले होतात आणि भारत सरकार देशभक्तीची गीतं गाण्यापलिकडं काहीही करत नाही. मग ते सरकार काँग्रेसचं असो की भाजपचं. वाजपेयींच्या पाच वर्षाच्या काळातही या बाबत काहीही घडलेलं नाही.
अशा स्थितीत आपली अब्रू वाचवण्यासाठी थातूर मातूर उद्योग भारत सरकार करतं. अफझल गुरुबाबत तेच घडलं. अफझल गुरु दहशतवादी तर होताच. त्यामुळं त्यांना आयता बकरा मिळाला. तो कापून काँग्रेस सरकारनं भारतमातेला अर्पण केला. घिसाडघाईनं, पुरावे गोळा न करता. तो मुळातला दहशतवादी असल्यानं त्यांचं काम सोपं झालं. परंतू पाकिस्तानी दहशतवादाला भारत सरकारनं हात लावला नाही.
ओंबाळेंनी अजमल कसाबला स्वतःचा प्राण खर्ची घालून पकडलं नसतं तर भारत सरकारच्या हाती काहीही लागलं नसतं, केवळ उज्ज्वल निकम यांची भंकसबाजी ऐकत रहावी लागली असती. अजमलनं दिलेल्या माहितीची खातर जमा करण्यासाठी भारतीय हेर पाकिस्तानात गेलेले नाहीत. जैशे महंमदच्या बारीक सारीक हालचालींचा हिशोब अमेरिकन पत्रकार जाहीर करत असतात. फिल्म्स, वार्तापत्रं यातून. भारत सरकार भाषणं ठोकतं. बस.
देशप्रेम आणि देशभक्तीची उरबडवी भाषणं आणि वक्तव्यं. ते सिद्ध करण्यासाठी काहीही न करणं अशी ही तऱ्हा.
पूर्वी काँग्रेसची आता भाजपची.
सुशील कुमार शिंदे या माणसानं पक्षीय स्वार्थ डोळ्या समोर ठेवून अत्यंत अव्यावसायिक आणि ढिसाळ तपासाच्या आधारे, मूळ दहशतवादाला हातही न लावता,अफझलला फासावर लटकावला. येऊ घातलेल्या निवडणुकीत भाजपवर मात करण्यासाठी. 
आता मोदी आणि त्यांचे ऊरबडवे कंठाळी सहकारी अफझल गुरुचं प्रकरण काढून आपली अपेशं लपवायचा प्रयत्न करत आहेत.
।।

31 thoughts on “अफझल. हे आहे आपलं देशप्रेम.

  1. आपण कधी जाताय पाकिस्तानात शोध पत्रकारीका करण्यास, इतर जातीलच हुशार आणि जेष्ठांचा मान पहिला

  2. मी आधीच दोनदा जाऊन आलोय. दहशतवाद्यांच्या ऐन अड्ड्यात, पेशावरमधे.

  3. लेखाची मांडणी छान.

    बाकी पोलिसांनी काहीच केलं नाही किंवा करत नाहीत असं बोलन थोडं धाडसाच ठरेल. उज्जवल निकम यांच्यावरचा राग ही समजण्यासारखा आहे.

    शेवटी न्यायालयापेक्षा पण तुम्ही पत्रकार हुशार आहात हे मान्य करतो आज.

    धन्यवाद!!!

  4. Very well said but why don't you write about your findings in peshavar and their terrorist camps ? It will be very useful info for indian army ,,intelligence bureau RAW etc…

  5. Very well said but why don't you write about your findings in peshavar and their terrorist camps ? It will be very useful info for indian army ,,intelligence bureau RAW etc…

  6. पाकिस्तानात मी दहशतवादीमधे वावरलो नाही, किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी गेलो नाही. तिथलं वातावरण, तिथं माणसं कशी जगतात ते मी पहात होतो. तिथल्या लोकांशी बोलत होतो. अफगाणिस्तानात माझी तालिबांशी चर्चा झाली होती. तालिबान प्रभाव असलेल्या विभागात मी फिरत होतो. माझ्या भोवताली कदाचित तिथं तालिब वावरत असावेत, मला कळायला मार्ग नाही. भेटणाऱ्या माणसांमधून मला दहशतवाद समजत होता. त्याचं वर्णन मी अफगाणिस्तानवरच्या माझ्या पुस्तकात केलं आहे. जवळपास तेच चित्र क्वेट्टा आणि पेशावरमधे होतं. रॉ आणि इंटेलिजन्स चा उल्लेख अनामिक व्यक्तिनं प्रतिक्रेयेत केला आहे. मी उल्लेख केलेलं दुलाट यांचं पुस्तक वाचलं तर त्या संस्थांच्या कामाची रीत लक्षात येईल. सीआयए, एमायफाईव्ह, मोसाद इत्यादी संघटनांची किती माणसं कुठं कशी कामं करतात यावर पुस्तकं उपलब्ध आहेत. ही कामं साधण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागतो. भारताचं परदेश खातं आणि एकूणच इंटेलिजन्स विभाग खूपच लहान, जवळपास नसल्यासारखा आहे. भारतातले परदेशातले दूतावास पत्रकं काढण्यापलिकडं फारसं काही करू शकत नाहीत. भारत सरकारनं या गोष्टींचा कधी विचार केला नाही. रॉ किंवा इंटेलिजन्स विभाग पत्रकारांकडून वगैरे माहिती घेत नसतात, त्यांना ती स्वतंत्रपणे गोळा करावी लागते. पत्रकारी आणि सरकारी कामं या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, दोघांचे हेतू आणि कामाची पद्धत वेगळी असते.

  7. चार वेळा फ़ाशीची शिक्षा ठोठावली असेल तर सर्वात मोठा दोष तर अफ़झलची केस जे धच्युत वकील लढत होते त्यांचा आहे बहुतेक अफ़झलकडून जाम पैसे घेऊन सेटींग केली असावी .

    माझ्या मते त्या वकीलांनी ज्या प्रकारे केस लढवली व पैसे खाल्ले त्यावर शोध पत्रकारिता करावी व अशा हरामखोर वकीलांना जनतेसमोर नागडे करुन भविष्यातील निर्दोष अफ़झल वाचवावेत .

    अब रोये पछताये क्या जब चिडीया चुग गयी खेंत .

  8. गुप्तचर खातं काही गोष्टी सांगत नसतं. ते सांगणं त्या खात्याच्या हिताचं नसतं. परंतू गुप्तचर खातं हे एका सरकारसाठी काम करत असतं. ते सरकार लोकांनी निवडून दिलेलं असतं. त्यामुळं गुप्तचर खात्यावर सरकारला, संसदेला लक्ष ठेवावं लागतं. आपण काय करतो हे गुप्तचर खात्याला संसदेच्या विशिष्ट समितीला सांगावंच लागतं. पत्रकारांनाही सोयीच्या गोष्टी गुप्तचर सांगत असतात. कोणत्या सांगायच्या आणि कोणत्या नाहीत हे गुप्तचर खातं ठरवतं. गुप्तचर खात्यानं काय केलं काय नाही यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पत्रकारांवर असते. निक्सन यांनी गुप्तचर खात्याचा दुरुपयोग विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केला होता. पत्रकारांनी ते उघडं पाडलं. देशाच्या हितासाठी, भ्रष्टाचार आटोक्यात ठेवण्यासाठी, अकार्यक्षमता उघडी पाडण्यासाठी पत्रकारांना जागरूक रहावंच लागतं.

  9. 26/11 RSS की साजिश आणि हू किल्ड करकरे या धाटणीचा वाटल लिखाण… तुमचा तर्क स्विकारला

  10. IB ani raw che congress sarkarne kase khachhikaran kele tyavar pan jara prakash takla tar bare hoil. NSA ajit Ajit Doval sahavarshe underground rahun kay picknick karat hote ka. Tasech aatahi her astilach. Aaple her tithe aahet he kay jahir karun karaychi gosht aahe ka. Aaple her tikde gele nahit he kashachya aadare tumhi mhanata.

  11. Exèllent damlesir. Govt work is like an iceberg,it seems. They only pass out 1/9 of their favourable part of any investigations they do. Let it be afzal guru or pansare matter. It is worth a matter of concern for every citizen of INDIA.

  12. सगळ्या गोष्टी बोंबा मारून करता येत नाहीत… एवढी security weak असती तर हा देश असा राहिला असता का हे कोणी ह्या महाशयांना विचारा…

  13. "पोलिस आळशी आणि भ्रष्ट असतात. सरकार, राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली ते वागतात" — बरं, मग तुमच्या मताप्रमाणे पोलिसांनी कोणाचे ऐकले पाहिजे? तुमच्या सारख्या journalist चे? कि जनतेचे?
    अच्छा, मग देशप्रेम म्हणजे नक्की काय तुमच्या मताप्रमाणे? अखंड भारत? गव्हर्नमेंट नी नक्की काय करायचे?

  14. Forget what Govt.has to do.Ask your subconscious what you are supposed to do? Keep quite & bear with everything what politicians are doing or use democratic things to awake all possible population?

  15. Mr/ Ms Medulla why should police listen to journalist …they should do what is good, fair n just in the interest of the nation. We are facing terrorism for last 30 years and lakhs have lost their life…only 3000 people died in WTC attack and the US pounded whole of Afghanistan and strangely enough on every attack they advise us on restraint and then sell F16 to Pak…

  16. Atana khar tar tumha patrkarancha na kantala alay. Roj ratri sagalya channel var charcha ( Vagale ki duniya tar nyayadhishch ahet). Amha samanyana tar he sagale rajkarni ani patrakar vedech samajtat

  17. WHATEVER MAY BE THE CASE OF AFZAL BUT THAT DO NOT JUSTIFY SHOUTING SLOGANS IN FAVOR OF PAKISTAN AND AGAINST INDIA AT JNU. THESE STUDENTS AT JNU I PERSONALLY FEEL ARE WAISTING MONEY OF COMMON MAN WHICH MUST BE CONDEMNED AND THE CULPRITS SHOULD BE BOOKED AND TAUGHT LESSON THAT NO ONE IN FUTURE WILL DARE TO MISBEHAVE LIKE THIS AT COST OF ALL COUNTRYMEN.

  18. लेख तौलनिक वाटला. राजकारणातील आणि त्यातही आंतरराष्ट्रीय राजकारणातील अंडर करंट कधीही बाहेर येत नसतात. त्याची तार्किक सुसंगती नागरिकांनी लावायची असते. राज्यकर्ते सगळ्या गोष्टी स्वार्थासाठी वापरणार हे अपेक्षित आहे. कुठलाही पक्ष त्याला अपवाद ठरू शकत नाही.
    त्यामुळे, व्यापक राष्ट्रहित लक्षात घेवून उचललेली पावले महत्वाची ठरतात. पाकिस्तान शत्रूदेश आहे हे उघड आहे. त्यामुळे त्याविरुद्ध जनभावना तीव्र आहेत. खरे तर चीन आपला खराखुरा शत्रू. लष्करी पातळीवर पाकिस्तानला शत्रू मानण्याची प्रथा नाही. त्याला `बिघडलेला धाकटा भाऊ` असे मानले जाते. असे असले तरी चीनविरुद्ध जनमानस तितके तीव्र नाही. ते पाकिस्तान विरुद्ध आहे. याला कुठेतरी धर्माचा आधार आहेच. पूर्वसुरींनी चुका केल्या, वारसादारांनी त्यात भर घातली. हे उभय देशांत घडले. आता हे सारे कुठे पोचणार, हे पहायचे…

  19. " जैशे महंमदच्या बारीक सारीक हालचालींचा हिशोब अमेरिकन पत्रकार जाहीर करत असतात. "
    मग तुमच्यासारखे आपले जेष्ठ पत्रकार काय सरकारी पाहुणचारच झोडत बसतात का हो दामले?

  20. निळू दामले : तुझ्यासारखे यडझवे म्हातारे या समाजाचं ओझं बनलेत ! औकात कळली नसेल तर हरकत नाही ! प्रत्येकाला ती कळतेच असंही नाही ! देवनागरी लिपीतून शब्दांचा नि विरामचिन्हांचा वापर करता येणं इतकीच तुझी लायकी होती, आहे, राहील तितकी राहील ! तू होतास म्हणून फरक पडला नाही, तू आहेस म्हणून पडणार नाही, तू नसशील तेव्हा प्रश्नच नाही ! केळ्यांच्या ढिगातलं एखादं लिबलिबीत केळं, ज्याचा कुणालाही वापर करता येत नाही, मात्र ते रस्त्यात पडतं काय, येणारा जाणारा त्यावरुन सटकू लागतो ! इतपतच तुझं अस्तित्व ! असो ! तुझ्याबद्दल माझ्यासारख्या तरुणाचं मत हे आहे !

    बाकी शून्य होतीच ! आत्ताही आहेच !

    अभिजीत उदय टिळक
    २००१ बॅच जनसंज्ञापन अभ्यास, पुणे विद्यापीठ

  21. Mr tilak, understand the subject.Mr.Damle is not an issue to abuse him. It will show your quality.Forum is for positive discussion & not for blowing out your conflicts.

  22. Wah Nilu Damalenbaddal adar farach vadhala majha. Mala tar vatat devach asavet he. Konalach mahit nahit ashya baryach goshti ahet lekhat with sources. Mhanje me far shodhanyacha prayatna kela pan Mala vatat Nilu Damale devach ahet mhanje te mhantat te kharach ahe. Ani Kay sangu tyanchya shaili vishayi kharach Ujwal Nikam bakwas ch kartat ani shur tar itake ahet ki comment madhe vachal tyani lihilay ki te donda jaunpan ale Pakistant ani apale her jatach nahit. RAW la tar uagach posato apan. Mala vatat pudhil pantapradhan Nilu Dmalenich vhav. Tyana itaki mahiti ahe ani te itakya sundar prakare mandtat ti mi bharavunach geloy. Apanahi hotat Ka ho Nilu JNU chya ladhyat farach abhiman vatala asel nahi Bharat matela mhanje tumhi paravanagi dilit tar mhanen ho mata, aso bharat matechya barbadichya goshti mhananyat farach maja aali asel tumhala. Great.

  23. काय बोलावं? अफझल गुरु हा माणूस भारताच्या अखंडतेला आव्हान देत होता. काश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानची काश्मिरबाबतची भूमिका अत्यंत चुकीची आहे, पाकिस्तानी एस्टाब्लिशमेंटला आपली अपेश लपवण्यासाठी काश्मिरचा मुद्दा सतत काढायचा आहे. भारत आपल्याला नष्ट करू पहातोय या गंडानं पाकिस्तान पछाडलेला आहे. पाकिस्तानातला एक धार्मिक गट हिंदूच नव्हे तर जगातले सर्वच गैरमुस्लीम समाज नष्ट करण्याच्या गोष्टी करतो. काश्मिर ही भारतद्वेषासाठी वापरलेली पाकिस्तानची एक सबब आहे. अनेक वेळा लिहिलं आहे की काश्मिरियत हा मुद्दा भारतापासून दूर होण्यासाठी वापरणं चुकीचं आहे. काश्मिरियत जशी आहे तशीच संस्कृती भारतातल्या प्रत्येक प्रांताला आहे. पण म्हणून प्रांत भारतातून फुटू मागत नाहीत, फुटू मागता कामा नये. काश्मिरच्या लोकांचे प्रश्न असतील, आहेत. पण ते त्यांना भारताच्या लोकशाही चौकटीतून सोडवता आले पाहिजेत.बिहारला वाटतं की त्यांच्यावर अन्याय होतोय. त्यांना त्यांच्या प्रश्नांचं निराकरण लोकशाही पद्धतीनंच करावं लागेल. तसंच काश्मिरचं आहे. आपली भाषा वेगळी आहे, आपली रहाणी वेगळी आहे वगैरे सबबी राजकीय आहेत. तेव्हां काश्मिर हा भारताचाच भाग आहे हे समजून न घेता फुटीरतेची भाषा करणं हे भारताच्या अखंडतेला आव्हान आहे. जेएनयूमधे किंवा कुठंही अफझल गुरुचं या बाबतीत समर्थन होऊ शकत नाही. काश्मिरच्या प्रश्नात पाकिस्तान गुंतलेला आहे. पाकिस्तानी कारवायांचा बंदोबस्त करण्यासाठी काही एक व्यवस्था करावी लागेल. ती व्यवस्था भारतीय सरकार करत नसल्यानंच अफझल गुरु वगैरे प्रकरणं घडत असतात असा माझा मुद्दा आहे. भारत सरकार कसं चालतं, कसं काम करतं यावर भारतीय नागरिकांनी लक्ष ठेवलं तरच पाकिस्तान आणि अफझल गुरु अशा प्रश्नांची तड लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *