स्कॅाच ते वाईन. ब्रीटन.
जगभरात वाईन पिण्यात फ्रान्स आघाडीवर असतो आणि इटाली वाईन निर्मितीत आघाडीवर असतो. दोन्ही बाबतीत ब्रीटन खूपच मागं आहे. पण आता ब्रीटन वाईन निर्मितीत उतरला आहे. हवामान बदलाचा ‘दुष्परिणाम’ ब्रीटनच्या पथ्थ्यावर पडला आहे. स्कॉच निर्माण करणारा देश वाईन निर्माता होऊ पहातोय. ।। अगदी काल परवापर्यंत तुम्ही पॅरिसच्या बारमधे वेटरला ब्रिटीश वाईन आण असं सांगितलं असतंत तर त्यानं तुम्हाला हाकलून दिलं असतं. शेजारी बसलेल्या फ्रेंच माणसाला विचारलं असतंत ‘काय भाऊ, ब्रिटीश वाईन घेऊया काय?’ तर तो हसला असता. ब्रिटीश आणि वाईन? काय…