मुलगी आई-भावाचा खून कां करते
आई,भाऊ, सहाध्यायी, शिक्षिका यांचा खून करणारी मुलगी. ।। टंबलर रिज या कॅनडातल्या गावातल्या आजी आजोबांनी नातवंडांना टाटा केलं, मुलं शाळेत रवाना झाली. दुपारची डुलकी घ्यायला आजी आजोबा घरात परतले. कलंडले असतील नसतील येवढ्यात त्यांच्या फोनवर अलार्म वाजला. शाळेत एक मारेकरी घुसलाय, गोळीबार करतोय. गावातल्या प्रत्येक पालकाच्या फोनवर अलार्म वाजला. माणसं जशी होती तशी शाळेकडं निघाली. प्रत्येकाचं फोनवर लक्ष होतं. सेलफोनवर चित्रफीती दिसू लागल्या. शाळेत लॉक डाऊन झाला होता. किंचाळण्याचे आवाज येत होते. गावातला मेयर धावत सुटला. तो या गावात १८…