झुंज
झुंज कार्टाजेना. द. अमेरिकेतल्या कोलंबियातलं ५०० वर्षांपासून विकसित होत असलेलं शहर. ५०० वर्षांपूर्वी शहराभोवती बांधलेल्या तटभिंतीला लागून जुनी घरं आहेत. एका घरात तीन साडेतीनशे माणसं किंचाळत आहेत. ओरडत आहेत. एका हातात कोल्ड ड्रिंकची बाटली. दुसऱ्या हातात नोटांची चळत. माणसं बेभान आहेत. समोर कोंबड्या झुंजत आहेत. दोन्ही कोंबडे अटीतटीनं लढतात. एक कोंबडा जखमी होतो, दूर पळायचा प्रयत्न करतो. जिंकायच्या वाटेवरचा कोंबडा उन्मादानं त्या जखमी कोंबड्यावर हल्ला करतो. चोचेनं भोसकतो. तंगडीच्या मागल्या बाजूला असलेल्या काट्यानं ओरबाडतो. रक्ताची चिळकांडी उडते. झुंजीसाठी…