दारोदार डिलिव्हरी आणि लेखन
हु अन्याननं IDeliver Parcels in Beijing हे पुस्तक २०२३साली लिहिलं. दोन वर्षात त्या पुस्तकाच्या २० लाख प्रती संपल्या. त्या वर्षीचं सर्वोत्कृष्ट लेखक पारितोषिक त्याला मिळालं. हुचं ते पहिलंच पुस्तक. हु लेखक नाही. पुस्तक लिहिल्यामुळं तो लेखक झालाय. हु बीजिंगमधे वस्तू पोचवणारा डिलिवरीवाला आहे. नागरीक वस्तू मागवतात. गोदामातून वस्तू गोळा करणं आणि गिऱ्हाईकांकडं पोचवणं हे त्याचं काम. एक वस्तू पोचवण्याचे २५ रुपये त्याला मिळतात. जगण्यासाठी त्याला दिवसाचे ११ तास काम करावं लागतं. सोपं काम नव्हे. खाद्य वस्तू असेल तर ती काही…