मदारी आणि माकड
भारतीय लष्करानं एक चांगली कामगिरी केलीय. जैशे महंमदच्या पाकिस्तानातल्या बहावलपूरमधील छावणीवर भारतीय सैन्यानं हल्ला केला. खुद्द मसूद अझरनंच ते मान्य केलंय. मसूदची छावणी साऱ्या जगाला माहित होती.तिची छायाचित्रं असंख्य वेळा पेपरात छापून आलीयत, वाहिन्यांनी दाखवली आहेत. मसूद हा दहशतवादी आहे असं जगानं अधिकृतरीत्या मान्यही केलेलं आहे. त्यामुळं या छावणीवर हल्ला करणं योग्य होतं, केव्हांही कोणी तरी हा हल्ला करायला हवा होता. पण पाकिस्तान सरकारचा छुपा पाठिंबा असल्यानं सरकारं तो उद्योग करत नसत. त्यासाठीच भारताला बहावलपूर माहीत असूनही गप्प बसावं लागत…