Browsed by
Month: October 2025

सुदान. सत्तेसाठी समाजाचा बळी

सुदान. सत्तेसाठी समाजाचा बळी

  सुदान हा देश आपल्या निकट परिचयाचा देश  नाही.  साधारणपणे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश एकत्र केल्यानंतर होईल तेवढा सुदानचा भूभाग आहे. आफ्रिकेच्या उत्तर पूर्व भागातल्या या देशात सध्या धुमश्चक्री चाललीय आणि जगातले बरेच देश त्या धुमश्चक्रीत सामिल आहेत. जग किती एकमेकात गुंतलंय ते सुदानच्या धुमश्चक्रीतून लक्षात येतं.  पूर्व सुदानमधल्या एल बशर या शहरातील अधिकृत सुदानच्या सैन्याला फुटीर सैन्यानं पळवून लावल्यामुळं लढ्याला एक नवं वळण मिळालंय. या खटाटोपात तिथली हजारो माणसं मेलीयत आणि लाखो माणसं बेघर झालीयत. उपासमारी आणि रोगराईची समस्या…

Read More Read More

किंचाळी क्लब

किंचाळी क्लब

किंचाळी क्लब, किंचाळी चळवळ  लंडनच्या हाईड पार्कमधे दुपारचे तीन वाजत होते. दोन बायका आल्या. दोन तीन पुरुष आले. आणखी बायका आणि पुरुष आले. तीनच्या ठोक्याला सर्व जण किंचाळू लागली. पोटाच्या तळातून आवाज काढत होती, आकाशाला भेदायला निघालाय असा ऊंच स्वर. आवाज पूर्ण लागावा म्हणून कमरेत वाकून ताठ होत होत किंचाळत.  जेमतेम मिनीटभर.किंचाळ्या थांबल्या, सर्व जण हसू लागले. पोट धरधरून हसू लागले. पार्कमधे फिरायला आलेल्या लोकांना काय चाललंय ते कळेना. किंचाळतात काय, हसतात काय. लोकांनी डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहिलं न पाहिल्यासारखं केलं….

Read More Read More

भारत पाकिस्तान अफगाणिस्तान त्रांगडं

भारत पाकिस्तान अफगाणिस्तान त्रांगडं

 अफगाणिस्तानचे परदेश मंत्री मुत्तकी भारताच्या परदेश मंत्री जयशंकर यांच्याशी बोलत असताना पाकिस्तानी लढाऊ विमानं काबूल आणि कंदाहारवर बाँब फेकत होती.  ।। भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे एक त्रांगडं आहे. अफगाणिस्तानातलं तालीबानचं सरकार भारतानं मान्य केलं नव्हतं, अफगाणिस्तानशी संबंध ठेवले नव्हते. तालिबान सरकार गेल्यानंतर हमीझ करझाई यांचं सरकार आलं. करझाईंचं शिक्षण भारतात झालं होतं. भारतानं करझाई सरकारला मान्यता दिली. नंतर पुन्हा एकदा सध्याचं तालीबान सरकार आलं.   आता भारतानं पुन्हा संबंध प्रस्थापित करायचं ठरवलंय. तालीबान संस्कृती भीषण आहे. तालिबान दहशतवादी आहे….

Read More Read More

चुका कबूल करणारा बियॉन बोर्ग

चुका कबूल करणारा बियॉन बोर्ग

चुका कबूल करणारा बियॉन बोर्ग बियॉन बोर्गचं ‘हार्टबिट्स’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झालंय.  बियॅान बोर्ग आठवतोय? टेनिस पर्वताचं एव्हरेस्ट शिखर. ओळीनं सहा वेळा विंबल्डन जिंकला. ओळीनं सहा वेळा फ्रेंच ओपन जिंकला. जगातले सर्व चषक जिंकले. करियरच्या टॅापला असतांना वयाच्या २५ व्या वर्षी, १९८१ साली, बोर्गनं टेनिस सोडलं.  सोडलं म्हणजे सोडलंच.   कंटाळला होता. घराच्या किंवा हॉटेलच्या बाहेर पडला की पत्रकार, फोटोग्राफरचा गराडा पडे. सतत पाच पन्नास वह्या सहीसाठी समोर असत. जणू जगाच्या गॅलरीत ठेवलेलं पेंटिंग. पेंटिंगला कधी खाजगी आयुष्य नसतं. कायम…

Read More Read More

निसटलेला दगड

निसटलेला दगड

निसटलेलादगड गाझात लढाई स्थगित झाली. शस्त्रसंधी झाली. म्हटल तर ही शस्त्रसंधी एकतरफी आहे. गाझाच्या हातात दंडुके होते, इस्रायलकडं अत्याधुनिक महाघातक शस्त्रं होती. ट्रंप यांनी नेतान्याहूंना धमकावलं, त्यांचे हात पाठी बांधले. इस्रायलनं रॅाकेट, तोफगोळे आणि बांबवर्षाव थांबवला. येवढंच झालं. बाकी सर्व देखावा होता. ज्या कारणांसाठी इस्रायल आणि गाझा यांच्यात लढाई झाली ती कारण शिल्लक आहेत. इस्रायलला सुरक्षा हवीय.अरब जगानं ती द्यायचं मान्य केलंय, इस्रायलचं अस्तित्व मान्य करून त्यांच्यासोबत सहकार्य करत जगायचं मान्य केलंय. तसे करार केलेत, व्यापार उदीम सुरू केलाय. पॅलेस्टाईन…

Read More Read More

कवट्या, हाडं…

कवट्या, हाडं…

शीर्षक सुचेना इथे कवट्या मिळतील. ५०० पाउंडांपासून किमती आहेत. इथे माणसांचे दात मिळतील. ८ पाऊंडांपासून किमती सुरु होतात. इथे माणसाचा पूर्ण सांगाडा मिळेल. १००० पाऊंड किंमत पडेल.   माणसांच्या पायाची हाडं, मनगटाची हाडही इथे मिळतील.  बोटंही मिळतील. इसेक्स (इंग्लंड) या शहरात ‘क्युरियॉसिटी फ्रॉम फिफ्थ कॉर्नर’ या  एका दुकानाबाहेर वरील पाटी लावलेली आहे. नाना प्रकारच्या कवट्या कपाटातल्या काचेमागं या दुकानात दिसतील.  ओळखताही येणार नाहीत असे प्राण्यांचे हाडांचे सांगाडेही तिथं टेबलावर विकायला ठेवलेले दिसतील. म्युटेशन होऊन किंवा संकर होऊन मिश्र प्राणी तयार…

Read More Read More

प्रेसिडेंटची न्यायाधिशाला लाच. दोघेही तुरुंगात.

प्रेसिडेंटची न्यायाधिशाला लाच. दोघेही तुरुंगात.

फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलस सारकोझी यांना कोर्टानं पाच वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा सुनावलीय. सारकोझी २००७ ते २०१२ फ्रान्सचे प्रेसिडेंट होते.  त्यांच्या भानगडींची एक साखळीच आहे. निवडणुक प्रचार मोहीमेवर भरमसाठ पैसा खर्च केला. हा पैसा बेकायदेशीर पद्दतीनं गोळा केला. खर्चावरची कायद्यानं घातलेली मर्यादा  ओलांडली. खटला सुरु झाल्यावर न्यायाधिशाला लाच दिली. पोलिस आणि न्यायाधीश देशद्रोहीच म्हणायचे. त्यांनी चक्क नीट चौकशी करून प्रेसिडेंट महोदयांना तुरुंगात धाडलं. सारकोझींची प्रचार मोहीम भारी देखणी. प्रचार सभांच्या वेळी झेंडे नाचवण्यासाठी माणसं गोळा केली. एका सभेत ६५ हजार, दुसऱ्या…

Read More Read More

पेपरची मालकीण बातमीदार असते.

पेपरची मालकीण बातमीदार असते.

लॅली वेमथ या पत्रकार बाईचं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालं. हे निधन जगभरच्या पेपरांच्या बातमीचा विषय झालं. कां बाबा? कारण लॅली वेमथ या बाई सामान्य पत्रकार नव्हत्या. वॉशिंग्टन पोस्ट, न्यूज वीक या पेपरांच्या त्या मालक होत्या. मालक असूनही त्या आपल्या पेपरासाठी मुलाखती घेत फिरत. मेनाहेम बेगिन यांच्यापासून तर नेतान्याहूंपर्यंतच्या सर्व इस्रायली पंतप्रधानांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या. गद्दाफी, सद्दाम हुसेन, यास्सर अराफत यांच्या मुलाखती मिळणं फार अवघड असे, वेमथनी त्या मुलाखती जमवल्या. सद्दाम हुसेननी मुलाखत दिली तेव्हां त्यांच्या भोवती सशस्त्र सुरक्षा…

Read More Read More

ट्रंप यांचा नवा गाझा प्लॅन

ट्रंप यांचा नवा गाझा प्लॅन

 गाझा युद्ध थांबवण्यासाठी ट्रंप यांनी नवी पुडी सोडली आहे. ट्रंपनी जे मांडलंय त्याला प्लॅन असं म्हटलं जातं. पण असे अनंत प्लॅन ट्रंपनी मांडलेत आणि ते सारे फेल गेलेले आहेत, त्या वल्गना ठरल्या आहेत.ट्रंप यांचे प्लॅन विचारपूर्वक तयार झालेले नसतात, ते त्यांची लहर असतात. नवा प्लॅन २१ कलमी आहे. गाझातले ओलिस आणि मृतांची शवं हमासनं इस्रायलला सोपवावीत; इस्रायलनं गाझी कैदी हमासला परत करावेत; हमासनं शस्त्र टाकावीत आणि गाझातून निघून जावं; एका अंतरीम बोर्डानं गाझाचा कारभार हाती घ्यावा (त्या अंतरीम बोर्डाचे प्रमुख…

Read More Read More