ट्रंपनी गाजवलेली (गाझवलेली) शांतता कुठाय?
डोनल्ड ट्रंप भाषण मारतात, जग डोलतं, पुढं काही होत नाही. ट्रंप नवं भाषण करतात, पुन्हा जग डोलतं, काहीही होत नाही. युक्रेन युद्ध थांबवलं म्हणाले, युद्ध सुरुच आहे. गाझा युद्ध स्थगितीचं उदाहरण घ्या. गाझा युद्ध स्थगित झाल्याची घोषणा डोनल्ड ट्रंप यांनी २५ जानेवारी २०२६ रोजी गेली. ठरलं असं. युद्ध थांबल्यावर हमास शस्त्रं टाकेल; इस्रायलची सेना सुरवातीला ५३ टक्के गाझामधून सैन्य मागं घेऊन पूर्ण माघारीची पावलं उचलेल; एक कारभारी मंडळ स्थापन होईल; हे मंडळ गाझाच्या भविष्याची आखणी करेल; एक शांतता मंडळ स्थापन…