Browsed by
Author: niludamle

यशस्वी आणि लोकप्रिय अँजेला मर्केल स्वतःहून सत्तेतून निवृत्त झाल्या.

यशस्वी आणि लोकप्रिय अँजेला मर्केल स्वतःहून सत्तेतून निवृत्त झाल्या.

 अँजेला मर्कल जर्मनीच्या चॅन्सेलरपदावरून निवृत्त झाल्या. त्यांचं बरं चाललं होतं. ७५ टक्के जर्मन जनतेला त्यांचं नेतृत्व पसंत होतं. त्यांच्या कोविड हाताळणीवर ८५ टक्के जनता खुष होती. जर्मनीतच नव्हे तर साऱ्या युरोपातल्या जनतेनं त्यांचं नेतृत्व मान्य केलं होतं. आणखी चारआठ वर्ष जरी त्या सत्तेत रहात्या तरी लोकांना ते हवं होतं. आज तरी त्यांच्यायेवढं समर्थ नेतृत्व युरोपात नाही.    २०१८ सालीच त्यांनी सांगून टाकलं होतं की आत बस झालं, सोळा वर्ष सत्ता उपभोगली, पुरे झालं, आता आपण २०२१ची निवडणुक लढवणार नाही. गंमत पहा….

Read More Read More

रक्त तपासणीची अमेरिकन बनवाबनवी

रक्त तपासणीची अमेरिकन बनवाबनवी

अमेरिकेत एक जाम उदबोधक आणि रंजक नाटक घडतय. हे नाटक म्हणजे कोर्टनाटक आहे. एलिझाबेथ होम्स या महिलेवर लोकांना फसवल्याचा आरोप आहे, आरोप सिद्ध झाला तर होम्सना वीस वर्षाची शिक्षा आणि काही लाख  डॉलर्सचा दंड होऊ शकेल. रक्ताच्या दोन थेंबात दोनशे तपासण्या करणारं यंत्रं आपण तयार करणार आहोत, केलंय, असं एलिझाबेथ खोटंच बोलल्या. तसं यंत्र ना तयार झालं होतं ना तयार होण्यासारखं होतं. रोगी आणि कंपनीत भांडवल गुंतवणारे यांना एलिझाबेथनी थापा मारल्या, फसवलं असा आरोप एलिझाबेथ होम्स यांच्यावर आहे. एलिझाबेथ होम्सनी २००३ साली वयाच्या अवघ्या १९व्या…

Read More Read More

उपासमार आणि दुष्काळ. सत्ताखटपटीचा परिणाम.

उपासमार आणि दुष्काळ. सत्ताखटपटीचा परिणाम.

इथियोपियात आठ प्रांत किंवा राज्यं आहेत. इथियोपियात ओरोमो,अम्हारा,सोमाली,टिग्रे इत्यादी आठ प्रमुख संस्कृती आहेत.प्रत्येक संस्कृतीची एक स्वतंत्र  भाषा आहे, अनेक बोली भाषा आहेत. तीन ख्रिस्ती पंथ, दोन इस्लामी पंथ आणि अनेक स्थानिक उपासनापद्धती आहेत. शेकडो वर्ष अशा अनेक ओळखीचं मिश्रण असलेल्या ओळखी, इथियोपिया या भूप्रदेशात, अनेक राज्यं आणि साम्राज्यांचा भाग म्हणून, एकत्र नांदत आहेत. ।। टिग्रे. इथियोपियातला एक प्रांत, एक राज्य. सध्या तिथं  लाखो मुलं कुपोषित आहेत, लाखो माणसं उपाशी आणि तहानलेली आहेत. त्यांना अन्न, पाणी,औषधं उपलब्ध होत नाहीयेत. वस्तू बाजारातून गायब आहेत,…

Read More Read More

भीषण सत्ताकारण.

भीषण सत्ताकारण.

काबूल विमानतळावर दोन स्फोट झाले. त्यात साठेक माणसं मेली आणि सुमारे दीडशे जखमी झाली. काबूल विमानतळाच्या  आसपास हजारो माणसं देशाबाहेर जाण्याच्या खटपटीत गोळा झाली होती, विमानतळावर  प्रवेश मिळेल, विमानात प्रवेश मिळेल, स्थलांतरीत होता येईल या आशेनं. याच गर्दीत एक अब्दुल नावाचा माणूस होता.  दूरच्या हेलमांड प्रांतातून तो चंबुगवाळं आवरून काबूलमधे पोचला होता. त्याच्याकडं कागदपत्रं होती. गेली आठेक वर्षं तो ब्रिटीश फौजांना मदत करत असे. त्याचं काम असं. दरी,पश्तू भाषेतील कागदपत्रं आणि संभाषणं अनुवादून ब्रिटीश फौजाना, अफगाण सैनिक व पोलिसांना  सांगणं. अब्दुल स्थानिक असल्यानं त्याला…

Read More Read More

अफगाणिस्तान अधांतरी

अफगाणिस्तान अधांतरी

तालिबाननं अफगाणिस्तानची सूत्रं अधिकृतपणे हाती घेतली आहेत. तालिबानच्या प्रवक्त्यांनी, प्रतिनिधींनी, काबूलमधे पत्रकार परिषद घेऊन इस्लामी अमिरात स्थापन झाल्याचं जाहीर केलंय.   पत्रकार परिषदेत अफगाण आणि जगातल्या इतर देशातल्या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाना उत्तर देताना तालिबाननं म्हटलंय ते असं :  स्त्रियांना शिक्षण आणि काम करण्याचं स्वातंत्र्य राहील, पत्रकारांना स्वातंत्र्य राहील, विरोधक आणि एनजीओना सूडानं वागवलं जाणार नाही, तरूणांची देशाला गरज आहे त्यांनी देश सोडून न जाता देशाच्या विकासाला हातभार लावावा, दहशतवादी गटाना अफगाणिस्तानात काम करू दिलं जाणार नाही.  अर्थात शरीया आणि इस्लामच्या चौकटीत. शरीयाचा अर्थ तालिबान…

Read More Read More

तालिबानचा ताबा

तालिबानचा ताबा

६५ टक्के अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवला आहे. काबूल, कंदाहार, मझारे  शरीफ अशी मोजकी मोठी शहरं फक्त सरकारच्या ताब्यात आहेत. अमेरिकन फौजा माघारी गेल्या आहेत. शहरं ताब्यात ठेवण्यासाठी अमेरिका तालिबानच्या अड्ड्यांवर हल्ले करत आहे. कतारच्या तळावरून आणि अरबी समुद्रातल्या विमानवाहू जहाजांवरून विमानं उड्डाण करतात, अफगाणिस्तानात हल्ले करून परततात. बाँब आणि रॉकेटं टाकू शकणारी हेलीविमानं आणि ड्रोन हे हल्ले करतात.  महिना दोन महिन्यात काबूलसह इतर शहरं तालिबानच्या हातात पडतील आणि देशावर ताबा मिळाल्याचं तालिबान जाहीर करेल. तालिबान आणि सरकार यांच्यात युद्ध चाललं असताना…

Read More Read More

चौकीदारच चोर असल्यावर गुन्हा शाबीत कसा होणार?

चौकीदारच चोर असल्यावर गुन्हा शाबीत कसा होणार?

एक वर्ष  झालं. बैरूटमधे स्फोट झाल्याला. स्फोटाला कोण जबाबदार आहे ते अजून न्यायालयानं सांगितलेलं नाही. काही दिवसात तपास करून जबाबदार माणसाना शिक्षा केली जाईल असं सांगितलं गेलं होतं त्याला आता वर्ष होत आलंय. बैरूट गोदीतल्या एका गोदामातल्या २७०० टन अमोनियम नायट्रेटचा स्फोट  ४ ऑगस्ट २०२० रोजी झाला.   गोदामाची स्थिती वाईट होती. अमोनियम नायट्रेटचा स्फोट होऊ नये यासाठी आवश्यक तांत्रिक व्यवस्था गोदामात नव्हती. २०१४ साली अमोनियम नायट्रेटची पोती गोदामात येऊन पडली त्या दिवसापासून गोदीतले अधिकारी सांगत होते की स्थिती वाईट आहे, पोती गोदामातून…

Read More Read More

पेगॅसस. अर्थ, अनर्थ.

पेगॅसस. अर्थ, अनर्थ.

पेगॅससनं जगभर गोंधळ माजवलाय.  हेरगिरी करणारं हे सॉफ्टवेअर आपण विकत घेतलंय की नाही, त्याचा वापर आपण करतोय की नाही ते सांगायला भारत सरकार तयार नाहीये. अमेरिकन संसद या सॉफ्टवेअरवर बंदी घालायचा विचार करतेय. एनएसओ या कंपनीचं हे सॉफ्टवेअर सध्या जगातले काही देश आणि देशप्रमुख आपले विरोधक आणि लोकशाही खतम करण्यासाठी वापरत आहेत. काय आहे हे पेगॅसस? पेगॅसस हे एक स्पायवेअर आहे, एक हेरगिरी करणारं सॉफ्टवेअर आहे. सरकारं ते विकत घेतात. सरकार त्या सॉफ्टवेअरचा वापर करून एक मेसेज नागरिकाच्या फोनवर, व्हॉट्सअपवर,…

Read More Read More