वटवाघुळ
वटवाघूळ ताजं संशोधन सांगतय की वटवाघुळाचा जन्म युरोपात झालाय. वट वाघूळ ६.५ कोटी वर्षांपूर्वी आशिया किंवा आफ्रिकेत जन्मलं असं संशोधक मानत होते. वटवाघुळावर आजवर आशिया हक्क सांगत होता, त्याचं पेटंट आशिया मागत होतं. अरेरे. वटवाघूळ हा शब्द कुठून आला? नेमका उगम सापडत नाही. वट म्हणजे वड किंवा वाघुळ म्हणजे वाघ असा कोणताही अर्थ लागत नाही. बॅट या इंग्रजी शब्दाची काही मुळं सापडतात. १४ व्या शतकाच्या आधीच्या इंग्रजीत hrēremūs असा शब्द होता. हेरे म्हणजे थरथरणारा, मुस म्हणजे उंदीर. वटवाघुळाचं…