बांगला देशातली खानदानी सत्ता
बांगला देशात निवडणुका झाल्या. ३०० सदस्यांच्या लोकसभेत बांगला देश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी- बांगला देश जातीयवादी दल-जद)) या पक्षाला २१२ जागा मिळाल्या, जमाते इस्लामी या पक्षाला ६८ जागा मिळाल्या. तरुणांच्या ज्या संघटनेनं आंदोलन केलं होतं त्या संघटनेला ६ जागा मिळाल्या. अवामी लीग या आधीच्या सत्ताधारी पक्षावर बंदी असल्यानं तो पक्ष निवडणुकीत उभा नव्हता. शेख हसिना (अवामी लीग) यांच्या यांची १५ वर्षाची कारकीर्द तरूणांनी आंदोलन करून संपवली. भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले, कोर्टानं त्यांना फाशी सुनावली. त्यांनी पळ काढला, भारत सरकारनं त्याना…