मारेकरी मोकाट सुटलेत.
जगात कोणाच्याही जगण्याची शाश्वती राहिलेली नाही. मारेकरी मोकाट सुटलेत. मदुरो अटकेत, खोमेनाई परलोकात. आता कोणाचा नंबर? आता कोणाचा नंबर? ।। बातम्या अशा आहेत की तेहरानमधील राजप्रासादात इराणचे सर्वेसर्वा खामेनाई अमेरिका-इस्रायलच्या बाँबिंगला बळी पडलेत. इराणच्या रस्त्यावरची काही दृश्यं माध्यम दाखवत आहेत. एकामधे माणसं भयचकित झाली आहेत. आपल्या देशाच्या सर्वोच्च माणसाला बाहेरच्या देशातल्या कोणी तरी ठार मारलंय याचा धक्का त्यांना बसलाय.एका दृश्यामधे माणसं आनंदचकित झाली आहेत. गेली वीस वर्षापेक्षा जास्त काळ आपल्याला छळणाऱ्या क्रूर माणसाचा मृत्यू झालाय याचा आनंद त्यांना झालाय….