मोदी पराजय आणि ममता जयाचा अर्थ
बंगाल विधानसभेच्या निवडणुकीत मोदींची सपशेल हार झाली. बंगालच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला २१३ जागा आणि ४८ टक्के मतं मिळाली. भाजपला ७७ जागा आणि ३८ टक्के मतं मिळाली. या निवडणुकीत तृणमूलची टक्केवारी आणि जागा दोन्ही वाढल्या. उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार ही वाढ तृणमूलच्या कर्तृत्वामुळं झाली आहे. तृणमूलनं सर्वसामान्य माणसाच्या हिताचे कार्यक्रम अमलात आणले, त्या कामाचं रुपांतर मतांमधे करण्यासाठी भरपूर मेहनत घेतली. पक्षाचे कार्यकर्ते गावोगाव फिरून कार्यक्रमाची अमलबजावणी करत होते आणि त्याची किमत मतांमधे मागत होते. भाजपनं हिंदू-मुसलमान फूट आणि दोन समाजातील विसंवाद (त्यातला…