आपलं महानपण मिरवत रहाणं हे परदेश नीतीचं सूत्र असता नये
मसूद अझरला दहशतवादी जाहीर करा हा युनायटेड नेशन्सच्या सुरक्षा परिषदेतला ठराव चीननं आपला नकाराधिकार वापरून नाकारला. या घटनेवर राहूल गांधी म्हणाले की नरेंद्र मोदी चीनच्या सी जिनपिंगना घाबरतात, त्यांच्या विरोधात बोलायला तयार होत नाहीत, नरेंद्र मोदींचं परदेश धोरण अपयशी ठरलं आहे. राहूल गांधी विरोधी पक्षाचे नेते आहेत. त्यांनी सत्ताधारी नरेंद्र मोदींवर टीका करणं समजण्यासारखं आहे. सत्ताधाऱ्यांना आणि सत्ता समर्थकांना नरेंद्र मोदींचं धोरण यशस्वी वाटणार हेही समजण्यासारखं आहे. पण नरेंद्र मोदीचं राहूल गांधीना दिलेलं उत्तर पोरकट आहे येवढंच नाही तर धादांत…