शाकाहारींनो हे मांस बिनधास्त खा
शाकाहारींनो हे मांस बिनधास्त खा वातावरण बदलाची समस्या विक्राळ स्वरूप धारण करू लागल्यावर २००६ साली राष्ट्रसंघाच्या अन्न व शेती संघटनेनं एक पाहणी अहवाल प्रसिद्ध केला. अहवालानं सांगितलं की वातावरणातला घातक ग्रीन हाऊस वायूपैकी १८ टक्के वायू पशुपालन उद्योगातून निर्माण होतो. कार, विमानं, जहाजं, रेलगाड्या इत्यादी एकत्रितपणे जेवढा घातक वायू सोडतात त्या पेक्षा पशुपालनात निर्माण होणारा वायू जास्त आहे. दूध आणि मांसासाठी गायबैल पोसले जातात.सर्वात जास्त म्हणजे ६० टक्के घातक वायू हे गायबैल हवेत सोडतात. त्या खालोखाल डुकरं आणि कोंबड्यांचा…