पाच हजार रुपयांची पाण्याची बाटली
घराबाहेर पडताना आपण पाण्याची एक बाटली जवळ बाळगतो. ती बाटली आता एक दागिना झालाय. युरोपात, अमेरिकेत या बाटल्या साठ डॉलरला (पाचेक हजार रुपये) विकल्या जातात. बाटल्या आकर्षक रंगात असतात. बाटल्यांना टांगण्यासाठी की चेन मिळतात. बाटल्या हातात घेऊन हिंडता यावं यासाठी बाटलीला हुक असतात. बाटल्यांवर नामांकित माणसांची चित्रं असतात. मेस्सी या फूटबॉलपटूचं चित्र छापलेल्या बाटल्या धडाधड संपत आहेत. कॉलेजात जाणाऱ्या प्रत्येकाच्या हातात एक आकर्षक बाटली लटकत असते. रस्त्यावर, कामाच्या जागी, चित्रपटघरात, रेलवेत, विमानात, चराचर सृष्टीत सर्व ठिकाणी रंगीत आकर्षक बाटल्या दिसतात. …