Browsed by
Month: June 2025

१८६१ साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक

१८६१ साली प्रसिद्ध झालेलं पुस्तक

 एक लेख लिहिण्याच्या निमित्तानं संदर्भासाठी पुस्तकं वाचत असताना वॉल्टर बॅजेट यांनी लिहिलेली एक पुस्तिका मिळाली. Memoirs of the Right Hon. James Wilson असं या पुस्तिकेचं नाव आहे. १८६१ साली ही ६७ पानी पुस्तिका प्रसिद्ध झाली. आता गुगल बुक्सनं ती पुस्तिका उपलब्घ केली आहे.   पुस्तकात जेम्स विल्सन यांच्या आठवणी आहेत. जेम्स विल्सन म्हणजे इकॉनॉमिस्ट या जगन्मान्य साप्ताहिकाचे संपादक. ते भारताचे पहिले अर्थमंत्री होते. १८५७ पूर्वी भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं. १८५७ साली बंड झालं. बंडाला तोंड देता देता फार…

Read More Read More

ट्रंप ‘फ’वाली शिवी हासडतात तेव्हां..

ट्रंप ‘फ’वाली शिवी हासडतात तेव्हां..

ट्रंपनी कॅमेऱ्यासमोर ‘फ’वाली शिवी हासडली.  ट्रंप युरोपच्या दौऱ्यावर निघाले असताना विमानतळावर पत्रकारांनी त्यांना गाठलं. ‘२१ तारखेला इराणवर बाँब टाकल्यावर तुम्ही म्हणालात की इराण इसरायल  युद्ध थांबलंय. तसं झालेलं दिसत नाहीये. तुमची प्रतिक्रिया सांगा.’ ट्रंप सुटले. इसरायलला ‘फ’वाली शिवी हासडली. इराण आणि इसरायलना कळत नाहीये की ते काय करतातेत असं येशू ख्रिस्ताच्या स्टाईलनं बोलले,  विमानाच्या शिडीकडं रवाना झाले.  इराणनं अणुशस्त्राला आवश्यक दर्जाचं युरेनियम तयार करणं थांबवावं या विषयावर अमेरिका-  इराण चालल्या होत्या.  नेतान्याहूना वाटाघाटी नको होत्या, लढाई करायची होती. ट्रंपना डील…

Read More Read More

शक्तीशाली बाँब इराणमधे वापरून अमेरिकेनं काय मिळवलं?

शक्तीशाली बाँब इराणमधे वापरून अमेरिकेनं काय मिळवलं?

 आठवडाभर घोळ घातल्यावर अमेरिकेनं इराणवर प्रत्येकी ३० हजार पाऊंडापेक्षा जास्त वजनाचे बाँब टाकले. ट्रंप म्हणतात की इराणची अणुविकास व्यवस्था संपली आहे. इराणचं कधीही भरून निघणार नाही इतकं नुकसान झालं आहे. इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे हे खरंच आहे. इराणचा अणुकार्यक्रम दीर्घ काळ रखडेल. परंतू तो नष्ट झालेला नाही. तो ठिकठिकाणी आधीच विखुरलेला आहे, इराण तो पुन्हा दुरुस्त करून कामाला लावेल. इराण चिरडीला आहे. दुखावला आहे. आता  तो शरण येण्याची शक्यता दुरावली आहे. उरल्या सुरल्या ताकदीचा वापर करून तो अमेरिकेचं, इस्रायलचं…

Read More Read More

अली खामेनींचा खून होणार?

अली खामेनींचा खून होणार?

(टीप. इस्रायल-इराण युद्धातली स्थिती दर काही तासांनी बदलत आहे. मजकुरावरची शाई वाळते न वाळते तोवर स्थिती बदललेली असते.) (दि. १८ जून)  इस्रायलनं इराणमधल्या सेंट्रीफ्यूज इमारतीवर हल्ला केला. सेंट्रीफ्यूज जमिनीखाली खोलवर होतं. खूप शक्तीशाली बाँब इस्रायलनं वापरला. इराणनं तेल अवीव, हैफा आणि जेरुसलेमवर रॉकेटं सोडली, अनेक इमारती उध्वस्थ केल्या. विमानं, क्षेपणास्त्रं, दोन्ही देशात खोलवर पोचलीत. याचा अर्थ विमानं,क्षेपणास्त्रं इत्यादी वाटेतच अडवणं, वाटेतच ती नष्ट करणं या दोन्ही गोष्टी दोन्ही देशाना पुरेशा जमत नाहीयेत. याचाच अर्थ इस्रायल इराण युद्धात खूप हानी होतेय,…

Read More Read More

नेतान्याहूनी इराणशी लढाई कां आरंभली?

नेतान्याहूनी इराणशी लढाई कां आरंभली?

इस्रायलनं इराणवर हल्ला केला. इराणनं इस्रायलवर हल्ला केला. हे घातक युद्ध काही दिवस चालेल?  एका लघु महायुद्धाची शक्यता निर्माण होतेय काय? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल. इस्रायलनं इराणमधल्या दहापेक्षा अधिक ठिकाणांवर हल्ला केला. राजधानी तेहरानवरही गोळे डागले,रॉकेटं फेकली. इराणचे काही अणुशास्त्रज्ञ, लष्करी अधिकारी आणि धर्मलष्कराचे काही अधिकारी मारले गेले.  इस्रायलचं म्हणणं होतं की इराणनं अण्वस्त्रं विकसित करायला घेतलीत, ती अण्वस्त्रं इराण इस्रायलवर टाकेल, ते टाळण्यासाठी एक पूर्वकाळजी म्हणून इस्रायलला हल्ला करावा लागला.  इराण गेली २५ वर्षांपेक्षा अधिक काळ अणूइंधन विकसित…

Read More Read More

टेसला कार, बोईंग विमान, ट्रंपच्या नशीबी नाही.

टेसला कार, बोईंग विमान, ट्रंपच्या नशीबी नाही.

प्रेसिडेंटपदाच्या खुर्चीत बसल्यावर ट्रंपनी टेसला कार (ईलॉन मस्कची) विकत घेतली. व्हाईट हाऊसच्या कंपाऊंडमधे उभी केली. गाजावाजा करून.आता ती कार ते विकणार आहेत. मस्कशी भांडण झालं म्हणून. प्रेसिडेंट झाल्यावर चार महिन्यातच ट्रंपनी कतारच्या अमीरकडून एक लक्झरी विमान मिळवलं. ते विमान अजूनही कतारच्या विमानतळावर उभं आहे, अजून अमेरिकेत आलेलं नाही. ।। डोनाल्ड ट्रंपनी रियाधमधे १४ मे रोजी जाहीर केलं  की कतारचे अमीर अल थानी ट्रंपना एक लक्झरी  बोईंग विमान भेट देणार आहेत. त्या जातीच्या  नॉर्मल बोईंग विमानापेक्षा ते १८ फूट जास्त लांब आहे.फुकट….

Read More Read More

कॅन महोत्सवात हुकूमशाहीवर घणाघात

कॅन महोत्सवात हुकूमशाहीवर घणाघात

झफर पनाहीच्या ‘इट वॉज जस्ट अॅन अॅक्सिडेंट’  या चित्रपटाला २०२५ चं कॅन महोत्सवात पाम डिओर पारितोषिक मिळालं. बक्षीस जाहीर झालं आणि जफर मानेमागे हात धरून खुर्चीत मागं कलंडला. शांतपणे. प्रेक्षागृह टाळ्या वाजवत उभं राहिलं, जफर आपल्या खुर्चीत शांत बसला होता. बक्षीस मिळेल अशी अपेक्षा नसेल? की चित्रपट करताना मानसिक खळबळ आणि तणाव त्याला बक्षीस जाहीर होताना आठवत असतील? एका प्रवासाला निघालेल्या जोडप्याच्या गाडीला अपघात होतो. गाडी ठीक करण्यासाठी गॅरेजमधे जाते. गॅरेजचा मालक एक माजी तुरुंगवासी असतो. तुरुंगात त्याचा छळ झालेला…

Read More Read More