मेटाकुटीला आलेलं मेटा
फेसबुकनं नाव बदललंय.आता मेटा मेटा झालंय. परंतू अगदी नेटकंच या मेटाचं वागणं उघड करणारी माहिती तिथं काम करणाऱ्या लोकांनी जगासमोर मांडली. तेव्हांच प्रश्न निर्माण झाला होता की या मेटाचं काय करायचं. आता तो प्रश्न या मेटाचं काय करायचं असा विचारता येईल. जगभर मेटाचा उपयोग हिंसा, दंग्यांना चिथावणी देण्यासाठी केला जातोय. सरसकट एकादा धर्म,एकादा समाजगट वाईट ठरवून त्याच्याबद्दल खोटी माहिती व द्वेष पसरवणाऱ्या पोस्टी मेटावर सर्रास मोकाट फिरतात, त्यातल्या जेमतेम शतांश पोस्टी मेटा रोखतं किंवा त्यांच्यावर त्या अयोग्य असल्याचं लेबल चिकटतवतं….