Browsed by
Month: January 2026

 दावोस  वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. दावोस.  वसुंधरा टिकवणं, जगातले संघर्ष मिटवून शांतता निर्माण करणं, जगाचा आर्थिक विकास साधणं हे दावोस परिषदेच्या कामकाजाचे मुख्य विषय असतात. यंदा सर्व विषय बाजूला सरले, ट्रंप काय म्हणतात, ट्रंपना तोंड कसं द्यायचं या मुद्द्याभोवती दावोस परिषद फिरली. स्वित्झर्लंडमधे कुरपार्क या गावात दावोस परिषद भरते. तीनेक हजार माणसं जमतात.त्यात पुढारी, कंपन्यांचे मालक,कंपन्यांचे कारभारी असतात. ६५ हजार चौफुचं लाकडी बांधकाम करून पाच इमारतींचा समूह तयार केला जातो. उतरत्या छपरांची शॅले हे स्विस वैशिष्ट्यं आहे. इमारती दर वर्षी उभारतात…

Read More Read More

युनायटेड स्टेट्स ऑफ डोनल्ड ट्रंपवॉशिंग्टनमधे केनेडी सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट या संस्थेचं केंद्र आहे. ट्रंप यांनी या केंद्राच्या नावात आपलं नाव घुसवलं. केंद्राचं नाव झालं डोनल्ड ट्रंप केनेडी सेंटर.ट्रंप यांचं नाव कला केंद्राला (सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, वॉशिंग्टन) दिल्यानंतर रसीक तिथं जाईनासे झाले आहेत. यंदाच्या सीझनमधे त्या केंद्राच्या पाच कला मंचाची ५७ टक्के तिकीटं विकली गेली नाहीत. रसीक तिथं जायला तयार नाहीत, नामांकित नाट्य निर्माते, संगित संस्था तिथं प्रयोग करायला तयार नाहीत. ‘ट्रंपकला’ आपल्याला मंजूर नाही असं अनेक मान्यवर कलाकार,…

Read More Read More

देश खरेदी विक्रीला काढलेत  डोनल्ड ट्रंप यांनी ग्रीनलँडचा कबजा करायचं फारच मनावर घेतलेलं दिसतंय. काही काळ ग्रीनलॅंडची मागणी ही ट्रंप यांची एक लहर असेल असं वाटत होतं.   ती तशी लहर दिसत नाहीये.  ग्रीन लँड हा एक स्वायत्त देश आहे. डेन्मार्क या देशाचं संरक्षण ग्रीन लँडनं घेतलेलं असलं तरी तो डेन्मार्कचा भाग नाही.  ग्रीनलँडची लोकसंख्या जेमतेम ५७ हजारांची आहे. ग्रीनलँडमधे भरपूर खनीजं आहेत, ती खनीजं दुर्मिळ आहेत आणि त्यांना उद्योगात खूप महत्व आहे. त्यासाठी ट्रंपना तो देश ताब्यात हवाय. रशियाचा आणि चीनचा…

Read More Read More

सिनेमा : ‘लकी लू’ नवं जग कसं आहे ते ‘लकी लू’ आपल्याला दाखवतो. चित्रपटाचा दिक्दर्शक कोरियन आहे; चित्रपटात दाखवलेलं कुटुंब तैवानी आहे; चित्रपट घडतो न्यू यॉर्कच्या ब्रुकलीन विभागात. ब्रुकलिनमधे चिनी वस्ती आहे. एक चिनी येतो. तो आपल्या नातेवाईकाला चीनमधून आणतो. चिनी विद्यार्थी शिकायला येतात, चिनी वस्तीत रहातात. चिनी विद्यार्थी कमवू लागतो, आपल्या आईबापांना ब्रुकलीनमधे आणतो, आपल्या बहीण भावांनाही चीनमधे आणतो. चायना टाऊन तयार होतं. सर्व चिनी एकमेकाला धरून असतात. अडीअडचणीत मदत करतात. ब्रुकलीनमधे चिनी आहेत, कोरियन आहेत, तैवानी आहेत, इंडोनेशियन…

Read More Read More

इराण पेटलंय इराणमधे दोनेक हजार आंदोलकांना शिपायांनी गोळ्या घातल्या आहेत. इराणमधल्या सत्तेची घडण बदलू घातलीय. खूप माणसं मारल्याशिवाय, खूप रक्त सांडल्याशिवाय इराणमधे सत्ता बदल होत नाही असा गेल्या ऐंशी नव्वद वर्षांचा इतिहास आहे. इतिहासाचं तेच सूत्र पुढं सुरु रहाणार असं दिसतंय. गेले दोनेक आठवडे इराणमधली जनता रस्त्यावर उतरलीय. इराणी रियाल कायच्या काय घसरला हे निमित्त झालं.  अन्नपदार्थ आणि घरात वापरायचं तेल यांच्या किमती तिप्पट झाल्या  सरकार या दुरवस्थेला जबाबदार आहे असं म्हणत इराणी जनता आंदोलात उतरली, आंदोलनानं हिंसक वळण घेतलं. सुरवातीला अध्यक्ष…

Read More Read More

पालिका निवडणूक. टाईमपास. मनोरंजन. काहींचं खिसेभरण.

पालिका निवडणूक. टाईमपास. मनोरंजन. काहींचं खिसेभरण.

  महाराष्ट्रात आता नगर परिषदा आणि महापालिकांच्या निवडणुका होत आहेत.  सध्याचं सरकार म्हणतय की लवकरच भारत जगातलं एक नंबरचं श्रीमंत राष्ट्र होणार आहे. अशा भारतात खेडी आणि नगरं कशी आहेत?  अमेरिका-युरोपात गावं आणि नगरांत फिरतांना वाटतं की तिथं वास्तव्य करावं.  भारतात खेडीनगरात फिरताना तसा अनुभव येत नाही. भारतात रस्ते वाईट; कचरा आणि दुर्गंधी; गर्दी आणि आवाज; अव्यवस्था; बकालपणा हे भारतीय खेडी-शहरांचं एक डोळ्यात-कानात भरणारं वैशिष्ट्यं.  एक माणूस म्हणतो युरोप अमेरिकेत उघड्यावर शीशू करायला परवानगी नाही, पापी घ्यायला परवानगी असते. भारतात शीशूला परवानगी,…

Read More Read More

एका हुकूमशहानं दुसऱ्या हुकूमशहाला घालवलं. अमेरिकेनं वेनेझुएला हा देश आक्रमण करून जिंकला आहे. अमेरिकेनं १५० अत्याधुनिक लढाऊ विमानं पाठवून वेनेझुआलाच्या राजधानीत अध्यक्ष निकोलस मदुरो यांना अटक करून अमेरिकेत नेलं आहे.पुढला काही काळ वेनेझुएलातलं सरकार आपण चालवणार  असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रंप यांनी जाहीर केलं आहे. गेले काही महिने अमेरिकन नौदल आणि हवाई दल वेनेझुएलाची जहाजं जप्त करत होतं, नष्ट करत होतं. ती जहाजं ड्रगची तस्करी करत असत, अमेरिकेचं तेल चोरत असत असं प्रेसिडेंट ट्रंप यांचं म्हणणं होतं. वेनेझुएलातून येणाऱ्या ड्रग्जमुळं…

Read More Read More

इराणमधली अस्वस्थता

इराणमधली अस्वस्थता

तेहरानमधील  (इराणची राजधानी) चार  विद्यापीठातले विद्यार्थी देशातल्या आर्थिक परिस्थितीबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले. इराणभरच्या विद्यार्थ्यांचा त्यांना पाठिंबा आहे. तेहरान,इशफाहान या शहरातले व्यापारी दुकानं बंद करून रस्त्यावर उतरले. वाढलेली महागाई असह्य झालीय असं एकूण लोकांचं मत दिसतंय. मध्यम वर्गीय आणि गरीब इराणींच्या मुलाखती प्रसिद्ध होत आहेत. गेल्या वर्षभरातल्या महागाईत प्रथम चैनीच्या वस्तू खरेदी करणं बंद केलं, नंतर कपडे विकत घेणं थांबवलं, मग घराची भाडी थकवली, चटकदार खाणं संपवलं, आता दैनंदिन उपयोगाच्या वस्तूही विकत घेणं बंद करायचं काय असा प्रश्न लोक…

Read More Read More