लोकशाह्या कशा मरतात
डोनल्ड ट्रंप अमेरिकेचे प्रेसिडेंट झाले. प्रतिस्पर्धी हिलरी क्लिंटन यांना ट्रंप यांच्यापेक्षा २५ लाख मतं जास्त मिळाली होती. म्हणजे ट्रंप यांच्यापेक्षा किती तरी जास्त लोकांनी क्लिंटनना अध्यक्ष ठरवलं होतं. असं काही तरी होईल याची ट्रंप यांना जवळजवळ खात्रीच होती. त्यामुळं ते प्रचार मोहिमेतच सांगून बसले होते की निकाल त्यांच्या विरोधात लागला तर तो ते निकाल मान्य करणार नाहीत. एलेक्टोरल कॉलेजच्या निवड पद्धतीमुळंच ट्रंप प्रेसिडेंट झाले, ट्रंपनाही आपण निवडून आलो याचं आश्चर्य वाटलं होतं. ट्रंप यांना प्रेसिडेंट होऊन अमेरिकेचं कल्याण करायचंच नव्हतं….