अफगाणिस्तान. अराजक आकार घेतंय.
राष्ट्रपती भवनाच्या मैदानात राष्ट्रपती अश्रफ घनी ईदची प्रार्थना करत होते. शेदोनेशे माणसं साताठ रांगा करून उभी रहात होती, गुढग्यावर बसत होती. समोर एक मुल्ला लाऊड स्पीकरवर ‘ अल्ला ‘ हो अकबर म्हणत होता. स्फोटाचा आवाज झाला. नमाज करणारी माणसं काहीच न झाल्यासारखी गुडघ्यावर बसली. दोघे जण सुटात होते, त्यांनी रिव्हॉल्वर काढली आणि ते बाहेर पडले. एक माणूस सलवार खमीज आणि जाकीट घातलेला होता. तो गोंधळला. चारी बाजूला पाहिलं. बाकीची मंडळी गुडघ्यावर होती, हा मात्र उभाच होता. पुन्हा स्फोट झाला. नमाजी शांत. आता सेक्युरिटीचे आणखी लोक…