संकट काळ
क्राऊन या मालिकेतला एपिसोड सुरू होतो तेव्हा ॲबरफॅन गावात शुक्रवार असतो, मुसळधार पाऊस पडत असतो. शाळा सुटणार असते, एक शिक्षक मुलांना पुस्तिका वाटतात, त्यातलं गाणं पाठ करा, उद्या ते सर्वांनी एकत्र गायचंय असं सांगतात. दोन तीन दृश्यं मधे जातात, मुलं शाळेत पोचतात. एक विद्यार्थी वात्रट असतो. हाॅलमधे जायच्या आधीच वर्गात तो ते गाणं म्हणतो. वर्ग हसतो. शिक्षक सांगतात की गाणं म्हणायला वेळ आहे, पाच मिनिटं आहेत. वर्गाच्या खिडकीतून दूरवरचा डोंगर दिसत असतो. डोंगर म्हणजे कोळसा खाणीतून बाहेर आलेल्या मातीचा डोंगर….