सावरकर, मंगेशकर, मोदी.
सावरकर, मंगेशकर, मोदी. नुकताच एक वाद झाला. वादाचं मुळ होतं नरेंद्र मोदी यांचं लोकसभेतलं भाषण. भाषणात मोदी म्हणाले की हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकरांच्या गाण्याला संगीतबद्द केल्याबद्दल त्यांना आकाशवाणीनं शिक्षा दिली, नोकरीतून काढून टाकलं. तो काळ काँग्रेस सरकारचा होता, नेहरू पंतप्रधान होते. मोदींचं म्हणणं होतं की नेहरू (काँग्रेस) सावरकरविरोधी होते, हिंदुत्वविरोधी होते आणि त्यांच्या दबावाखाली हृदयनाथ मंगेशकरांवर अन्याय झाला. यातलं तथ्थ्य काय? सुधीर गाडगीळ यानी हृदयनाथ मंगेशकरांकडं या बाबत विचारणा केली. मंगेशकर म्हणाले की १९५७ साली ते आकाशवाणीत नोकरीला नव्हते; मंगेशकर…