सुरवातीचे चित्रपट
इटालीतल्या बलोनी (Bologna) गावात एक चित्रपट उत्सव पार पडला. उत्साही मंडळी कित्येक महिने आधी नीटपणे ठरवून बलोनीच्या उत्सवाला जातात. तिथं गेली ३० वर्षं दरवर्षी जुलै महिन्यात Cineteca ही संस्था चित्रपट उत्सव भरवते. त्यात जीर्णोद्धार केलेले सिनेमे दाखवले जातात. Cineteca ही संस्था गेली पन्नास वर्षं चित्रपट जीर्णोद्धार करत आली आहे. बलोनीमधे या संस्थेच्या कचेरीसमोर फूटबॉल मैदानाच्या आकाराचा चौक आहे. तिथं उघड्यावर हा उत्सव होतो. भलामोठा पडदा लावला जातो. हज्जारो माणसं जमिनीवर बसून सिनेमा पहातात. परवाच्या जुलै महिन्यात झालेल्या उत्सवात लाखभर…