बोेहेमियन चित्रपट दिक्दर्शक यिरी मेंझेल
यिरी मेंझेल हा झेक दिग्दर्शक नेटकाच वयाच्या ८२ वर्षी वारला. त्याच्या क्लोजली वॉच्ट ट्रेन्स या चित्रपटाला १९६६ साली ऑस्कर मिळालं होतं. भारतात परदेशी चित्रपट खूप कमी पाहिले जातात, झेकोस्लोवाकिया नावाचा देश आहे हेही माहित नसलेले लोक फार. त्यामुळं यिरी मेंझेलनं केलेले चित्रपट भारतीय माणसाला परिचित नाहीत. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पहाणाऱ्या प्रेक्षकांना मेंझेल फार आवडला होता. क्लोजली वॉच्ट ट्रेन्स . अगदीच आडवाटेला असलेलं रेलवे स्टेशन. दिवसातून तीन चार डब्यांची एकादी गाडी येते जाते. तिच्यातून चार दोन माणसांची चढउतार होते. स्टेशनात सगळी…