मस्कमस्ती
ईलॉन मस्कनी ट्विटर या कंपनीचे ९.२ टक्के शेअर्स ३ अब्ज डॉलर खर्च करून ताब्यात घेतले. म्हणजे ते लवकरच आणखीही शेअर्स घेऊन कंपनीत धिंगाणा घालणार हे उघड होतं. म्हणूनच कंपनीनं त्यांनी १४.९ टक्के शेअर्स घेऊन निर्णायक मालक होऊ नये असं बंधन घातलं. बहुदा ते बंधन त्यानी मान्य केल्यामुळंच कंपनीनं त्याना शेअर्स देऊ केले. आता मस्क म्हणतातेत की शेअरं घेताना मान्य केलेली ती अट ते धुडकावू शकतील. म्हणजेच ते अधिक शेअर्स घेऊन कंपनीवर ताबा मिळवू शकतील. निर्णायक भांडवल ताब्यात घेणं ही गोष्ट…