एकसंध मुस्लीम संस्कृती असं काही आहे काय?
मुस्लीम जग, मुस्लीम वंश, मुस्लीम सिविलायझेशन अशी एकादी एकसंध गोष्ट आहे काय? मुस्लीम संस्कृती म्हणजे एक बांधीव अरब संस्कृती आहे काय? तसं काही नाहीये असं ठाशीव उत्तर चेमल आयडिन त्यांच्या Idea of the Muslim World या पुस्तकात देतात. बराक ओबामा प्रेसिडेंट झाल्यावर कैरोमधे गेले होते तेव्हां एका भाषणात त्यानी मुस्लीम जग असा उल्लेख केला. कारण आधीचे प्रे. बुश यांच्यावर आरोप होत होता की ते मुस्लीम देशांवर आक्रमणं करत फिरत आहेत. त्या आधी खोमेनी १९८८ मधे आपण मुस्लीम जगाच्या वतीनं बोलत आहोत असं म्हणाले होते….