पंतप्रधान तुरुंगाच्या वाटेवर…
भारताचे विद्यमान परदेशी मित्र एका मागोमाग एक न्यायालयं आणि चौकशीच्या फेऱ्यात सापडत आहेत. ट्रंप त्या वाटेवरचे आगेवान. आगेवान हा शब्द गुजराती भाषेतला. पुढे चालणारा, आघाडीवर असणारा तो आगेवान. ट्रंप यांच्या कोटाचा मागचा भाग धरून नेतान्याहूंची जोरदार वाटचाल चाललीय. इस्रायलचे अॅटर्नी जनरल अविचाई मँडलब्लिट यांनी नेतान्याहू यांच्या विरोधातला भ्रष्टाचाराचा लोंबत पडलेला खटला चालवायला घेतला आहे. नेतान्याहू यांच्यावर एक आरोप आहे तो हॉलीवूड मोगल अरनॉन मिलचन यांना अधिक काळ इस्रायलमधे रहाता यावं यासाठी इस्रायलचा व्हिसा वाढवून देण्यासाठी अमेरिकन सरकारवर दबाव आणणं. तशी…