विजयचा विजय का झाला

विजयचा विजय का झाला

 २०२४ साली स्थापन झालेल्या तमिळ वेत्री कळहम (तवेक) पक्षानं २०२६ सालच्या २३४ सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेत १०८ जागा मिळवणं ही सामान्य गोष्ट नव्हे. थलपती विजय (सी जोसेफ विजय) यांनी ती करामत करून दाखवलीय.    विजय यांनी पहिल्यांदाच निवडणुक लढवली, मुख्यमंत्री स्टालिन यांचा ८७०० मतांनी पराभव केला. स्टालिन द्रमुक या १९६७ पासून आलटून पालटून सत्तेत असलेल्या तामिळनाडूत रुतलेल्या द्रविड पार्टीचे नेते होते. स्टालिन यांना करुणानिधी यांचा वारसा लाभला होता.  तामिळनाडूमधे एक राजकीय पॅटर्न दिसतो. द्रमुकनं काँग्रेसची सत्ता उलथवली (१९६७). अद्रमुकनं द्रमुकची सत्ता…

Read More Read More

अमेरिकेत राजकीय नेत्यांवर हल्ले कां होतात

अमेरिकेत राजकीय नेत्यांवर हल्ले कां होतात

अमेरिकेत राजकीय नेत्यांवर हल्ले कां होतात डोनल्ड ट्रंप जिथं हजर रहाणार होते त्या हॉटेलमधे घुसण्याचा प्रयत्न कोल ॲलन नावाच्या माणसानं केला. पोलिसांनी त्याला अडवलं. डोनल्ड ट्रंप वाचले. ट्रंप आणि त्यांचे सत्ताधारी नेते यावर कोल ॲलन याचा राग होता. ट्रंप यांच्यावर आधी दोन वेळा हल्ले झाले. एकदा ट्रंप यांच्या निवासस्थानाबाहेर एक शस्त्रधारी सापडला होता. ट्रंप तेव्हां परगावी होते. गेल्या वर्षी चार्ली कर्क या ट्रंप समर्थक कार्यकर्त्यावर हल्ला झाला, कर्कचा मृत्यू झाला. चार्ली युटा विद्यापिठात विद्यार्थ्यांसमोर ट्रंप यांचा प्रचार करत होता. चार्ली…

Read More Read More

नेपोलियनचा आवडता परफ्यूम

नेपोलियनचा आवडता परफ्यूम

नेपोलियनचा आवडता परफ्यूम आपण सर्रास ओ द कोलोन हे परफ्युम वापरतो. नाना कंपन्यांनी तयार केलेलं कोलोन परफ्युम आपण वापरतो. अलीकडं ओ द कोलोनमधे कंपन्यांनी आपापले स्वतंत्र गंध मिसळले आहेत. बाजारात मिळणारं कोलोन हे एका परीनं भेसळच असतं. कोलोन हे परफ्युम आहे. कधी कधी परफ्युमला अत्तर असंही संबोधलं जातं. ते बरोबर नाही. परफ्युम अल्कोहोलमधे सुगंधी तेल मिसळून तयार केलेलं असतं. अत्तरात अल्कोहोल नसतं, अत्तर नैसर्गिक तेलात तयार करतात, त्यात वापरलेली सुगंधी द्रव्यं फुलांमधून, वनस्पतीतून घेतली जातात. ते सुगंधी घटक नैसर्गिक असतात…

Read More Read More

पॅलेस्टाईन, प्रश्न भावनिक.

पॅलेस्टाईन, प्रश्न भावनिक.

पॅलेस्टाईन संघर्ष समजून देणारं पुस्तक ।।  Tomorrow Is Yesterday. Robert Malley, Hussein Agha ।। पॅलेस्टिनी, इस्रायल यांच्यात १९९३ चे १९९५ या काळात झालेल्या ऑस्लो कराराबद्दल हे पुस्तक आहे.  १९४८ मधे इस्रायल स्थापन झाल्यापासून इस्रायल संघर्ष सुरु झाला. पॅलेस्टिनी म्हणत होते ज्यूंनी आपल्याला न विचारता पॅलेस्टाईनमधे घुसखोरी केलीय, त्यांना घालवून द्या, पॅलेस्टाईन आमचं आहे. बरोब्बर दुसरं मानस ज्यूंचं म्हणजे इस्रायलचं होतं. ही आमची मूळ भूमी आहे, ती पूर्णपणे आमच्या ताब्यात आली पाहिजे, तिथं पॅलेस्टिनी नकोत. युद्ध झाली. दंगे झाले. दुभंगलेलं पॅलेस्टाईन…

Read More Read More

झुंज

झुंज

झुंज कार्टाजेना. द. अमेरिकेतल्या कोलंबियातलं ५०० वर्षांपासून विकसित होत असलेलं शहर. ५०० वर्षांपूर्वी शहराभोवती बांधलेल्या तटभिंतीला लागून जुनी घरं आहेत. एका घरात तीन साडेतीनशे माणसं किंचाळत आहेत.  ओरडत आहेत. एका हातात कोल्ड ड्रिंकची बाटली. दुसऱ्या हातात नोटांची चळत. माणसं बेभान आहेत. समोर कोंबड्या झुंजत आहेत.    दोन्ही कोंबडे अटीतटीनं लढतात.   एक कोंबडा जखमी होतो, दूर पळायचा प्रयत्न करतो. जिंकायच्या वाटेवरचा कोंबडा उन्मादानं त्या जखमी कोंबड्यावर हल्ला करतो. चोचेनं भोसकतो. तंगडीच्या मागल्या बाजूला असलेल्या काट्यानं ओरबाडतो. रक्ताची चिळकांडी उडते. झुंजीसाठी…

Read More Read More

न थांबता १३ हजार मैल उडणारा गॉडविट पक्षी

न थांबता १३ हजार मैल उडणारा गॉडविट पक्षी

।। पट्टेरी शेपटीचा पक्षी. वजन किती? फार तर सहाशे ग्रॅम.  एका ऑक्टोबर महिन्यात १३ तारखेला  पहाटे पाच वाजून १० मिनिटांनी अलास्कावरून निघतो. १३ हजार किलोमीटर कुठंही न थांबता उडतो उडतो उडतो आणि २४ ऑक्टोबरला पहाटे चार वाजून ५५ मिनिटांनी टास्मानियात पोचतो.   उत्तर अमेरिकेल्या थंडीतून निघून ऑस्ट्रेलियाच्या उबदार वातावरणात पोचतो. टास्मानियात उतरण्याची जागा त्याला माहीत असते. त्या जागी तो पूर्वी आलेला असतो. आकाशात कित्येक मैलावर असताना खालच्या जमिनीवरचे अगदी बारीक तपशील दिसतात. शक्तीमान सॅटेलाईट कॅमेऱ्याला दिसावेत  तसे.  त्याला दलदल दिसते….

Read More Read More

पेपर विकणाऱ्याचा राष्ट्रीय सन्मान

पेपर विकणाऱ्याचा राष्ट्रीय सन्मान

 अली अकबर पॅरिसच्या सेंट जर्मन या वॉर्डात अजूनही पेपर विकतात. त्यांचं वय आहे ७३. अलिकडं लोक त्याला पेपर विकत घेण्यापूर्वी थांबवतात. विचारतात ‘अरे तूच ना तो अली अकबर? तुलाच प्रेसिडेंट मॅक्रॉननी राष्ट्रीय किताब देऊन गौरवलं होतं ना?’ अली अकबरचा एलीसी पॅलेसमधे एका समारंभात सत्कार झाला, फ्रेंच अध्यक्ष एमॅन्युएल मॅक्रॉन यांनी त्याच्या गळ्यात एक पदक टांगलं. मॅक्रॉन म्हणाले ‘तू फ्रान्सचा गौरव आहेस. तू पॅरिसची सेवा केलीस त्या बद्दल फ्रान्स तुझा ऋणी आहे.’ मॅक्रॉननी पदक देताना एक छोटंसं भाषण केलं. त्या भाषणात…

Read More Read More

अमेरिकेचं महागडं इराण युद्ध

अमेरिकेचं महागडं इराण युद्ध

इराण युद्ध २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरु झालं. इराण युद्धात अमेरिकेनं विमानवाहू नौकांसह १५ युद्ध नौका आणि १०० लढाऊ विमानं वापरली. अमेरिकन नौदलातल्या २६ टक्के बोटी आणि हवाई दलातली २५ टक्के विमानं अमेरिकेनं युद्धात लोटली आहेत. एकूण सैनिक सुमारे ५० हजार. अमेरिकेनं इराणवर १३ हजार हवाई हल्ले केले. अमेरिकेचं अंदाजपत्रक ठरवणाऱ्या अधिकाऱ्यांना संसदेनं युद्धावर किती खर्च झाला अशी विचारणा केली. दोन वेळा. अधिकारी म्हणाले आकडा देता येणार नाही कारण तो सतत बदलत असतो, नेमका खर्च किती झाला ते सांगता येणार…

Read More Read More

देश उंदराचा पुतळा उभारतो

देश उंदराचा पुतळा उभारतो

 कंबोडियानं मागावा नावाच्या  उंदराचा एक पुतळा आंगकोर वाट या स्थळी उभारलाय. आफ्रिकेतून हा उंदीर कांबोडियानं आयात केला होता.   मागावा ७० सेंमी लांबी-उंचीचा होता. पुतळा २.२ मीटर उंचीचा आहे. आंगकोर वाट हा एक मंदिरांचा काँप्लेक्स आहे, तिथं अनेक मंदिरं आहेत. ११ व्या शतकात विष्णू या देवाची आठवण म्हणून तत्कालीन राजा सूर्यवर्मन या राजानं आंगकोर वाट उभारलं. नंतर त्याचं रुपांतर बुद्ध मंदिरांमधे झालं. आंगकोर वाटमधल्या १००० मंदिरांमधे हा उंदीर पुतळा असेल. विष्णू,बुद्ध, उंदीर. उंदराचा पुतळा कां? मागावानं १०० भूसुरूंग शोधले. मागावा…

Read More Read More

इराणयुद्ध स्थगिती मुनीरची करामत

इराणयुद्ध स्थगिती मुनीरची करामत

 पाकिस्ताननं इराण युद्धाला स्थगिती देण्यासाठी मध्यस्थी केली. अमेरिका आणि इराणचे प्रतिनिधी इस्लामाबादमधे भेटले. एकमेकांची तोंड पहायला तयार नसलेली माणसं समोरासमोर कशी काय बसली? हे कसं घडलं? पाकिस्तानचे सरसेनापती असीम मुनीर यांनी वरील घटना घडवून आणली. असीम मुनीर अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांच्याशी फोनवर थेट बोलले.  ट्रंपच्या मते असीम मुनीर हा त्यांचा ग्रेट फ्रेंड आहे. मुनीर यांचा फोन ट्रंप पटकन घेतात. मुनीरनी भेट मागितली तर ट्रंप पटकन तयार होतात. मुनीरना चमकोगिरीसाठी काही तरी हवं होतं, इराण युद्ध कामी आलं. पाकिस्तानची राजवट…

Read More Read More