खोटारडा पंतप्रधान
बोरिस जॉन्सन यांच्या अधिकृत घरामधे, १० डाउनिंग स्ट्रीटमधे, गेल्या वर्षी ख्रिसमसची पार्टी झाली. पार्टीत चाळीस ते पन्नास माणसं हजर होती. पार्टी म्हटल्यावर जे काही होत असतं ते या पार्टीत झालं. सरकारी अधिकारी त्या पार्टीत होते. खुद्द बोरिस जॉन्सनही त्या पार्टीत काही वेळ सहभागी झाले होते. ज्या दिवशी पार्टी झाली त्याच दिवशी इंग्लंडमधे पाचेकशे माणसं कोविडनं मेली होती. पार्टीच्या आधी दोनच दिवस सरकारनं जनतेला सांगितलं होतं की कोविडपासून सावध रहावं, समारंभ करू नयेत, पार्ट्या करू नयेत, लोकांनी एकत्र येऊ नये, ख्रिसमस साजरा…