Browsed by
Month: December 2025

खात रहा, वजन कमी करत रहा.

खात रहा, वजन कमी करत रहा.

।। कुवैतमधे ४५ टक्के माणसं ‘वजनदार’ आहेत, अमेरिकेत ४२ टक्के आणि भारतात ७ टक्के माणसं वजनदार आहेत.उत्तर कोरियात फक्त १ टक्के वजनदार आहेत.  भारतात १ लाख माणसांत ३० माणसं लठ्ठपणामुळं मरतात. अमेरिकेत ते प्रमाण १ लाखात ५५ इतकं आहे. सौदी अरेबियात लाखात १५८ लठ्ठ मरतात. ‌।। जगभर दोन उद्योग जोरात चालतात. अन्नोत्पादक आणि औषधोत्पादक. पहिला उद्योग  लोकांना लठ्ठ करतो दुसरा   लोकांना सडपातळ करतो. दोघांची मिळून एक टोळी होते. माणसं खातात, पचवतात.  आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्लं जाणारं अन्न शरीरात साठून रहातं….

Read More Read More

ट्रंप जिहादींशी दोस्ती कां करतात

ट्रंप जिहादींशी दोस्ती कां करतात

  अमेरिकेनं सीरियात ७० ठिकाणांवर ते  इस्लामिक स्टेटचे अड्डे आहेत अशा संशयावरून हल्ला केला. बाँबर, फायटर, हेलेकॉप्टर आणि तोफखान्याचा वापर अमेरिकन सैन्यानं केला. जॉर्डनच्या हवाई दलानं या कामी अमेरिकेला मदत केली. मृतांचा किंवा विघ्वंलाता तपशील अमेरिकेनं जाहीर केलेला नाही.  काही दिवसांपूर्वी इस्लामिक स्टेटनं अमेरिकन तळावर हल्ला करून दोन सैनिक, एक कर्मचारी मारले होते. प्रस्तुत   हल्ला एक सूड होता.  सीरियामधे गेलं वर्षभर अल शारा प्रेसिडेंट आहेत. तहरीर अल  अल शाम ही त्यांची संघटना. या संघटनेचे ते आमिर आहेत. या संघटनेचं…

Read More Read More

सद्दाम हुसेन यांच्यासाठी केक

सद्दाम हुसेन यांच्यासाठी केक

  भारतीय फौजा हैदराबाद संस्थानात घुसल्या, हैदराबाद मुक्त झालं. हैदराबाद मुक्ती संग्राम दाखवायचा झाला तर या घटनेच्या भवती चित्रपट-माहितीपट करता येतो.  भारतीय सेना संस्थानात घुसल्याची बातमी कुरुंदा या गावात पोचली. तिकडं भारतीय सेनेची कारवाई सुरु होती इकडे नांदेडमधल्या कुरुंदा गावात आनंदोत्सव साजरा झाला. तो दिवस नरहर कुरुंदकर यांनी एका लेखात चितारलाय. त्या दिवसावर एक चित्रपट होऊ शकतो. कुरुंदा गावातलं एकादं कुटुंब, त्या कुटुंबात घडणाऱ्या घटना चित्रपटात दिसतील. कुरुंदा गावातली घरं दिसतील, त्यांचं जगणं दिसेल. त्यात ना भारतीय सेना दिसेल, ना…

Read More Read More

हा अमानुष वेडेपणा थांबायला हवा. 

हा अमानुष वेडेपणा थांबायला हवा. 

हा अमानुष वेडेपणा थांबायला हवा.  ऑस्ट्रेलियात सिडनी शहरात समुद्र किनाऱ्यावर ज्यू माणसं हनुक्का सणाचा आनंद लुटत होते. दोन माणसांनी दुरवरून त्यांच्यावर बंदुक चालवली. ४० जणं जखमी झाले, १५ जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळापासून काही अंतरावर एका कारमधे आयईडी स्फोटकं सापडली. बाप आणि मुलगा अशी हल्लेखोरांची जोडी होती. बाप १९९८ मधे ऑस्ट्रेलियात स्थलांतरीत होऊन नागरीक झाला होता, २४ वर्षाचा त्याचा मुलगा ऑस्ट्रेलियात जन्मल्यानं जन्मजात नागरीक झाला होता. त्यांच्या घरी असलेल्या आणि त्यांनी वापरलेल्या म्हणून ६ बंदुका त्यांच्याकडं होत्या. या बंदुका लष्करी उपयोगासाठी…

Read More Read More

दे तेल पेलो.

दे तेल पेलो.

छोटुश्शा देशातल्या इटुकल्या समाजात झालेला चित्रपट.महाराष्ट्र ३ लाख चौकिमी आहे. पोर्टो रिको हा देश ३ हजार चारशे किमी आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या आहे १३.७ कोटी; पोर्टो रिकोची लोकसंख्या आहे ३ लाख २ हजार. पोर्टो रिकोत २०२३ साली १४ फिल्म झाल्या, २०२४ साली ७ फिल्म झाल्या. २०२५ साली किती फिल्म झाल्या तो आकडा मिळत नाही पण जितक्या कितक्या फिल्म झाल्या असतील त्यातली ‘दे तेल पेलो’ गोव्यातल्या महोत्सवात दाखवली गेली.‘दे तेल पेलो’ चं मराठीतलं स्वैर भाषांतर होईल खाण तशी माती.नात आणि आजोबा यातल्या…

Read More Read More

सोळाच्या आत सोशल मिडिया मज्जाव

सोळाच्या आत सोशल मिडिया मज्जाव

 ऑस्ट्रेलियानं १६ वर्षाखालील मुलांच्या सोशल मिडिया वापरावर बंदी घातलीय. सोशल मिडियाच्या वापरामुळं मुलांचं नुकसान होतं;  मुलांची विचारशक्ती कुंठते, त्यांच्यात मानसीक विकृती निर्माण होतात; असं सरकारला वाटतं.  नवीन कायद्यातली तरतूद अशी :  सोशल मिडिया ॲप उघडलं की उघडणाऱ्याचं वय तपासलं जावं, सोळाच्या आत असेल तर त्या व्यक्तीला ते ॲप उघडता येणार नाही. सोशल मिडिया कंपन्यांनी कायदा पाळला नाही, पळवाटा काढल्या तर  मिडिया कंपन्यांना ३.३ कोटी डॉलरचा दंड सरकारनं योजला आहे. एक सूचना होती की वय तपासणं, मिडियातला मजकूर तपासणं, मुलाना पाहू…

Read More Read More

चित्रपट : सेफ हाऊस. विषण्ण करणारा अनुभव.

चित्रपट : सेफ हाऊस. विषण्ण करणारा अनुभव.

नेटकंच पार पडलेल्या (२०२५) गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सेफ हाऊस’ या चित्रपटाची उत्कृष्ट चित्रपट म्हणून निवड झाली.नॉर्वेजियन एरिक स्वेन्सनने या चित्रपटाचं दिक्दर्शन केलंय. चित्रपट युनेस्को आणि आयसीएफटी या दोन संस्थांची निर्मिती आहे.  सेफ हाऊस म्हणजे सुरक्षित घर. सेफ हाऊस या शब्दाना एक विशिष्ट अर्थ आहे.  गुप्तचरांना कोणाला तरी मारायचं असतं, कुठं तरी घातपात घडवायचा असतो. त्यासाठी त्यांना आपली ओळख, नावगाव पुसावं लागतं, लोकांच्या नजरेत भरणं टाळावं लागतं.  उघड झाले की मेलेच. अशा गुप्तचरांना एका सेफ हाऊसमधे ठेवलं जातं. सेफ हाऊसमधे …

Read More Read More

पुतीन मोदी भेट, रशिया भारत भेट.

पुतीन मोदी भेट, रशिया भारत भेट.

पुतीन सप्टेंबर महिन्यात मोदींना भेटले होते. लगोलग दोन महिन्यांनी दोघं दिल्लीत भेटले. लगबग कशासाठी? युक्रेन युद्धानं केलेल्या गोचीतून पुतीनना वाट काढायचीय. पुतीनना त्यांची अर्थव्यवस्था सांभाळायचीय; पुतीनना आपण जगात एकटे पडलेलो नाही आपल्याला मित्र आहेत हे जगाला दाखवायचंय. युद्ध महाग पडतय. दररोज किमान पाच हजार रशियन सैनिक मरत आहेत. पैसा वारेमाप खर्च होतोय. भारत आणि चीननं रशियन तेल व इतर गोष्टींची खरेदी चालवलीय, तेवढ्यावर रशिया तग धरून आहे. युरोपीय देश हळूहळू रशियन तेल आणि गॅस कमी वापरू लागलेत, पुढल्या वर्षात ते…

Read More Read More

महिला प्रेसिडेंटशीच अती प्रसंग करणारे….

महिला प्रेसिडेंटशीच अती प्रसंग करणारे….

 मेक्सिको नाना तऱ्हेच्या दबाव आणि प्रेरणांना तोंड देतोय. बाहेरून ट्रंप दम काढत आहेत. अमेरिकेनं मेक्सिकोतून येणाऱ्या जहाजांवर बाँब फेकले. २१ जहाजं. त्यातून म्हणे ड्रग्ज अमेरिकेत येत होती. ८३ माणसं मेली. कित्येक दशकं मेक्सिकोतून माणसं आणि ड्रग्ज अमेरिकेत येतात. मेक्सिकोची राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था ड्रग माफिया चालवत असतात.  एकदा अमेरिकेनं ड्रगवाल्या वनस्पती नष्ट करण्यासाठी मेक्सिकोमधे आपले सैनिक घुसवले. अमेरिकन विमानं हवेतून आग किवा रसायनं फवारून ड्रग देणारी पिकं नष्ट करत असत. आड येणारी माणसंही अमेरिका मारत असे. त्याचा उपयोग होत नसे. ड्रग…

Read More Read More