मेरिलीन मन्रो, सौंदर्य आणि अभिनय
मेरिलीन मन्रो या नटीची जन्मशताब्दी इंग्लंडमधे साजरी होतेय. ब्रिटीश फिल्म इन्स्टिट्यूट वर्षभर तिचे चित्रपट दाखवणार आहे, तिच्या चित्र-पोस्टर्सची प्रदर्शनं भरवणार आहे, भाषणं आणि चर्चासत्रं ठेवणार आहे. १९७० नंतर जन्मलेल्या माणसांना मन्रो आठवणं कठीण आहे. ती १९६२ साली वारली. १९६१ साली तिचा शेवटला चित्रपट पडद्यावर आला होता. १९४७ मधे मन्रोनं पहिला चित्रपट केला. मन्रोनं ३० चित्रपट केले. Gentlemen Prefer Blondes (1953), Niagara (1953), The Seven Year Itch (1955), Some Like It Hot (1959), The Misfits (1961) हे मन्रोचे गाजलेले चित्रपट. तीस…