रविवारचा लेख अमेरिकेचा इसरायलवर दबाव
पंतप्रधान नेतान्याहू यांच्या प्रस्तावित न्यायव्यवस्था सुधारणांना होणारा विरोध पुन्हा एकदा निदर्शनांच्या रुपात उफाळला आहे. ताजं कारण आहे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांचं वक्तव्य. जो बायडन नुसतं म्हणाले की ते नेतान्याहू यांना भेटणार आहेत यावर तेल अवीवमधे हजारो लोक रस्त्यावर उतरले. बायडननी नेतान्याहू यांना भेटू नये, त्यांच्यावर कायदेसुधारणा मागे घेण्यासाठी दबाव आणावा असं लोकांचं म्हणणं आहे. न्यायमूर्ती, वकील, प्राध्यापक, लेखक, कलाकार,डॉक्टर्स इत्यादीं हजारोंनी पत्रक प्रसिद्ध करून बायडन भेट घेणार या बद्दल नापसंती व्यक्त केली. प्रकरण येवढ्यावरच थांबलेलं नाही. ३० हजार डॉक्टरनी…