गुलाबो सिताबो, खूब मजा आया.
गुलाबो सिताबो या चित्रपटाला मी दहात सात गुण देईन. तो चित्रपट चारही बाजूंनी पहायला मजा येते. त्यातली पात्रं, त्यातलं संगित, चित्रीकरण, संवाद अशा साऱ्याच गोष्टी छान आहेत. गुलाबो सिताबोत लखनऊ शहराचा काहीसा अंदाज येतो. कॅमेरा शहरात फिरला असता, लखनऊची खाऊ गल्ली, लखनऊचे कबाब दाखवले असते तर आणखीनच मजा आली असती आणि ती दृश्यं दाखवण्यासाठी आवश्यक स्पेस या चित्रपटात जरूर आहे. पण फातिमा महल ही हवेली पाहूनही लखनऊची मजा कळते. हवेलीत नाना आकाराच्या किती तरी खोल्या. खोल्यांची मांडणी आधुनिक इमारतींसारखी…