पाकिस्तानचं लष्कर
जनरल बाजवा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख झाले आहेत. पाकिस्तानात लष्कर प्रमुखाची निवड पंतप्रधान करत असतात. पंतप्रधान लष्कर प्रमुख निवडतांना आपली सोय पहातात, लष्कर आपल्या बाजूला राहील अशा रीतीनं लष्कर प्रमुख निवडतात. प्रमुखपदाच्या रांगेत वरिष्ठतेनुसार क्रमांक लागणाऱ्या अनेकांना दूर सारून आपल्या ताटाखालचं मांजर बनेल असं मनात ठेवून पंतप्रधान लष्कर प्रमुख निवडतात. त्याच परंपरेनुसार पंतप्रधान नवाज शरीफ यांनी जनरल बाजवा यांना निवडलं आहे. तीन ज्येष्ठांना बाजूला सारून. धार्जिणा लष्कर प्रमुख पंतप्रधानाला उपकारक ठरतोच असं नाही. किंबहुना आजवरचा इतिहास सांगतो की लष्कर प्रमुख…