Browsed by
Month: September 2025

युनायटेड नेशन्सचा पोकळ ठराव

युनायटेड नेशन्सचा पोकळ ठराव

 युनायटेड नेशन्सनं (युएन) गाझातलं युद्ध इस्रायलनं थांबवावं असं आवाहन करून पॅलेस्टाईन या देशाला मान्यता दिली.  पॅलेस्टाईन आणि इस्रायल हे दोन देश एकमेकाचे शेजारी म्हणून शांततेनं नांदावेत अशी अपेक्षा युनायटेड नेशन्सनं व्यक्त केली आहे. युएननं या ठरावात इस्रायलवर नरसंहाराचा (जेनोसाईड) आरोप केला आहे.  १६० देशांनी वरील ठरावाला मान्यता दिली आहे. अमेरिकेनं मात्र या ठरावाला विरोध केला आहे. पॅलेस्टाईन राष्ट्र निर्माण करणं म्हणजे हमासला मदत करणं अशी भूमिका अमेरिकेनं घेतली आहे. हा ठराव मांडला जाऊ नये, मांडला गेल्यास देशांनी मान्यता देऊ नये,…

Read More Read More

१४ लाख डॉलरला एक कबूतर

१४ लाख डॉलरला एक कबूतर

१४ लाख डॉलरला एक कबूतरकाही दिवसांपूर्वी आरमेंडो नावाचं एक कबूतर एका चिनी धनिकानं बेल्जियममधे १४ लाख डॉलरला विकत घेतलं. नाही म्हटलं तरी जरासा कमीच भाव आला. २०१९ साली एक कबूतर १९ लाख डॉलरला विकलं गेलं होतं. व्यवस्थित प्रशिक्षित केलेल्या कबूतराला चिनी लोक एकेका कबूतराला दहा बारा लाख डॉलरही द्यायला तयार होतात.जगात कबूतरांचं एक नवं मार्केट तयार झालंय.कबूतराला येवढी किमत कां येते?कारण कबूतरामधे एक अद्भुत शक्ती आहे. कबूतराला आपण कुठं वाढलोय त्याची आठवण रहाते, शेकडो किमी अंतरावरून कबूतरं आपल्या स्थानावर परत…

Read More Read More

रशियन शँपेन अमेरिकेत

रशियन शँपेन अमेरिकेत

न्यू यॉर्कमधल्या कार्नेगी सभागृहात युक्रेनमधील युद्धग्रस्त मुलांच्या मदतीसाठी कार्यक्रम चालू होता. सभागृहाच्या एका कोपऱ्यात वाईन   ठेवली होती. पैसे द्यायचे, वाईनचा ग्लास घ्यायचा. अमेरिकेत काहीही फुकट मिळत नाही. एका महिलेनं एक ग्लास चमकदार वाईन घेतली. तिला २४ डॉलर मोजावे लागले. एका ग्लासला २४ डॉलर म्हणजे फार होते. विकत घेतलीच आहे तर वाईन चाखावी म्हणून महिलेनं वाईन तोंडात घोळवत असताना तिथं हजर असलेल्या आयोजकांना सहज विचारलं की वाईन प्रस्तुत वाईन कुठली. आयोजकांनी सांगितलं की ही वाईन युक्रेनमधली, बाखमुटमधली, आहे. शँपेनसारखी वाटत…

Read More Read More

 टायलरनं चार्लीला कां मारलं?

 टायलरनं चार्लीला कां मारलं?

चार्ली कर्क (३१) चा खून झाला. अमेरिकेतल्या युटा युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांसमोर भाषण करत असताना टायलर रॉबिन्सन (२२) यानं त्याच्यावर १५० मीटर अंतरावरून गोळी घातली. चार्ली क्लार्क एका सधन ख्रिस्ती घरात वाढला. राजकारणाच्या हिशोबात त्याचं घर रिपब्लिकन विचाराचं होतं. शिकागोत शिकला. कॉलेज शिक्षण अर्धवट सोडून राजकारणात पडला. टर्निंग पॉइंट युएसए ही संघटना त्यानं स्थापली. ट्रंप यांचा समर्थक होता. ट्रंप यांच्या मोहिमेसाठी पैसे आणि कार्यकर्ते तो गोळा करत असे. कडवट ख्रिस्ती, समलिंगी-लिंगबदल यांचा कट्टर विरोधक, अमेरिका ख्रिस्ती व्हावा असं मत, ख्रिस्तेतरांचा द्वेष. प्रक्षोभक…

Read More Read More

नेपाळ पाठोपाठ भारत?

नेपाळ पाठोपाठ भारत?

आपल्या शेजारच्या नेपाळी तरुणांनी केलेल्या आंदोलनामुळं नेपाळमधलं सरकार पडलं, पंतप्रधान ओली देश सोडून पळून गेलेत. ओली हा पळून गेलेला तिसरा शेजारी पळपुटा. २०२२ मधे लंकेचे गोटाबाया पळाले. भ्रष्ट होते. पोरांनी त्यांना पळवून लावलं. नंतर २०२४ साली बांगला देशच्या हसीना पळाल्या, त्याही भ्रष्ट आणि त्यांनाही पोरांनी पळवून लावलं. नेपाळी तरूणांना सरकारवर राग होता. सरकार आणि तमाम पुढारी भ्रष्ट आहेत; आम्ही कठीण परिस्थितीचा सामना करत असताना पुढाऱ्यांची मुलं ऐश करतात; यांना सरकार चालवता येत नाहीये असं तरुणांचं म्हणणं होतं. तरूणांचा हा राग…

Read More Read More

(समाज घडवणारा) एक डिझायनर गेला

(समाज घडवणारा) एक डिझायनर गेला

 जॉर्जियो आरमानी हा इटालियन माणूस  वयाच्या ९१ व्या वर्षी वारला.आरमानी या त्याच्याच नावाचा ब्रँड जगभर प्रसिद्ध आहे.जगभरातल्या पेपरांनी त्याच्या मरणाची हेडलाईन केली, त्याच्यावर मृत्यूलेख लिहिले. मार्टिन स्कॉरसेसे या दिक्दर्शकानं त्याच्यावर २० मिनिटांचा माहितीपट केला होता. जाहिरात म्हणून नव्हे, त्याच्या प्रेमाखातर. लोक हळहळले नाहीत पण त्यांना दुःख मात्र निश्चीतच झालं. आरमानी डिझायनर होता. त्यानं कपडे, बूटचपला, अत्तरं, आभूषणं, घरं, कॅफे,ऑफिसं असं बरंच काही डिझाईन केलं.   तो ओळखला जातो तो त्याच्या वस्त्रप्रावरणाच्या डिझाईनमुळं. हॉलीवूडमधले टॉप अभिनेते आणि अभिनेत्या आरमानी कपडे वापरून…

Read More Read More